Bigg Boss 16: शिव ठाकरेच्या वागणुकीमुळे ठरतोय ‘Heart Of Gold Man’

बिग बॉस 16 आता अगदी मध्यावर येऊन ठेपले आहे. 60 दिवस अर्थात दोन महिन्याच्या या काळात सर्वात जास्त प्रेक्षकांचं मन जर कोणी जिंकलं आहे तर ते म्हणजे शिव ठाकरे (Shiv Thakare) या मराठमोळ्या स्पर्धकाने. केवळ प्रेक्षकच नाही तर सेलिब्रिटीही शिवला पाठिंबा देत आहेत. त्याचा खेळ, त्याची वागणूक यामुळे तो सर्वांचा चाहता होत आहे. त्यामुळे हे पर्व शिवने जिंकायला हवं असंच सर्वांना वाटत आहे. घरात मैत्रीला जागणारा आणि शत्रुलादेखील आपली दखल घ्यायला लावणारा शिव सध्या ‘heart of gold’ म्हणून अधिक ट्रेंडिंग होत आहे. घरातील कोणत्याही मुलीशी आपलं भांडण असलं तरीही जेव्हा जेव्हा त्या व्यक्तीला गरज असेल सर्वात पहिले आधार द्यायला शिव पुढे जाताना दिसून येत आहे. अगदी प्रियांका चहर चौधरीचीदेखील शिवने घातलेली समजून ही कॅमेऱ्यावर फुटेजसाठी नव्हती तर अगदी मनापासून समजून काढण्यासाठी शिव गेलेला दिसून आला आहे. तेव्हापासूनच #shivyanka हा हॅशटॅगदेखील ट्रेंडिंग होताना दिसून येत आहे. 

सुंबुल, सौंदर्या, अर्चना, प्रियांका सर्वांसाठीच शिव राहिला उभा 

Shiv Thakare – Bigg Boss 16 Contestant

पहिल्या आठवड्यापासून घराच्या रडारवर असणारी सुंबुल असो अथवा अर्चनाबरोबरच्या भांडणानंतरही जिथे अर्चनाला मानसिक पाठिंब्याची गरज लागली असो, न विचारता स्वतःहून शिव प्रत्येकवेळी त्यांच्याबरोबर जाऊन बोलताना दिसला आहे. पण सर्वात जास्त त्याच्या या चांगल्या वागणुकीने लक्ष वेधून घेतले आहे ते म्हणजे या आठवड्यात प्रियांका आणि अंकितच्या भांडणामुळे प्रियांका अतिशय चिडचिडी झालेली दिसून आल्यानंतर तिने अंकितसह आपले भांडण मिटवावे आणि मानसिक त्रास करून घेऊ नये यासाठी शिव स्वतःहून तिच्या खोलीत आल्याचे आणि तिच्याशी याविषयी चर्चा केल्याचे दिसून आले होते. त्यानंतरच केवळ शिवचे चाहतेच नाही तर प्रियांकाचे चाहतेही शिवला पाठिंबा देऊ लागले आहेत. गौतम बाहेर गेल्यानंतरही सौंदर्याची अवस्था पाहून सर्वात पहिल्यांदा शिवनेच तिला एखाद्या चांगल्या मित्रासारखा तिला डोक्यावर हात ठेवत आधार दिला होता. जिथे जिथे गरज भासेल तिथे तिथे शिव न विचारता, न देखावा करता जाऊन बोलतो आणि यामुळेच तो सध्या सगळ्यांचे मन जिंकत आहे. 

उत्तम टास्क आणि जीवाला जीव देणारा मित्र

मराठी बिग बॉसमध्येही शिवने उत्तम टास्क खेळले होते आणि इथेही शिव जीव तोडून टास्क खेळत आहे. तर ज्यांच्याशी मैत्री केली आहे त्यांच्याशी अत्यंत लॉयल असून त्यांना योग्य पाठिंबाही देत आहे आणि त्यांचा खेळ दिसून यावा यासाठी प्रयत्नही करताना दिसून येत आहे. असं असतानाही स्वतः प्रेक्षकांचे मनोरंजन करायला अजिबात मागे राहात नाही. जीवाला जीव देणारा मित्र म्हणून सध्या शिवची ओळख निर्माण झाली आहे. तर याच त्याच्या वागणुकीमुळे अनेकांना तो अधिक प्रमाणात आवडू लागला आहे. याशिवाय एखाद्याविषयी अचूक अंदाज व्यक्त करणं यामध्येही शिवचा हातखंडा दिसून येत आहे. कोणत्याही स्पर्धकाच्या वागण्यामागे काय कारण असू शकेल आणि कोणता स्पर्धक कधी कसा वागेल याचा योग्य अंदाज शिव लावतो आणि त्याबाबत आपले मतही व्यक्त करतो आणि त्याचा हा अंदाज अत्यंत योग्य ठरतो हेदेखील खरे आहे. त्यामुळेच सध्या शिव सोशल मीडियावरही ट्रेंडिंगमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे आता शिव ठाकरे या हिंदी पर्वाचा विजेता होणार की नाही याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

Leave a Comment