स्तनांच्या त्वचेत कसावट आणतील हे मास्क, सैलसर स्तनांसाठी वापर करून पाहा

वय वाढते तसे त्वचेवर याचा अधिक प्रभाव पडतो. साधारणतः 35 वर्षाच्या वयात महिलांची चेहऱ्यावरील त्वचा सैलसर होऊ लागते. इतकंच नाही तर चेहऱ्यासह शरीरावरील इतर त्वचाही सैलसर होते. त्यामध्ये सर्वात जास्त त्वचा सैलसर होते ती म्हणजे स्तनांची (Breast). स्तनांची त्वचा सैलसर पडली तरीही अनेक महिला याकडे जास्त लक्ष देत नाहीत. पण जेव्हा तुम्ही डीप नेक आऊटफिट (Deep Neck Outfit) घालता तेव्हा याचा परिणाम दिसून येतो. कारण तुमचे स्तन सैल झाले असतील तर ड्रेसचे फिटिंग खराब होते. त्यामुळे चेहऱ्यासह तुम्ही स्तनांच्या त्वचेचीही काळजी घेतली तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. ब्रेस्ट सॅगिंग (Breast Sagging) करण्यासाठी अनेक क्रिम्स तुम्हाला बाजारात मिळतील. पण घरातच काही सोपे मास्क बनवून तुम्ही स्तनांच्या त्वचेत कसावट आणू शकता. जाणून घेऊया कोणते आहेत असे मास्क जे आणतील स्तनांच्या त्वचेत कसावट. 

तांदळाचा मास्क (Rice Mask)

Rice Flour For Homemade Mask – Freepik.com

साहित्य 

  • 1 मोठा चमचा तांदळाचे पीठ
  • 1 मोठा चमचा कोरफड जेल 

कृती 

  • तांदळाच्या पिठात कोरफड जेल मिक्स करा आणि हे मिश्रण तुम्ही स्तनांवर लावा
  • 15-20 मिनिट्सनंतर तुम्ही स्तन पाण्याने स्वच्छ करा
  • तुम्ही नियमित स्वरूपात जर स्तनांवर घरगुती मास्क लावला तर तुमच्या त्वचेत कसावट नक्की येईल

तांदूळ आणि कोरफड जेल या दोन्ही गोष्टीत अँटिएजिंग असल्यामुळे सैलसर स्तनांना उभारी येते आणि बाजारातील वस्तूंना अधिक पैसे घालण्याची गरज भासत नाही. 

एग व्हाईट मास्क (Egg White Mask)

Egg White For Homemade Mask – Freepik.com

साहित्य 

  • 1 अंड्याचा सफेद भाग
  • 1 मोठा चमचा दही
  • 1 विटामिन ई कॅप्सुल

कृती 

  • दही, अंड्याचा सफेद भाग आणि विटामिन ई कॅप्सुल एकत्र मिक्स करा 
  • याचा मास्क तुम्ही स्तनावर लावा
  • 20-25 मिनिट्सनंतर स्तनांचा हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर स्तन स्वच्छ करून घ्या 
  • आठवड्यातून 2-3 वेळा तुम्ही हा प्रयोग करा 

वास्तविक अंड्यामध्ये अँटीएजिंग घटक असतात. ज्यामुळे त्वचा अधिक कसदार होण्यास मदत मिळते आणि सैलसर त्वचा घट्ट होते. 

बदाम तेलाचा मास्क (Almond Oil Mask)

Almond Oil For Homemade Mask – Freepik.com

साहित्य 

  • 1 मोठा चमचा बदामाचे तेल
  • 1 मोठा चमचा बेसन
  • 1 लहान चमचा गुलाबपाणी 

कृती 

  • एका बाऊलमध्ये बदामाचे तेल, बेसन आणि गुलाबपाणी मिक्स करून त्याची पेस्ट तयार करून घ्या 
  • आता ही पेस्ट तुम्ही स्तनांवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा
  • यानंतर तुम्ही 15 मिनिट्स स्तनांवर मास्क तसाच राहू द्या आणि त्यानंतर पाण्याने स्वच्छ करा. हा घरगुती उपाय तुम्ही रोजदेखील वापरू शकता अथवा आठवड्यातून 2-3 वेळाही वापरू शकता. 

या गोष्टींची घ्या काळजी 

  • तुमची त्वचा संवेदनशील असेल तर वर सांगितलेल्या उपायांचा तुम्ही वापर करू नका 
  • तुम्ही जर बाळाला दूध पाजत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही अशा घरगुती उपायांचा वापर करू नका 
  • तुमची कोणतीही ब्रेस्ट ट्रिटमेंट (Breast Treatment) अर्थात स्तनांवर उपचार चालू असतील तर कोणत्याही तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणताही मास्क लावू नका 
  • पॅच टेस्ट केल्याशिवाय कोणतेही पदार्थ वापरू नका 

Leave a Comment