जिथे तिथे राणा दा आणि पाठक बाईंच्या लुकची चर्चा

सध्या सगळ्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती राणा दा आणि पाठक बाई यांच्या लग्नाची. त्यांच्या लग्नातले अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होताना दिसत आहे. एखाद्या सेलिब्रिटीचे लग्न म्हटले की, त्यांनी नेमका कोणता ट्रेंड फॉलो केला हा प्रश्न अगदी स्वाभाविकपणे सगळ्यांना पडतो.  अक्षया आणि हार्दिक (#अहा ) (Hardeek Joshi & Akshya devdhar) यांच्या लग्नातील सगळे बारकावे पाहिल्यानंतर त्यांचे लग्न एकदम छान प्लॅन्ड होते असे दिसून येते. त्यांच्या लग्नसोहळ्यातील सगळे कपडे आणि स्टाईल या एकदम युनिक आणि तितक्याच सुंदर देखील होत्या. चला जाणून घेऊया याचे काही अपडेट

मेंदी लुक

अक्षयाचा मेंदीचा लुक सध्या सगळीकडे वायरल होत आहे. तिच्या मेंदीसाठी तिने खास जांभळ्या रंगाचा लेहंगा घातलेला दिसत आहे.  जांभळ्या रंगाची चोळी आणि मल्टी कलरचा लेहंगा, हा लुक पूर्ण करण्यासाठी तिने त्यावर फ्लोरल ज्वेलरी घातलेली दिसत आहे. तिचा मेकअप पाहाल तर तो ही एकदम परफेक्ट असा आहे.  तिच्या लग्नाच्या सगळ्याच कार्यक्रमात केलेले मेकअप लुक हे नक्कीच वेगळे आणि खास आहेत. मेंदीच्या लुकमध्ये तिने चोळीच्या शेडचा आयशॅडो डोळ्याखाली लावला आहे. जो अधिक खुलून दिसत आहे. 

संगीत लुक

 अक्षया- हार्दिकची संगीत पार्टी ही देखील खूपच मस्त आणि चांगली होती.  संगीत पार्टीत अक्षयानो जो गाऊन घातला होता. त्याचा रंग आईस ब्लू आणि ग्रे यांच्यामध्ये होता. अक्षयाने या ड्रेसचा रिचनेस अधिक वाढवला आहे तो त्याच्यासोबत घातलेल्या ज्वेलरीजनी.शिवाय तिची हेअरस्टाईल ही देखील या दरम्यान ओपन हेअर प्रकारातील आहे.  दोघांनीही या दरम्यान सारख्याच रंगाचे कपडे घातले होते. हार्दिकने सूट घातला होता. हा सूट संगीत नाईटसाठी एकदम परफेक्ट दिसत होता. 

हळदीचा लुक

अक्षया आणि हार्दिक यांचा हळदीचा लुक हा जरी साधा वाटत असला तरी देखील अक्षयाचा मेकअप हा नक्कीच पाहण्यासारखा होता. हार्दिकने पांढरा कुडता- पायजमा घातला आहे. तर अक्षयाने पांढऱ्या रंगाचा पटियाला ड्रेस घातला आहे. त्यावर पांढरी फ्लोरल ज्वेलरी आणि या सगळ्या लुकला कॉम्प्लिमेंट देणारी तिची जुती ही नक्कीच खूप सुंदर होती.

लग्नाचा लुक

अक्षया- हार्दिकचे लग्न हे वैदिक पद्धतीने झाले आहे. कारण तिने लग्न लागताना म्हणजे वरमाळेच्या वेळी पिवळ्या रंगाची डिझायनर साडी नेसली आहे. सिल्क प्रकारातील ही साडी असून त्यावरील ब्लाऊज ही डिझायनर आहे. त्यावेळी हार्दिकने थोडी फॅन्सी अशी जोधपुरी घातली आहे. ती मोती रंगाच्या शेडमध्ये आहे. यातील त्यांचा एक व्हिडिओही वायरल झालेला दिसत आहे. लग्नाचा तिचा नऊवारीसाडीचा लुकही तितकाच वायरल होताना दिसत आहे. अक्षयाने लाल रंगाची नेसलेली पैठणी साडी आणि त्यावरील ट्रेडिशनल पद्धतीचे दागिने खूपच सुंदर दिसत आहे. तिने खास डिझायनर ज्वेलरीचा वापर यामध्ये केलेला आहे. तर हार्दिकने या वेळी अक्षयाच्या साडीला मॅच होईल असा गोल्डन कुडता आणि लाल रंगाचे पैठणीचे धोतर घातले आहे. जे खूपच सुंदर दिसत आहे. लग्नाच्या रिसेप्शनसाठी दोघांनी जांभळ्या रंगाची थीम कॅरी केली आहे. यामध्ये अक्षयाचा लेहंगा- चोळी आहे तर हार्दिकनेही तोच रंग कॅरी केला आहे. 

एकूणच अक्षया- हार्दिक यांच्या लग्नातील एकूण एक गोष्ट परफेक्ट आणि सुंदर आहेत. तुमचेही लग्न येत्या काळात असेल तर तुम्ही देखील यातील काही गोष्टी नक्की कॅरी करु शकता. 

Leave a Comment