नवरीसाठी 25 बेस्ट उखाणे (Marathi Ukhane)

 सध्या लग्नाचा सीझन सुरु आहे. तुमच्याही जवळच्या व्यक्तींची या काळात नक्कीच लग्न असतील. इतकेच काय तर तुमचेही लग्न या काळात असेल तर तुमची चांगलीच लगबग सुरु असेल. लग्न म्हटले की, लग्नाची खरेदी, त्वचेची काळजी, मेकअप या सगळ्या गोष्टी आल्याच. पण त्यासोबतच महत्वाचे असतात ते म्हणजे उखाणे. हो! कारण लग्नात अनेकदा उखाणे घेण्याची वेळ येते. सगळ्यानांच उखाणा येतो असे नाही. ज्यांना यमक जुळवता येते त्यांना पटकन उखाणा घेता येतो. पण काहीजणांना काही केल्या उखाणा काही जमत नाही. अशांसाठी ऑनलाईन उखाणे शोध्याशिवाय पर्याय नसतो. अशाच आमच्या मैत्रिणींसाठी खास 25 मराठी उखाणे आम्ही शोधून काढले आहेत. हे उखाणे तुम्हाला नक्कीच आवडतील. 

नवरीसाठी 25 बेस्ट उखाणे ( Best Marathi Ukhane)

नवरीसाठी बेस्ट उखाणे म्हणताना ते उखाणे एकदम हटके आणि पाठ करायलाही सोपे असायला हवेत. हे आम्ही जाणतो म्हणूनच सोपे पण तितकेच वेगळे उखाणे आम्ही शोधून काढले आहेत.

नवरीसाठी खास उखाणे
  1. मोगऱ्याच्या गजऱ्याचा मस्त सुटलाय सुंगध 

_______सोबत मला मिळाला जीवनाचा खरा आनंद

  1. आनंदाने भरला दिन हा लग्नाचा
    ____ रावांना घास देते गोड जिलेबीचा
  2. सोन्याची अंगठी, रुप्यांचे पैंजण
    _____ रावांचे नाव घेतेय ऐका सारेजण
  3. सासरचे निरंजन, माहेरची फुलवात
    ______ रावांचे नाव घ्यायला आजपासून करते सुरुवात
  4. नव्या आयुष्याची नवी गाणी
    ___ च्या घराण्यात ___ रावांची झाले मी राणी
  5. हिरव्यासाडीला पिवळा काठ जर तारी,
    ____ रावांचे नाव घेते शालू नेसते भरजरी
  6.  आकाशात असतात ब्रम्हा, विष्णू, महेश
    ____ रावांचे नाव घेऊन करते मी गृहप्रवेश 
  1.  सूर्यबिंबाचा कुमकुम तिलक,पृथ्वीच्या भाळी,
    ____ रावांचे नाव घेते ___ च्या वेळी
  2. चांदीच्या वाटीत सोन्याचा चमचा
    ____  रावांचे नाव घेते आशीर्वाद मिळो तुमचा
  3.  माहेरच्या ओढीने डोळे येतात भरुन
    ____ रावांच्या संसारात मन घेते वळून
  4. नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा
    ____ रावांचे नाव असते ओठांवर पण प्रश्न असतो उखाण्याचा 
  5.  घराला असावं अंगण, अंगणात असावी तुळस,
    ____ रावांच्या उपस्थितीत संसारात चढवीन आनंदाचा कळस
  6. अलंकारात अलंकार मंगळसूत्र हे मुख्य
    ____ रावांच्या आनंद हेच माझे सौख्य
     
  7. निळ्या निळ्या आकाशात तारे चमकतात सारे
    ___ रावांचे नाव घेते लक्ष द्या सारे
     
  8.  इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून
    ____ चे नाव घेते ___ यांची सून
  9.  फुलात फुल जाईचे फुल
    ____ रावांनी घातली मला भुल
     
  10.  पत्रिका जुळल्या योग आला जुळून,
    ______  राव पती मिळावे म्हणून नवस केला कुलदैवतेला स्मरुन
  11.  लाल चुटूक मेंदी, हिरवागार चुडा,
    ____ रावांसाठी जीव झाला वेडा 
  12.  सोन्याच्या साखळीत शोभतात काळे मणी
    ____ राव झाले माझे सौभाग्याचे धनी
  13.  चांदीच्या ताटात पक्वान्नांची रास
    _____ रावांना देते मी लाडूचा घास
  14.  दाराच्या चौकटीला गणपतीचं चित्र
    _____ मुळे मला मिळाले सौभाग्याचे मानपत्र
  15. आला श्रावणमास, पाऊस पडला शेतात
    _____ रावांचे नाव घेते धनधान्यसंपन्न घरात
     
  16.  कस्तुरीचा सुवास दरवळतो रानात
    ____ रावांचा आयुष्यभर राहो संसारात
  17.  लग्नात लागतात हार आणि तुरे
    _____ रावांचे नाव घेण्याचा आग्रह आता पुरे
  18. सासरची छाया, माहेरची माया
    ____ आहेत ना माझे सगळे हट्ट पुरावया 

आता तुम्हालाही असा मस्त उखाणा घ्यायचा असेल तर हे उखाणे शेअर करायला अजिबात विसरु नका

नवरीसाठी खास उखाणे

Leave a Comment