Bigg Boss 16 : गोल्डन बॉईजच्या एन्ट्रीमुळे घरात बदलणार का समीकरणं

Bigg Boss 16 मध्ये आता खरा खेळ सुरु झाला आहे. 50 दिवस या घरात टिकून राहिल्यानंतर आता उरलेल्या स्पर्धकांमध्ये टॉप 5 ची चुरस रंगली आहे. पण तेथे पोहचणे आता काही स्पर्धकांसाठी सोपे नसणार आहे. कारण आता खेळाला खरी रंगत येणार ते म्हणजे वाईल्ड कार्ड एंट्रीमुळे. मराठीमध्ये 4 धमाकेदार वाईल्ड कार्ड एंट्री झालेल्या आहेत. पण आता हिंदीच्या सीझनमध्ये वाईल्ड कार्ड म्हणून जाण्यासाठी गोल्डन बॉईज (Golden Boys) सज्ज झाले आहेत. त्यांचा एक प्रोमो सध्या खूपच जास्त वायरल होताना दिसत आहे. शिव ठाकरेनंतर मराठीतील दोन दमदार व्यक्ती यामध्ये जाणार आहेत. बिग बॉसचा अनुभव त्यांना नसला तरी त्यांना खऱ्या आयुष्यात किंगसारखे कसे जगायचे हे नक्कीच माहीत आहे. त्यांच्या या एंट्रीनंतर घरात अनेक समीकरण बदलताना दिसणार आहे. ज्याचा फायदा काही स्पर्धकांना तर काहींना नक्कीच तोटा होणार आहे यात काही शंका नाही

स्टॅनला मिळाला आधार

गोल्डन बॉईज अर्थात सनी वाघचौरे (sunny waghchoure) आणि संजय गुजर (sanjay Gujar) हे पुण्याचे आहेत. त्यांच्याच पी टाऊनचा म्हणजे पुण्याचा ते भाग आहेत. त्यामुळे अर्थात स्टॅनसोबत त्यांची मैत्री असणे स्वाभाविक आहे. स्टॅन आणि त्यांचे आधीपासून चांगले संबंध आहेत. हे नक्कीच त्यांच्या काही जुन्या पोस्टमधून दिसतात. घरात जर कोणी स्टॅनला साधासुधा समजत असेल तर त्याने आता जरा लांबच राहण्याची गरज आहे. कारण आता स्टॅनला आधार देण्यासाठी आणखी चार हात वाढले आहेत. त्यामुळे स्टॅनचा खेळ आता अधिक चांगला होईल असा विश्वास सगळ्यांना आहे. 

शिवसोबतही होईल चांगली बाँडिंग

 शिव आणि गोल्डन बॉईज यांची बाहेरची ओळख आहे. हे जरी खरे असले तरी मराठी हा एक धागा या सगळ्यांना चांगलाच जोडून धरणारा आहे. त्यामुळे ही चौकट या घरात पाहायला मिळणार आहे यात काही शंका नाही. पण आता घरात त्यांचे सगळ्यांशी चांगले समीकरण दिसून आले आहे. त्यांनी अजूनतरी कोणाशीही वाकडे घेतलेले नाही. या घरात ते काही काळासाठी वास्तव्यासाठी आलेले आहेत. त्यांच्या स्पर्धकांनी घालवलेली धनराशी आहे. त्यासाठी या घरात पासकोड मिळेपर्यंत गोल्डन बॉईज राहणार आहे. 

मराठीत राखी घालतेय धिंगाणा

राखी सावंत आणि बिग बॉस हे समीकरण अगदी ठरलेलं आहे. असे असताना यावेळी राखी सावंत(Rakhi sawant) हिंदी सीझनमध्ये येईल अशी अपेक्षा अनेकांना होती. पण झाले उलटेच राखी सावंत चक्क मराठी बिग बॉसमध्ये आली आहे. चार वाईल्ड कार्ड एंट्रीपैकी राखी ही एक असून तिच्या येण्याने मराठीच्या सीझनमध्ये एंटरटेन्मेंटचा चांगलाच तडका अनुभवायला मिळत आहे. 

दरम्यान तुम्हाला गोल्डन बॉईजच्या एंट्रीमुळे नेमका काय बदल होईल असे वाटते. हे कमेंटकरुन नक्की कळवा.

Leave a Comment