स्तनाच्या कर्करोगासाठी इम्युनोथेरपी उपचार पद्धती अधिक प्रभावी

स्त्रियांना नेहमी स्तनांचे स्वपरीक्षण करणे आणि स्तनातील गाठीबाबत जागरुक राहण्यास सांगितले जाते. स्तनांचे नियमित स्वपरिक्षण करणे हे गाठ लवकर ओळखण्यासाठी आणि त्यानंतरच्या तपासण्या तसेच कर्करोगावर मात करण्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जातात. उपचारांमधील प्रगतीमुळे स्तनाचा कर्करोग असलेल्या महिलांमध्ये जगण्याचे प्रमाण वाढले आहे. तरी देखील भारतीय महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) पहिल्या क्रमांकावर आहे. डॉ. प्रदीप महाजन, रीजनरेटिव्ह मेडिसिन एक्स्पर्ट, स्टेमआरएक्स बायोसायन्स सोल्युशन्स प्रा. लि., नवी मुंबई यांच्याकडून आम्ही अधिक जाणून घेतले. 

इम्युनोथेरपी सर्वात प्रभावी उपचार पद्धत

सौजन्य – Freepik.com

कर्करोग म्हणजे पेशींच्या अनियंत्रित गुणाकार जी गोष्ट रोगप्रतिकारक यंत्रणा प्रभावीपणे हाताळू शकत नाही. अशाप्रकारे, कर्करोगाच्या थेरपीतील अलीकडील प्रगतीने कर्करोगाच्या पेशींवर विशेषतः आक्रमण करण्यासाठी रोगप्रतिकारक पेशींना प्रशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला आहे.कर्करोगाच्या पारंपारिक उपचारपद्धतींचा संबंध केस गळणे, वजन कमी होणे, अस्वस्थता इत्यादींशी आहे. यामागील कारण म्हणजे केमोथेरपी/रेडिओथेरपी यांसारख्या उपचारांमुळे केवळ कर्करोगाच्या पेशीच नव्हे तर सामान्य पेशींना देखील लक्ष्य केले जाते. 

प्रगत उपचारांपैकी इम्युनोथेरपी सर्वात प्रभावी उपचार पद्धत ठरत आहे.  ही शरीरातील अनावश्यक गाठी, पेशी तसेच शरीराबाहेरील विषाणूंविरोधात लढण्याचे काम पांढऱ्या पेशी करीत असतात. टी लिम्फोसाइट्स या त्यातील एक प्रकारच्या पांढऱ्या पेशी. कर्करोगाच्या पेशी शरीरात अनेकदा काही कारणास्तव लपून बसलेल्या असतात. त्या पेशी शोधणे आणि त्यांना नष्ट करण्याचे काम आव्हानात्मक असते. टी लिम्फोसाइट्स या पांढऱ्या पेशींना कर्करोग पेशींचा शोध घेणे अवघड जाते. त्या वेळी इम्युनो थेरपीचे इंजेक्शन दिले जाते. त्याला ‘चेक पॉइंट इनक्युबेटर’ असे म्हटले जाते. लपलेल्या कर्करोग पेशी अथवा गाठींना शोधून काढण्याचा याद्वारे प्रयत्न केला जातो. त्यानंतर कर्करोग पेशी मारण्याचे काम केले जाते. त्यासाठी थेरपीचा वापर सुरू आहे.

उपचार कमीत कमी आक्रमक

स्तनाचा कर्करोग (आणि इतर कर्करोग) मध्ये, इम्युनोथेरपीचा उद्देश शरीरातील रोगप्रतिकारक पेशींना कर्करोगाच्या पेशींशी लढण्याकरिता लक्ष्य करण्यासाठी मदत करतात. या थेरपीद्वारे केले जाणारे उपचार कमीत कमी आक्रमक असतात. रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपणासाठी पेशी तयार करणे ही मुख्यतः प्रयोगशाळेची प्रक्रिया आहे. रक्त मिळवणे आणि पेशींचे प्रत्यारोपण हे इंट्राव्हेनस इंजेक्‍शनद्वारे केले जाते, जे रक्त तपासणी सारखेच असते, असे डॉ. महाजन सांगतात.

कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर उरलेल्या दोषांची पुनर्रचना करण्यासाठी स्टेम पेशींचा वापर करणे हा दुसरा उपचार आहे. इम्युनोथेरपी (Immunotherapy) आणि स्टेम सेल (Stem Cell) उपचारांमुळे पारंपारिक उपचारांचे दुष्परिणाम कमी होण्यासोबतच स्तनाचा कर्करोग असलेल्या रुग्णांचे जीवनमान सुधारते असेही डॉ. महाजन यांनी स्पष्ट केले.

स्तनाच्या कर्करोगावर मात करणे शक्य, तज्ज्ञांचे मत

गर्भधारणेत अडचणी येणाऱ्या महिलांकरिता फॉलिक्युलर स्टडीचे महत्त्व

मधुमेही रूग्णांसाठी पोहे वा इडली काय आहे योग्य पर्याय

Leave a Comment