थिएटरमधील पॉपकॉर्नमध्ये का घातलं जातं अधिक मीठ, जाणून घ्या कारण

थिएटरमध्ये चित्रपट पाहायला गेल्यानंतर पॉपकॉर्न (Popcorn) खाल्ले नाहीत असं अजिबात होत नाही. चित्रपट पाहताना पॉपकॉर्न खाण्याची मजाच काही वेगळी आहे. पण तुम्हाला माहीत आहे का चित्रपट आणि पॉपकॉर्नचे इतके घट्ट नातं का आहे? किंवा चित्रपट थिएटरमध्ये जे पॉपकॉर्न मिळतात त्यात इतकं अधिक मीठ का असतं? पदार्थांमध्ये मीठ जास्त असलं तर तो पदार्थ खावासा वाटत नाही. पण पॉपकॉर्नच्या बाबतीत असं अजिबात होत नाही. चला जाणून घेऊया. 

चित्रपटगृहात का असते पॉपकॉर्न इतके खारट?

सौजन्य – Freepik.com

सर्वात पहिले आणि महत्त्वाचे म्हणजे चित्रपटगृहातील लोकांना पोषणाची काहीच चिंता नसते आणि पॉपकॉर्नमध्ये ते कोणतेही फ्लेवर घालू शकतात. यामध्ये जास्त मीठ आणि बटरचा फ्लेवर घातला जातो. ज्याने अधिक स्वाद येतो. म्हणूनच घरात बनविण्यात आलेल्या पॉपकॉर्नपेक्षा थिएटरमधील पॉपकॉर्न हे अधिक खारट असतात. याचे कारण असेही आहे की, जास्त खारट पॉपकॉर्न हे तुमची तहान अधिक वाढवतात. त्यामुळेच तुम्ही पाहिलं असेल की, पॉपकॉर्नसह कोल्ड्रिंगचा पर्यायही ठेवण्यात येतो. हा एक मार्केटिंगचा महत्त्वाचा भागही मानला जातो. यामुळे चित्रपटगृहातील स्टॉल्सना अधिक फायदा मिळतो आणि त्याचा परिणाम होतो तो तुमच्या खिशावर. 

एका रिपोर्टनुसार, फिल्म थिएटरमध्ये Flavacol नामक घटक पॉपकॉर्नमध्ये वापरण्यात येतो. त्यामुळे नेहमी त्याचा स्वाद सगळीकडे एकसारखाच असतो. चित्रपट साधारण तीन तासाचा असतो आणि काहीतरी हलकेफुलके खायचे असेल तर शेंगदाणे अथवा अन्य गोष्टींनी फायदा त्यांना मिळणार नाही. पॉपकॉर्न फुलतात आणि विकत घेताना दिसतातही मोठे. त्यामुळे ते अधिक मिळतात असाही अनेकांचा समज होतो. 

चित्रपटगृहातील पॉपकॉर्न का खाऊ नयेत?

सौजन्य – Freepik.com

थिएटरच्या पॉपकॉर्नमध्ये मीठ जास्त का असतं हे तर आपण जाणून घेतलं. पण हे खायला हवेत की नको याबाबतदेखील जाणून घ्यायला हवे. अशी काही कारणं आहेत, ज्यामुळे हे पॉपकॉर्न न खाणे जास्त चांगले ठरते. याच्या फ्लेवर्समध्ये मीठ अधिक असते हे आम्ही तुम्हाला सांगितलेच आहे आणि यामुळे कॅलरीही अधिक वाढते. मध्यम पॉपकॉर्नमध्ये 702 कॅलरी असते तर मोठ्या पॉपकॉर्नमध्ये 1200 पर्यंत कॅलरी असते. तर बटर पॉपकॉर्नमध्ये खरे बटर नसून केवळ बटर फ्लेवर्ड ऑईल (Butter Flavoured Oil) वापरण्यात येते. हे पॉपकॉर्न ताजे नसून ते केवळ गरम करण्यात येतात. त्यामुळे तुम्ही बरेचदा शिळे पदार्थ खाता. याशिवाय यातील मीठ तुमच्या आरोग्यासाठी योग्य ठरत नाही. तसंच यामध्ये अधिक प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट असते. 

तुम्हाला या लेखाद्वारे आम्ही योग्य माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता थिएटरमधील पॉपकॉर्न घेण्याआधी नक्की विचार करा. कधीतरी हे खाणं ठीक आहे. मात्र नेहमी खाणे तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने वाईट ठरू शकते. 

Cooking Hacks: आता पराठा होणार नाही चिवट, वापरा या सोप्या हॅक्स 

या बेकिंग टिप्स वापरा आणि राहा निरोगी

रोज भाजी खायचा कंटाळा आलाय तर बनवा असे वेगळे रायते

Leave a Comment