Diwali 2022: दिवाळीची साफसफाई करण्यासाठी सोप्या टिप्स आणि ट्रिक्स

एकामागोमाग सण येतात आणि आता सुरू झाली आहे प्रत्येकाच्या घरी दिवाळीची जय्यत तयारी! प्रत्येक जण आता घरात दिवाळीसाठी साफसफाईच्या कामाला लागला आहे. पण दिवाळी आल्यानंतर ऑफिसच्या कामासह घरातील स्वच्छता करायची म्हणजे नक्कीच थोडं कठीण काम आहे. बरेचदा नक्की साफसफाई (How to Clean Home before Diwali) करायला सुरूवात कुठून करायची यातच गोंधळ उडतो. त्यामुळे घरात दिवाळीची साफसफाई (Diwali Cleaning) सुरू करण्यापूर्वी नक्की कोणत्या टिप्स आणि ट्रिक्स वापरायच्या याबाबत काही विशेष माहिती आम्ही तुमच्यासाठी देत आहोत. या टिप्स (Tips to Clean Home Before Diwali) वापरून तुम्ही कमी वेळात तुमचे घर व्यवस्थित स्वच्छ करू शकता आणि त्रासही होणार नाही. 

सर्वात पहिल्यांदा जुन्या गोष्टी घराबाहेर काढा 

घराची स्वच्छता सुरू करण्यापूर्वी तुम्ही सर्वात आधी तुमचे घरातील वापरात नसलेले सामान बाहेर काढा. यामध्ये तुमच्या जुन्या कपड्यांपासून सुरूवात करा. तुम्हाला जर काही कपडे पुन्हा घालायचे असतील तर वेगळे काढून ठेवा. बाकी नको असलेले जुने कपडे मोह न करता कपाटातून काढून टाका. तसंच घरात कोणतेही तुटलेले वा फुटलेले सामान असेल तर तेदेखील तुम्ही कचऱ्यात टाकून द्या. जुनी क्रॉकरी, चप्पल, खराब झालेल्या चादरी अथवा अडगळीत पडलेल्या जुन्या वस्तू काढून टाकण्यासाठी हीच वेळ योग्य आहे. त्यामुळे मनात कोणताही मोह न ठेवता हे सर्व काढून टाका. त्याचप्रमाणे तुमचा शू रॅकदेखील स्वच्छ करा आणि नको असणाऱ्या चप्पल्स वेळीच फेकून द्या. 

अशी सुरू करा घरीच स्वच्छता 

सौजन्य – Freepik.com
  • घराची स्वच्छता करण्यापूर्वी तुम्ही काही कॉटनचे कपडे (Cotton Cloths) आपल्याजवळ ठेवा. काही कपडे सुके ठेवा तर काही कपडे ओले करून घ्या. 
  • तसंच यासह ब्रश, स्पंज, साबणाची पावडर यादेखील गोष्टी जवळ ठेवा. सतत शोधायला लागून आपली वेळ फुकट जाणार नाही याची काळजी घ्या. 
  • साफसफाई करताना घरात खिडक्यांना घातलेले पडदे, सोफा कुशन, उशांचे कव्हर्स हे सर्व धुऊन व्यवस्थित सुकवून घ्या 
  • घरात कारपेट असल्यास व्यवस्थित कचरा साफ करून घ्या 
  • जाळ्यांवर कोळ्यांनी जाळे केले असल्यास, तुम्ही स्टूलचा वापर करून पंखा आणि वरील माळ्यावरील जाळे झाडून घ्या
  • पंख्यावरील धूळ सर्वात आधी झाडूने स्वच्छ करा. धूळ काढल्यावर कपड्याने स्वच्छ करून घ्या. यामुळे पंख्याची हवा वाढण्यासही मदत मिळते 

स्वयंपाकघराच्या स्वच्छतेसाठी करा हे काम 

सौजन्य – Freepik.com

घराची स्वच्छता करताना सर्वाधिक मेहनत लागते ती म्हणजे स्वयंपाकघर साफ करण्यात. स्वयंपाकघरात ठेवण्यात आलेले अधिकाधिक सामान आपल्याला वापरावे लागते. त्यामुळे सर्वात आधी स्वयंपाकघरात ठेवलेले डबे आणि भांडी स्वच्छ करून घ्या. एका मोठ्या टबमध्ये साबणाचे पाणी करून त्यात सर्व भांडी टाका आणि एकदाच ती भांडी स्वच्छ करून धुऊन घ्या. 

काचेची भांडी असल्यास, अत्यंत सावधानतेने याची स्वच्छता करा आणि साबणाच्या हलक्या पाण्याचा वापर करा. हातून ही भांडी निसटणार नाहीत याची काळजी घ्या. यासाठी गरम पाण्यात साबण पावडर आणि मीठ मिक्स करून घ्या आणि या पाण्याने काचेच्या भांड्यांची स्वच्छता करा. भांडी धुऊन सुकेपर्यंत स्लॅब आणि कपाट स्वच्छ करून घ्या आणि नंतर सुकलेली भांडी त्यावर मांडा. 

बाथरूमकडे द्या अधिक लक्ष 

घरात येणारे पाहुणे हे तुमच्या बाथरूमच्या स्वच्छतेवरून तुमची पारख करतात असं म्हटलं जातं. त्यामुळे घराची स्वच्छता करताना बाथरूम चमकणेही गरजेचे आहे. बाथरूम स्वच्छ करण्यासाठी सर्वात आधी बादली, मग, टूथब्रश होल्डर या गोष्टी स्वच्छ करून घ्या. यावरील डाग जात नसतील तर डाग असणाऱ्या ठिकाणी सोडा लावा आणि साधारण 10 मिनिट्स तसंच ठेवा आणि मग व्यवस्थित रगडा आणि स्वच्छ पाण्याने धुवा. सुकल्यावरच पुन्हा वापरा. यानंतर बाथरूमच्या टाईल्स आणि फरशी स्वच्छ धुऊन घ्या. यासाठी बाथरूम क्लिनरचा (Bathroom Cleaner) वापर करा. 

फर्निचरची स्वच्छता करा अशी (Clean Your Furniture)

घरात सोफा आणि खुर्चीवर साचलेली धूळ व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. सोफ्याच्या गाद्या आणि कारपेट हे वॅक्युम क्लिनरने स्वच्छ करा. यानंतर घरातील फर्निचरकडे वळा. काचेचे फर्निचर असेल तर सांभाळून स्वच्छ करा. लाकडाच्या फर्निचरसाठी झाडू आणि कापडाचा वापर करा. पाण्याने पुसू नका. फर्निचरची सफाई झाल्यावरच खालची लादी स्वच्छ करा. ही सर्व साफसफाई करून झाल्यावर घरातील लादी व्यवस्थित पुसून घ्या. 

सफाईसाठी स्वतःला असे करा तयार 

सौजन्य – Freepik.com

घराची सफाई करण्यासाठी अर्थातच स्वतःला तयार करणेही अत्यंत आवश्यक आहे. साफसफाई करणे हे अत्यंत त्रासदायक आणि दमणुकीचे काम आहे. 

  • अनेकांना धुळीची अलर्जी असते त्यामुळे साफसफाई करण्यापूर्वी अलर्जीची गोळी घेऊनच साफसफाई करायला घ्या
  • तसंच चेहऱ्यावर क्रिम लावा जेणेकरून धुळीचा त्रास होणार नाही 
  • केसांना तेल लावा आणि केस आणि तोंड एखाद्या स्वच्छ कापडाने बांधून घ्या आणि मगच साफसफाईला सुरूवात करा

चला तर मग आता या सर्व टिप्स वाचून झाल्या असतील तर सज्ज व्हा साफसफाईसाठी आणि दिवाळीचा आनंदही लुटा!

Diwali 2022: लक्ष्मीपूजनाला लाह्या आणि बत्ताशांचाच प्रसाद का, जाणून घ्या

Diwali 2022 : का आहे दिवाळीत लक्ष्मीपूजनाचे (Laxmi Pujan) महत्व

Diwali 2022: घरातील लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काढून टाका हे सामान

Leave a Comment