Bigg boss 16 : वीणाच्या आठवणीत शिवच्या डोळ्यात पाणी, वीणानेही केली पोस्ट

 शिव-वीणा ही जोडी कोणाला नव्याने सांगायला नको. Bigg boss मराठीतून सुरु झालेली त्यांची मैत्री ही आपण सगळ्यांनीच पाहिली आहे. त्यांचे प्रेम पाहिले आहे. या जोडीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. घरात आल्यानंतर ते अनेक महिन्यांसाठी एकत्र होते. पण त्यानंतर त्यांच्या वेगळे होण्याच्या बातमीने सगळ्यांनाच धक्का आणि दु: ख दिले. काही वेळानंतर दोघे एकत्र दिसणे बंद झाले. पण अगदी काल- परवाच्या एपिसोडमध्ये शिवच्या तोंडी वीणाचे (Veena Jagtap) चे नाव ऐकून खूप जणांना आनंद झाला. खेळात वीणाची आठवण येणे आणि त्यानंतर वीणानेही आपल्या या खास मित्रासाठी पोस्ट करणे यामुळे सगळ्यांनाच आनंद झाला आहे.

वीणाच्या आठवणीत झाला व्याकूळ

Bigg boss चा खेळ असाच आहे या खेळात कधी कधी इतका एकटेपणा येतो की, आपली माणसं त्यावेळी आपल्याजवळ असावी असे वाटू लागते. एक ब्रेकिंग पॉईंट हा सगळ्यांचाच येतो. आपली माणसं म्हटल्यावर शिवच्या डोळ्यात अचानक पाणी आले. त्यावेळी बिग बॉसनेही त्यासमोर वीणाचे नाव घेतले. त्यावेळी लागलीच शिवही हो वीणा किंवा माझी बहीण यांच्या एका मिठीची गरज आहे असे सांगितले. त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा असताना एका रिॲलिटी शोमध्ये शिवने वीणाचे नाव घेणे खरंतरं आश्चर्यकारक होते. पण म्हणतात ना काही नाती ही प्रेमापलीकडे असतात. म्हणजे केवळ रिलेशनशीप असे न म्हणता एकमेकांच्या दूर राहूनही दुसऱ्यांचा विचार करणे यात खरे प्रेम आणि सुख सामावलेले असते. असेच शिवच्या बोलण्यातून वीणाबद्दल दिसून आले. आजही त्याच्या मनात वीणासाठी खास जागा आहे हे पाहून त्याच्या चाहत्यांना खूप आनंद झाला. पण यावर वीणा काय बोलेल? याकडे अनेकांचे लक्ष होते.

तू वाघ आहेस…. रडू नकोस

वीणाने केली स्टोरी पोस्ट

वीणा शिवच्या त्या गोष्टीनंतर काहीतरी उत्तर देईल अशी अपेक्षा होती. कारण शिवचा तो व्हिडिओ बिग बॉसवर बराच वायरल झाला होता. हा व्हिडिओ वीणानेही तिच्या स्टोरीवर शेअर केला आहे. तिने या व्हिडिओखाली जे लिहिले आहे ते पाहून तर #shiveena फॅन्स चांगलेच खूश आहेत. ‘वाघ आहेस तू… हग्ग्स. रडू नाही अजिबात मी आहे तुझ्यासोबत’ तिने ती स्टोरी पोस्ट करणं यातच सगळे काही आले आहे. कदाचित प्रेम म्हणून नाही पण मित्र म्हणून त्यांना एकमेकांची साथ कायम लाभेल यात काही शंका नाही. 

Bigg Boss मराठीच्या घरात झाली ओळख

शिव हा Bigg Boss मराठी दुसऱ्या सीझनचा विजेता आहे. वीणा- शिवची या सीझन दरम्यान ओळख झाली. मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यांची जोडी ही सगळ्यांना आवडत होती. घरातून बाहेर आल्यानंतर त्यांचे हे प्रेम बराच काळ टिकले. त्यांनी अनेक व्हिडिओ, मुलाखती एकत्र केल्या. पण त्यानंतर अचानक एक दिवस त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली. यावर दोघांनीही कोणतीही मत मांडली नाहीत. किंवा एकमेकांवर आरोप केले नाहीत. त्यांनी त्यांच्या अकाऊंटवरुन त्यांच्या पोस्ट काढून टाकल्या. 

पण आता पुन्हा एकदा शिवच्या तोंडी वीणाचे नाव ऐकून अनेकांना आनंद आणि समाधान मिळाले हे नक्की!

Leave a Comment