Bigg Boss 16 : मास्टर माईंड साजिद खानच्या (Sajid Khan) चुकांकडे केले जातेय का दुर्लक्ष

बिग बॉसच्या घरातील 50 दिवसांचा प्रवास आता पूर्ण झाला आहे. आता पर्यंत या प्रवासात कोण दमदार आणि कोण बेकार याचा अंदाज प्रेक्षकांनाही आला आहे. ज्या सेलिब्रिटीला अगदी पहिल्या दिवसापासून ट्रोल केले जात आहे. असा साजिद खान (Sajid Khan) अजूनही या खेळात टिकून आहे. Me Too केसमध्ये साजिदचे नाव आल्यामुळे त्याला बाहेर काढण्याची जोरदार मागणी होत होती. पण या मागणीकडे दुर्लक्ष करत या खेळात साजिद खानला ठेवण्यात आले. साजिद खान जास्त काळ टिकणार नाही असा काहींचा समज होता. पण या खेळात तो आपला गेम योग्यपणे साधून घेताना दिसत आहे. पण हा गेम साधताना त्याच्याकडून अनेक चुकाही होताना दिसत आहेत. या चुका इतर स्पर्धकांच्या तुलनेत अधिक आहेत. पण तरीही या चुकांकडे दुर्लक्ष करण्याचे कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडू लागला आहे. साजिदने या घरात अनेक चुका केलेल़्या आहेत. पण तरीही असे काय चला घेऊया जाणून 

साजिद खानचाही राग अनावर

साजिद खान कितीही शांत वाटत असला तरी त्याच्याही रागाचा पारा अनेकदा वाढलेला अनेकदा दिसला आहे. तो भांडणात इतका आक्रमक होतो की, त्याने अनेकदा bigg bossच्या प्रॉपर्टीचे नुकसानही केले आहे. काचेच्या दरवाज्यावर लाथा मारणे, मोठ्याने बोलणे, भांडणं करणे, शिव्या देणे, अंगावर धावून जाणे असे त्याने अनेकदा केले आहे. बुधवारी अर्चना आणि साजिदमध्ये रेशनिंगच्या टास्कदरम्यान चांगलंच मोठं भांडणं झालं. त्यावेळी साजिदही अर्चनाला बरेच बोलला. असे असतानाही साजिद खान बिग बॉसच्या आदेशासाठी थांबून राहिला. अर्चना आणि शिवचा वाद झाला होता. त्यावेळी तिला परत आणण्यावरुनही साजिदने विरोध केला होता. अर्चनाचे हेच वागणे त्याला आवडत नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितले होते. त्यामुळे साजिद खानचा राग अनावर होतो. त्याला स्पेशल डॉक्टरही कायम बोलावले जातात. पण इतका फेव्हर त्याला सलमानचा जवळचा म्हणून दिला जातोय अशीही चर्चा होत आहे.

स्मोकिंगवरुनही ओरडा

साजिद खान हा चैन स्मोकर आहे. घरात काहीही झाले की, तो सिगरेट ओढण्याचे काम करतो. टीव्हीवर लागणारा हा रिॲलिटी शो असल्यामुळे सगळ्या स्पर्धकांना काही नियम पाळणे गरजेचे असते. स्मोकिंग करण्यास मनाई नसली तरी देखील स्मोकिंग करताना कोणाशीही बोलू नये अथाव उघड्यावर स्मोकिंग करु नये असा साधा नियम आहे. पण या सीझनमध्ये अनेकदा शालिन आणि साजिद हे दोेघेही उघड्यावर स्मोकिंग करताना दिसले आहेत. त्याला अनेकदा स्मोकिंगवरुन ओरडण्यात आले आहे. बिग बॉसने सिगरेट बंद केल्यानंतर त्याने बिग बॉसला पाठवण्याची विनंती आणि ती मान्यही करण्यात आली. त्यामुळे त्याला याबाबतीतही फेव्हर दिला जातो असे दिसून आले आहे. 

साजिद सुमडीत कोंबडी

एखादा प्लेअर ज्यावेळी सुमडीत पुढे जातो त्यावेळी तो या घराचा मास्टर माईंड असते. साजिदनेही आपल्या इमेजचा फायदा घरात करुन घेतला आहे. साजिद कधीही कोणाच्या प्रत्यक्ष निशाण्यावर नसतो. कोणत्याही प्रकरणातून तो अगदी सहज सटकतो. शिवाय नॉमिनेशनमध्येही साजिद फारसा येत नाही. आता घरातील एकूण परिस्थिती पाहता तो टॉप 5मध्ये जाण्याची शक्यता अधिक आहे. 

साजिद खानच्या या चुकांबद्दल तुम्हाला काय वाटते? नक्की कळवा

Leave a Comment