Bigg Boss 16: सिद्धार्थ शुक्ला योग्य तर शिव ठाकरे चुकीचा कसा?

‘साम, दाम, दंड, भेद’ हे बिग बॉस 16 (Bigg Boss 16) मध्ये आपण दर शनिवारी ऐकतोच. त्यामुळे जर या गोष्टी असतील तर शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि अर्चना गौतम(Archana Gautam) यांच्या भांडणातील मुद्दे स्पष्ट करायला हवेत. सध्या शिव योग्य की अयोग्य अशी चर्चा रंगली आहे. तर अनेकांनी अर्चनाला पुन्हा घेऊन या असेही म्हटले आहे. काही प्रेक्षक आणि सेलिब्रिटी शिव ठाकरेला पाठिंबाा देत आहेत तर काही जण अर्चनाला. शिवने अर्चनाला उकसवले असं म्हटलं जात आहे पण मग अर्चनाने शिवचा गळा पकडणं योग्य होतं का? या सगळ्या बिग बॉसच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध स्पर्धक सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla) याची क्लिप सध्या व्हायरल होत आहे. यामुळे अर्चना गौतम अर्थात ‘सिलबट्टा क्वीन’ चुकीची आहे हेच सिद्ध होत आहे. अर्चना गौतम पुन्हा बिग बॉसमध्ये येणार हे आता बोलले जात आहे. पण त्याआधी शिव ठाकरे कसा योग्य आहे यासाठी काही मुद्दे –  

1. शिवने केली प्लॅनिंग…पण हेच तर बिग बॉसमध्ये अपेक्षित आहे

शिव ठाकरेचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अर्चनाचा ट्रिगर पॉईंट काय आहे हे आपल्याला माहीत असल्याचे शिव सांगत आहे. ‘पार्टी आणि दीदी’चे नाव ऐकून अर्चना भडकते हे शिवला माहीत होते. तिच्यासमोर हे शब्द बोलून हसत निघून जायचे त्यावर अर्चना चिडते हे शिवला माहीत होते. त्यामुळे अर्चनाला काढण्याचे प्लॅनिंग शिवने आधीच केले असे त्याचे विरोधक म्हणत आहेत. पण मग अशा पद्धतीने विरोधी प्रतिस्पर्ध्याविरूद्ध प्लॅनिंग करणे चुकीचे आहे का? तर अजिबात नाही. कारण बिग बॉसमध्ये प्लॅनिंग स्ट्रॅटेजी गेम खेळणं हेच महत्त्वाचं आहे. बाकी स्पर्धकही हेच करतात. फरक फक्त इतकाच आहे की, शिवने कॅमेऱ्यासमोर हे व्यक्त केले आणि बाकी आपल्या मनात ठेवतात. 

2. उकसवण्यात वाईट काहीच नाही 

सध्या सोशल मीडियावर #ArchanaGautam #ShivThakare हे सध्या ट्रेंड होत आहे. मात्र शिवने अर्चनाला उकसवले असे अनेक जणांचे म्हणणे आहे. पण कोणत्याही स्पर्धकाला उकसवणे हे चुकीचे नाही. अर्चनादेखील आल्या दिवसापासून अनेकांना उकसवत आहे. मग शिवच्या बाबतीत वेगळे नियम का? या शो मध्ये टिकण्यासाठी एखाद्याला उकसवणे, भांडणे आणि आपली बाजूने सिद्ध करणे हाच खेळ आहे. सिद्धार्थ शुक्लानेही तेच केले आणि तो टिकून राहिला. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ‘या घरात एकमेकांना शिव्या देणं चुकीचे नाही, जर दुसरा सदस्य ट्रिगर होत असेल तर हा तुमचा विजय आहे, हा त्याचा वीक पॉईंट असेल तर त्याची चूक आहे’. 

3. शिवचा शांतपणा प्रेक्षकांना आवडतोय 

इतके भांडण झाल्यानंतरही शिवने स्वतःवरील नियंत्रण अजिबात सोडले नाही. आपला हात घट्ट आवळून धरत आपल्याकडून कोणतीही चूक होऊ नये याची खात्री शिवने या भांडणात केली. इतकंच नाही तर अर्चनाच्या अशा भयानक वागण्यानंतरही अर्चनाला आपला धक्काही लागू नये याची काळजी शिवने घेतली. शिवने तिच्यावर हातही नाही उचलला. अशा भांडणात त्याने आपल्या रागावर नियंत्रण ठेवले याबाबत सध्या शिवची सगळीकडे वाहवा होत आहे. मागच्या सीझनमध्ये पाहिल्यास लक्षात येईल की एकाने हात उचलल्यावर समोरच्या सदस्यानेही हात उचललेला दिसून आला आहे. मात्र शिवच्या रागावरच्या नियंत्रणाबाबत सर्वांनीच शिवला मानले आहे. 

4. अर्चनाचे नियंत्रण सुटले…

कोणीही कितीही उकसवले तरीही आपला हात आणि राग नियंत्रणात ठेवणे हीच या घरातील मोठी परीक्षा आहे. हिंसा करू नये आणि योग्य पद्धतीने बोलून समोरच्याचे तोंड बंद करणे हीच खरी कसोटी आहे. मात्र अर्चनाने उचललेले पाऊल ही टोकाची भूमिका आहे. त्यामुळे अर्चना ही संपूर्ण चुकीची आहे. यानंतरही भडकवणे, वैयक्तिक कमेंट करणे हे होतच राहणार आहे. पण अर्चनाची वागणूक ही कोणत्याही बाजूने योग्य नव्हती. इतकंच नाही तर आपला पॉईंट ठेवण्याची वेळही होती. शिवच्या मनात असते तर अर्चनाला दुसरी संधी मिळाली असती म्हणून शिवला सध्या ट्रोल केले जात आहे. मात्र अर्चना रडली, शिवकडे गेली. पण तिने एकदाही त्याची माफी मागितली नाही. कन्फेशन रूममध्ये जाऊन आपल्या मनात असे काहीही नव्हते असे ती सांगत होती. प्रियांका चौधरीपासून सौंदर्यापर्यंत सगळेच तिला माफी मागायला सांगत होते, मात्र अर्चनाने माफी मागितली नाही. त्यामुळे बिग बॉसनाही राग आलेला दिसून येत होता. 

6. शिवने अर्चनाचा गळा पकडला असता तर…

यासंदर्भात कन्फेशन रूममध्ये शिवने एक प्रश्न विचारला हेच जर एखाद्या मुलाने केले असते तर? उर्वशी ढोलकियानेदेखील यासंदर्भात ट्विट केले ज्याबाबात विचार व्हायला हवा. ‘हेच शिव ठाकरेने केले असते तर, त्याने अर्चनाचा गळा पकडला असता तर, तेव्हा पूर्ण सीन उलटा होता. सर्वच लोक शिवच्या विरोधात गेले असते. इतकंच नाही तर त्याच्यावर केसही झाली असती. लोक महिला आणि पुरूषांच्या बरोबरीच्या गोष्टी बोलतात, पण केवळ बोलतातच. मात्र वास्तवात गोष्ट वेगळीच आहे’

शिव आणि अर्चनाच्या बाबतीत हे मुद्दे तुम्हाला पटत आहेत का नक्की सांगा आणि कमेंट करा

Leave a Comment