Bigg Boss मराठी : घरात राखीचा नुसता राडा

 राखी सावंत ( Rakhi Sawant ) जिथे जाईल तिथे राडा होणार नाही असे मुळीच होणार नाही. अनेक जण बिग बॉसच्या हिंदी सीझनमध्ये राखी येण्याची वाट पाहात होते.  पण राखीने यंदा सगळ्यांनाच चांगला धक्का दिला आहे. राखीला चक्क मराठी बिग बॉसमध्ये पाहून अनेकांनी बिग बॉस मराठी पाहण्याची सुरुवात केली आहे. राखी ज्या दिवसापासून मराठी बिग बॉसच्या घरात आली आहे. त्या दिवसापासून तिने धुमाकूळ घातला आहे. घरात जे काही टास्क सुरु आहेत. त्या सगळ्या टास्कमध्ये राखी आपली एंटरटेन्मेंटची बाजू काही सोडायला तयार नाही. त्यामुळे दिवसेंदिवस या खेळात मजा येऊ लागली आहे.

चँलेजर ही आणि मनोरंजनही

घरात एक प्रकारची मरगळ किंवा तोच तोच पणा आला की, bigg boss च्या घरात कायमच वाईल्ड कार्ड किंवा चॅलेंजर्स पाठवले जातात. राखी सावंत (Rakhi Sawant) चॅलेंजर्स म्हणून घरात आली आहे. तिचे येणेच अनेक जणांसाठी धक्कादायक असे होते. राखी कितीही हिंदीत बोलत असली तरी देखील ती मराठी आहे हे विसरायला नको. राखीला फार कमी वेळा मराठी बोलताना ऐकले असेल पण आता ती या घरात कायम मराठी बोलताना दिसते. तिची मराठी मोडकी तोडकी असली तरी ते ऐकण्याची इच्छा होते, असे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. राखी काहीही बोलली तरी देखील त्यातून इंटरटेन्मेंट झाल्यावाचून राहात नाही. 

राखी आहे फटकळ

राखी ही फटकळ आहे हे आपण सारेच जाणतो. तिला अगदी काहीही बोलायचे असेल तर तिचे मत अगदी स्पष्ट असते. तिचे घरात अद्याप कोणाशीही चांगले नाही किंवा वाईटही नाही. तिला जी लोक आवडतात त्यांच्याशी तिचे चांगलेच नाते दिसून आले आहे. तिला जर कोणती गोष्ट आवडली तर ती नक्कीच त्याची बाजू घेताना दिसते. घरात सध्या कॅप्टन्सी टास्कची चढाओढ सुरु असताना दिसली आहे.  कॅप्टन्सीसाठी तिने विकासला आपले मत दिले त्यामुळे घरातील काहींना त्रास झाला खरा पण राखीने आपली बाजू काही केल्या बदलली नाही. ती आपल्या मताशी ठाम राहली. 

राखीला जोड मीराची

चॅलेंजर म्हणून या घरात राखीसोबत गेल्या सीझनची मीरा ही देखील आली आहे. मीरा गेल्या सीझनमध्ये आली होती. त्यावेळीही तिची बरीच नाटकं होती. पण खेळात तिचा हात कोणी धरु शकत नव्हता. आता राखी- मीरा काही बाबतीच निर्णय घेताना एकत्र दिसत आहेत. काहीही झाले की, एकमेकांची साथ देताना दिसत आहे. त्यामुळे त्यांची एक वेगळी मैत्री पाहण्यास नक्कीच मजा येतेय. 

आता राहिला प्रश्न राखीचा तर ती या घरात असेपर्यंत मजा करतच राहणार आहे. 

Leave a Comment