बहुगुणी आवळ्याचे आश्चर्यकारक फायदे(Benefits of Eating Amla)

 थंडीचे दिवस सुरु झाले की, बाजारात ठिकठिकाणी आवळे दिसू लागतात. आंबट- तुरट अशा चवीचा आवळा शाळेबाहेर मीठ-मसाला लावून खाल्ल्याच्या अनेकांच्या लहानपणीच्या आठवणी असतील. आवळ्यापासून  गोड-तिखट- आंबट अशा वेगवेगळ्या रेसिपी बनवल्या जातात. पण आवळ्याचे अन्य फायदेही आहेत.आवळ्याला बहुगुणी उगाच म्हणत नाहीत. आवळ्यामध्ये असलेले घटक शरीरासाठी वेगवेगळ्या पद्धतीने फायद्याचे असतात. (Benefits of Eating Amla) त्यासाठी आवळ्याचे सेवन हे वेगवेगळ्या पद्धतीने करणे हे आरोग्यासाठी केव्हाही चांगले

पचनशक्ती सुधारते

पचनशक्ती सुधारण्यासाठी आवळा हा खूपच चांगला मानला जातो. आवळ्याचा रस घेतल्यामुळे अन्न पचण्यास मदत होते. ज्यांना पचनशक्तीचा त्रास आहे अशांनी नियमितपणे आवळ्याचा रस घ्यावा. ॲसिडिटी किंवा पचनाशी निगडीत असणारे आजार दूर होण्यास मदत मिळते. 

त्वचा आणि केसांसाठी चांगले

आवळा व्हिटॅमिन C ने युक्त असते. आवळ्याच्या सेवनामुळे त्वचा आणि केसांच्या समस्या दूर होतात. केसगळती आणि चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर त्यांचा मुळापासून ती समस्या दूर करण्यात मदत होते. आवळ्यामुळे त्वचा तुकतुकीत दिसू लागते. केस चमकदार दिसतात.

 मानसिक आरोग्यासाठी चांगले

आवळ्यामध्ये फायटोन्यूट्रिएंटस असतात जे मेंदूच्या पेशींना हानी पोहोचवणाऱ्या रेडिकल्सशी लढण्यास मदत करतात.  त्यामुळे मेंदूचे कार्य सुरळीत राहण्यास मदत मिळते. चांगले हार्मोन्स आणि आनंदी ठेवणारे हार्मोन्स वाढवण्यास मदत करते. 

आवळा खाण्याचे फायदे

रक्तशुद्धीकरणासाठी चांगले

 रक्तशुद्धीकरणासाठीही आवळा फार उपयुक्त आहे.आवळा खाल्ल्यामुळे शरीरात रक्ताची पातळी वाढण्यास मदत मिळते. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी आवळ्याचा रस हा फायद्याचा असतो. त्यामुळे रक्तशुद्धीकरणासाठी आवळ्याचे सेवन करायला हवे. 

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

निरोगी आरोग्यासाठी रोगप्रतिकारशक्ती चांगली असणे आवश्यक असते. वरील सगळ्या गोष्टींचे फायदे पाहता त्यामुळे निरोगी आरोग्य मिळण्यास मदत मिळते. जर तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर तुम्ही नियमित आवळ्याचा रस प्यायला हवा. 

आता बाजारात आवळा (benefits of eating amla) दिसला तर तुम्ही आवळ्याचे नियमित सेवन करा. 

Leave a Comment