Smelly Shoes Home Remedy: तुम्ही वापरत असणाऱ्या शूजमधून दुर्गंध येणे ही अत्यंत कॉमन बाब आहे. सर्वांच्या नाही मात्र काही जणांच्या बुटांमध्ये खूपच दुर्गंधी येते. यामुळे आजूबाजूच्या लोकांनाही त्रास होतो आणि त्यांना ही दुर्गंधी सहन होत नाही. अशा वेळी ज्या व्यक्तीने हे बूट घातले आहेत त्यांना नक्कीच शरमेने मान खाली घालावी लागते. वास्तविक आपले पाय बरेचदा ओले होतात आणि बुटांमध्ये आणि मोज्यांमध्ये हा दमटपणा साचून राहतो. त्यात येणारा घाम आणि बॅक्टेरिया यामुळे बुटांमधून दुर्गंधी निर्माण होते. ही दुर्गंधी रोखण्यासाठी अथवा यातून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्सचा (Easy Tips to Remove Shoe Smell) वापर करू शकता. या सोप्या टिप्स जाणून घ्या.
शूज आणि इनसोल धुवा (Wash Shoes)

बुटांमधून खराब वास अथवा दुर्गंधी येत असल्यास, सर्वात पहिल्यांदा शूज आणि इनसोल तुम्ही नियमित स्वरूपात धुवा. तसंच शूज धुताना तुम्ही स्वच्छ आणि थंड पाण्याचा वापर करा हे लक्षात ठेवा. शूज पूर्ण घाण होईपर्यंत वाट न पाहता. किमान 15 दिवसानी धुवा आणि त्यावरील घाण स्वच्छ करा म्हणजे दुर्गंध येणार नाही.
थंड ठिकाणी शूज ठेवा
ज्या व्यक्तींच्या शूजमधून दुर्गंधी येते, त्यांनी त्यांचे शूज स्वच्छ आणि थंड ठिकाणी ठेवावेत. बॅक्टेरिया निर्माण होण्याची शक्यता नसेल अशाच ठिकाणी शूज ठेवा. यामुळे शूजना दुर्गंधी येत नाही आणि तुमचे शूज अधिक काळ टिकतात. तसंच त्याला बुरशीही लागत नाही.
पायाला डिओड्रंड लावा (Use Deodorant on Legs)

हे वाचून तुम्हाला कदाचित विचित्र वाटलं असेल पण पायावर येणाऱ्या घामामुळेच शूजना दुर्गंधी येते. पण तुमचे पाय सुके राहिले आणि त्यावर बॅक्टेरिया विकसित झाला नाही तर तुमचे शूज खराब होणार नाहीत. त्यासाठी तुम्ही डिओड्रंटचा पायावर वापर करावा. हे बॅक्टेरिया होऊ देत नाही.
घाम सुकवणारे मोजे वापरा (Use socks)

कॉटनचे मोजे हे घाम शोषून घेतातच असं नाही. त्यामुळे शूज वापरताना त्यातून येणारा दुर्गंध रोखण्यासाठी घाम शोषणारे मोजे घालणे हा चांगला पर्याय आहे. बाजारात हे मोजे तुम्हाला अगदी सहज मिळतात. घाम त्वरीत शोषून घेतात आणि बॅक्टेरिया विकसित होऊ देत नाहीत. तसंच मोजे वापरल्याने पायही चांगले राहतात. विशेषतः मुलांना खेळताना मोजे घालावेतच.
वॉशेबल इनसोलचा पर्याय निवडा
तुम्ही अशावेळी वॉशेबल इनसोलचा पर्याय निवडू शकतो. कॉटन टॅरी कापडाने हे इनसोल तयार होतात आणि याचा सोल हा रबर लेटेक्सचा असतो. हे चांगले ठेवण्यासाठी तुम्ही तीन ते सहा वेळा घातल्यानंतर धुवावे. यामुळे शूजमधून दुर्गंधी येणार नाही आणि शूज चांगले टिकतील देखील.
आम्ही इथे दिलेल्या टिप्समुळे तुमचे शूज केवळ चांगलेच राहणार नाहीत तर त्यावर कोणत्याही प्रकारच्या संक्रमणाचा धोकाही शिल्लक राहणार नाही. त्यामुळे याचा वापर नक्की करून घ्या.