Diwali 2022: भाऊबीज साजरी करताना या दिशेला असावे भावाचे तोंड, लक्षात ठेवा

Bhaubeej 2022: कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्ष द्वितीया तिथीला भाऊबीज हा सण साजरा करण्यात येतो. यावर्षी 26 ऑक्टोबर, 2022 रोजी भाऊबीज साजरी करता येणार आहे. दिवाळी 2022 (Diwali 2022) मध्ये भाऊबीज हा दिवस भावाबहिणींसाठी नक्कीच खास असतो. भाऊबीज या दिवसाला यमद्वितीया, भाईदूज असेही म्हटले जाते. दिवाळीच्या शेवटच्या दिवशी हा भाऊबीज साजरी करण्यात येते. भावाला बहीण ओवाळते आणि त्याच्या आयुष्यासाठी प्रार्थना करते. कपाळावर टिळा लावण्यात येतो आणि मग ओवाळणी म्हणून बहिणीला भाऊ तिच्या आवडीच्या भेटवस्तू देतो. भावाला टिळा लावल्याने त्याचे आयुष्य वाढते आणि त्याला सुख, संपन्नतेचा आशिर्वाद मिळतो असा पूर्वपरंपरागत समज आहे. मान्यतेनुसार, भाऊबीजेच्या मुहूर्ताव्यतिरिक्त अजून काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणेही आवश्यक आहे. याबाबत आपण जाणून घेऊया. 

ओवाळणीच्या वेळी लक्षात ठेवा या गोष्टी 

सौजन्य – Freepik.com

भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला ओवळताना त्याच्या कपाळावर टिळा लावून त्याला ओवाळते. मात्र हा टिळा लावताना भावाचे तोंड नक्की कोणत्या दिशेला आहे याची तुम्ही काळजी घेणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासानुसार, भावाचे तोंड हे उत्तर अथवा उत्तर – पश्चिम या दिशेला आणि बहिणीचे तोंड हे उत्तर – पूर्व अथवा पूर्व दिशेला असायला हवे. तसंच भावाने वा बहिणीने ओवाळण्यापूर्वी काहीही खाणे योग्य नाही. भाऊबीज झाल्यानंतर खावे असेही म्हटले जाते. 

Diwali Festival 2022: वसुबारस ते भाऊबीज – शुभ मुहूर्त आणि तिथी

भावाला कसे ओवाळावे 

  • भावाला ओवाळण्यासाठी भाऊबीजेला सर्वात पहिले रांगोळी काढावी
  • त्यावर लाकडी पाट वा चौकोनी पाट ठेऊन त्यावर भावाला बसवावे. भावाचे तोंड योग्य दिशेला वर सांगितल्याप्रमाणे असेल की नाही याची खात्री करून घ्या 
  • त्यानंतर भावाला टिळा लावा आणि अक्षता त्याच्या डोक्यावर घालून त्याला आशिर्वाद द्या 
  • ताम्हनामध्ये असलेल्या सुपारीने त्याची दृष्ट काढा आणि त्यानंतर दिव्याने त्याला ओवाळा आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करा 

Diwali 2022: सूर्यग्रहणाचा लक्ष्मीपूजनावर काय होणार परिणाम

भाऊबीजेला भावाबहिणीने करू नका या चुका 

  • भाऊबीजेच्या दिवशी कधीही आपल्या भावाबहिणीसह भांडू नका 
  • भावाकडून जे काही भेटवस्तू म्हणून मिळेल त्याचा कायम आदर करा. आनंदी राहा. नाखूष होऊ नका 
  • भावाला ओवाळण्यापूर्वी बहिणीने काही खाऊ नये. भावानेही काही खाऊ नये 
  • या दिवशी भावाबहिणीने कधीही एकमेकांशी खोटं बोलू नका 
  • भाऊबीजेच्या दिवशी भावाबहिणींपैकी कोणीही काळे कपडे घालू नयेत

भाऊबीज हा भावाबहिणीच्या नात्याचा अत्यंत पवित्र दिवस आहे. इतर वेळी कितीही भांडण असले तरीही या दिवशी एकमेकांवरील प्रेम आणि आदर नक्की व्यक्त करा. दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा! (Happy Diwali)

Diwali 2022: दिवाळीची साफसफाई करण्यासाठी सोप्या टिप्स आणि ट्रिक्स

Leave a Comment