तुम्हालाही सतत लघ्वीला जावं लागतंय का, काय आहे कारण

शरीरामध्ये ज्या क्रिया होतात त्याचा सरळ परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. कोणत्याही गोष्टी कमी जास्त व्हायला लागल्यावर तुम्हाला वेळीच स्वतःच्या तब्बेतीकडे लक्ष द्यायला हवं. असंच सर्वात जास्त लक्ष द्यावं लागतं ते म्हणजे लघ्वीकडे. तुम्हाला सतत लघ्वी होत असेल विशेषतः रात्रीच्या वेळी ही समस्या असेल तर वेळीच तुम्हाला तुमच्या तब्बेतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. यामुळे अनेक गंभीर आजर वाढण्याची शक्यता असते. तुम्हाला पण रात्री दोन – तीन वेळा लघ्वीला जाण्यासाठी उठावं लागतं का? तर यावर तुम्ही वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे. सतत लघ्वी होत असेल तर मधुमेह (Diabetes) आणि रक्तदाब (Blood Pressure) सारख्या गंभीर समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागते. तुम्हीदेखील या समस्यांनी ग्रस्त असाल तर याचे कारण समजून घ्या आणि वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या. 

तज्ज्ञ काय सांगतात?

सतत तुम्हाला लघ्वीला (Unusual Peeing) होत असेल तर तज्ज्ञांच्या मते त्याची दोन कारणे आहेत, एक म्हणजे तुमच्यातील कमजोरी आणि तुमच्या शरीरात अधिक मुत्राचे उत्पादन निर्माण होणे. हे अनेक कारणांमुळे घडू शकते. मधुमेहापासून ते हृदयरोगांपर्यंत नोक्टुरियाच्या समस्येच्या कारणामुळेही हे घडते. तुम्हाला असे संकेत मिळू लागल्यावर तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका. वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि उपचाराला सुरूवात करा अन्यथा हे गंभीर झाल्यावर यामध्ये अनेक गुंतागुंत होण्याचीही शक्यता असते. 

https://dazzlemarathi.com/2022/10/06/increasing-prevalence-of-viral-diseases-anxiety-during-festive-season-in-marathi/

रक्तदाब वाढण्याचे लक्षण 

सौजन्य – Freepik.com

जपानी सर्क्युलेशन सोसायटीच्या वार्षिक वैज्ञानिक चर्चेमध्ये 2019 मध्ये सांगण्यात आलेल्यानुसार, ज्या व्यक्ती रात्री एकापेक्षा अधिक वेळा रात्री लघ्वीला जावं लागत असल्यास, त्यांच्यामध्ये 40 टक्के रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. अर्थात हे अगदी रक्तदाबाचे योग्य कारणच आहे असं नाही पण काही कारणांपैकी हे एक कारण ठरू शकते. उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा समस्येच्या वेळी तुम्ही त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. 

मधुमेहाचे संकेत 

मधुमेह असल्यास, सतत लघ्वीला जावं असं वाटत राहातं. मधुमेही रूग्ण असल्यास, अतिरिक्त ग्लुकोज (Glucose) अथवा ब्लड शुगर (Blood Sugar) तुमच्या किडनीमध्ये जाते आणि मग त्यामुळे लघ्वी सतत होण्याची इच्छा तुम्हाला होत राहाते. तुम्हाला अशा पद्धतीची कृती आपण सतत करत आहोत असे जाणवत असेल तर तुम्हाला तुमची लघ्वी नक्कीच तपासून घ्यायला हवी. मधुमेहाची ही अवस्था असेल तर तुम्ही वेळीच सावध व्हायला हवे. कारण याचा किडनी, डोळे आणि शरीरातील इतर अंगांवरही दुष्परिणाम होऊ शकतो आणि कधी कधी मधुमेह अति झाल्यास, तुमची दृष्टी जाण्याचीही शक्यता असते. तसंच तुम्हाला साखरेचे अॅडिक्शन असेल तर तेही कमी करायला हवे.

रक्तदाब आणि मधुमेह वाढल्यास, तुम्हाला लघ्वीला सतत जावं लागतं. त्यामुळे तुम्ही किमान दर तीन महिन्यांनी तरी तुमच्या शरीरातील साखरेची पातळी तपासून घ्यायला हवी आणि त्यानुसार तुमच्या खाण्यावर तुम्ही नियंत्रण ठेवायला हवे. जेणेकरून तुमचे लघ्वीला जाण्याचे प्रमाणही कमी होऊ शकते. 

Leave a Comment