तेलकट लंचबॉक्स असा करा स्वच्छ, सोप्या टिप्स

ऑफिस असो वा शाळा, जेवणासाठी अनेकदा प्लास्टिकच्या डब्याचा वापर केला जातो. विशेषतः टप्परवेअरचे डबे जेणेकरून त्यातून तेल अथवा पदार्थ बाहेर न येण्याची खात्री असते. प्लास्टिकच्या लंचबॉक्समधून जेवणे नेणे हे कॉमन आहे तसंच याला लागलेले तेलाचे आणि इतर डाग काढणेही तितकेच कठीण आहे. बरेचदा तेल कितीही घासून जात नाही. असे तेलकट लंचबॉक्स स्वच्छ करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत. या टिप्सचा वापर करून तुम्ही अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तेलकट लंचबॉक्स (How To Clean Plastic Lunch Box) स्वच्छ करू शकता. 

बेकिंग सोड्याचा करा वापर (Use Baking Soda To Clean Oily Lunchbox)

How To Clean Plastic Lunch Box – Freepik.com

जेवण बनवणे असो वा स्वयंपाकघरातील स्वच्छता असो अनेकदा बेकिंग सोड्याचा वापर करण्यात येतो. त्यामुळे लंचबॉक्समध्ये असणारे तेल, भाजी याचे डाग काढून स्वच्छ करण्यासाठी तुम्ही या टिप्स फॉलो कराव्यात – 

  • सर्वात पहिल्यांदा 1 लीटर पाणी घ्या आणि त्यात 1-2 चमचे बेकिंग सोडा घालून व्यवस्थित मिक्स करा
  • त्यानंतर आता हे मिश्रण लंचबॉक्समध्ये ओता आणि साधारण 10 मिनिट्स तसंच राहू द्या 
  • 10 मिनिट्सनंतर क्लिनिंग ब्रश रगडून हे स्वच्छ करून घ्या 
  • तुम्हाला हवं असल्यास, या मिश्रणात तुम्ही 1 चमचा मीठही मिसळू शकता

लिंबाचा रस आणि मीठाचा करा उपयोग (Use of Lime Juice And Salt To Clean Oily Lunchbox)

How To Clean Plastic Lunch Box – Freepik.com

ज्याप्रमाणे तुम्ही कपड्यांचे डाग काढण्यासाठी लिंबाच्या रसाचा उपयोग करता त्याचप्रमाणे लिंबाचा रस आणि मिठाचा इथे उपयोग करावा. तेलकट प्लास्टिकचे लंचबॉक्स धुण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करण्याची अजिबात गरज नाही. या स्टेप्स तुम्ही फॉलो करा – 

  • यासाठी 1 लीटर पाण्यात तुम्ही 2 चमचा लिंबाचा रस आणि 2 चमचे मीठ मिक्स करून घ्या 
  • त्यानंतर हे पाणी गॅसवर ठेवा आणि कोमट तापवा 
  • यानंतर हे पाणी लंचबॉक्समध्ये घाला आणि साधारण 5 मिनिट्स तसंच राहू द्या
  • 5 मिनिट्स झाल्यावर क्लिनिंग ब्रशने लंचबॉक्स व्यवस्थित घासा
  • तुम्हाला हवं असल्यास लिंबाचा रस आणि मीठ नुसतं लावा आणि लंचबॉक्स स्वच्छ करा 

बोरेक्स पावडरचा करा वापर (Use Borax Powder To Clean Oily Lunchbox)

How To Clean Plastic Lunch Box – Freepik.com

बोरेक्स पावडर एक अशी वस्तू आहे ज्याचा वापर तुम्ही प्लास्टिक, स्टील अथवा अल्युमिनिअमच्या कोणत्याही भांड्यावर करू शकता. लंचबॉक्सला लागलेले तेलाचे, भाजीचे डाग काढण्यासाठी याचा वापर करून घेता येतो. घरात बोरेक्स पावडर नसेल तर कोणत्याही जनरल स्टोअर्समध्ये ही उपलब्ध होते. कसे वापरावे जाणून घ्या – 

  • तेलकट लंचबॉक्स स्वच्छ करण्यासाठी तुम्ही सर्वात पहिल्यांदा 1-2 कप पाण्यात 1 चमचा बोरेक्स पावडर मिक्स करा
  • त्यानंतर या मिश्रणात जुना ब्रश बुडवून ठेवा आणि लंचबॉक्सच्या सर्व भागाला हे पाणी लागू द्या आणि साधारण 10 मिनिट्स तसंच राहू द्या 
  • 10 मिनिट्सनंतर क्लिनिंग ब्रश रगडून हे स्वच्छ करून घ्या 

बेकिंग सोडा, लिंबाचा रस आणि बोरेक्स पावडर याशिवाय अन्य गोष्टींचाही यासाठी वापर करता येऊ शकतो. व्हाईट व्हिनेगर (White Vinegar) वापरूनही तुम्ही तेलकट डबा स्वच्छ करू शकता. तसंच रबिंग अल्कोहोलचाही वापर तुम्हाला यासाठी करता येऊ शकतो. या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. 

Leave a Comment