Bigg Boss 16 : प्रियांकाला समजवण्यात सलमानने घालवला पूर्ण एपिसोड

Bigg Boss  च्या चाहत्यांसाठी वीकेंडचा वार हा नेहमीच खास असतो. या आठवड्याचा शुक्रवारही तितकाच खास होता. कारण या आठवड्यात बरेच काही घडले होते. पण सगळ्यांचे लक्ष होते ते अर्चना गौतम (Archana Gautam) आणि शिव ठाकरे (Shiv Thakare) यांच्या वादाचे पुढे होते काय? याकडे. कारण अर्चना आक्रमक झाल्यानंतर तिला या घरातून काढून टाकण्यात आले खरे पण काही जण त्या निर्णयानंतर शिव ठाकरेच्या विरोधात सोशल मीडियावर बरेच काही पोस्ट करु लागली. यावर वीकेंडचा वार असेल असेही दिसले होते. पण असे काहीच घडले नाही. तर शुक्रवारचा सगळा एपिसोड हा प्रियांकासाठी घालवला त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. काय झालं शुक्रवारच्या वारमध्ये चला घेऊया थोडक्यात जाणून 

प्रियांकाच्या बॉसगिरीचा झाला अतिरेक

घरात अनेकदा शिव आणि प्रियांका यांच्यामध्ये वाद झालेला दिसून आला आहे. त्यांच्यातील वाद पाहिल्यानंतर राहुल आणि रुबिना दिलैक यांची आठवण आल्यावाचून राहात नाही. यांचे वाद कायम तात्विक आणि काही मुद्द्याला घडून असतात. पण अनेकदा असे दिसून आले आहे की, प्रियांका नको त्या वेळी नको त्या विषयात अधिक बोलते. ज्यावेळी तिचे मुद्दे नसतात त्यावेळीही ती अनेकदा घरातील भांडणांमध्ये दिसून येते. तिचा वाद सुरु असताना अनेकदा अंकितला तिची बाजू घेण्यासाठी पुढे यावे लागते. त्यामुळे तिचा विषयही सुरु नसताना ती त्या भांडणात आणि तिच्यासोबत अंकित दिसून येतो. त्यामुळे घरात गेल्या काही दिवसांपासून प्रियांका ही प्रेक्षकांनाही अति वाटू लागली होती. तिचा हा अतिरेक तिला दाखवून देणे फार गरजेचे होते. म्हणूनच की, काय यंदाचा हा वीकेंडचा वार सलमानने प्रियांकावर घालवा लागला.

प्रियांकाला समजावण्यात गेला वेळ

प्रियांकाला ती काय चुकते हे सांगण्यासाठी सलमानने त्या दोघांना वेगळे बोलावले होते. प्रियांका का चुकते या बद्दल त्याने प्रेमळ शब्दात तिला सांगण्याचा प्रयत्न केला. प्रियांकाने अनेकदा त्यावरही मी अशी का हे सांगितले पण मी बदलण्याचा प्रयत्न करेन असे काही ती बोलली नाही. तसेच प्रियांका आणि अंकित चॅनेलचा चेहरा असल्यामुळे त्यांना स्पेशल वेळ देण्यात आला. घरातील इतर सदस्यांसमोर न बोलता त्या दोघांना वेगळी ट्रिटमेंट देण्यात आली. पण आता शिवचे जे काही झाले ते सगळ्यांसमोर न बोलता सलमानने त्याला बोलणे अपेक्षित आहे  असे अनेकांना वाटत आहे. याचा अर्थ प्रियांका केवळ चॅनेलचा चेहरा म्हणून तिला चांगली वागणूक आणि शिव मराठीचा विजेता म्हणून त्याला अशी वागणूक असे म्हणत अनेकांनी बिग बॉसवर टीका करायला सुरुवात केली आहे. 

शिवला ओरडा का?

बिग बॉस हा खेळ असा आहे जिथेे तुम्ही शाब्दिक सगळ्या गोष्टी करु शकता. पण येथे हिंसेला थारा नसतो. असे असताना जर एखाद्याने प्लॅन करुन जरी दुसऱ्याला भडकवले तरी त्याचा अर्थ त्याने चूक केली असे होत नाही. आता अर्चनाला दीजी असे बोलण्यानंतर आलेला रागही फारसा पटणारा नव्हता. तिच्या खासगी आयुष्यातील ती अशी गोष्ट नव्हती. अर्चनाही अनेकदा खासगी बोलते त्यावेळी तिचे तोंड दाबले जात नाही. पण आता शिवने बोलल्यामुळे चॅनेलला इतके काय लागले हे कळत नाही. जर शिवचा खेळ खराब करण्याचा तर हा डाव नाही ना? असे देखील अनेकांना वाटत आहे.

 दरम्यान आजच्या एपिसोडनंतरच याचा खुलासा होईल. 

Leave a Comment