तिरुपती बालाजीला केसांचे टक्कल का केले जाते, जाणून घ्या कारण

 ‘केशवपन’ ही पद्धत आपल्याकडे वाईट मानली जाते. शक्यतो हिंदू धर्मात केसांचे टक्कल कोणीतरी जवळचे गेल्यानंतर केले जाते. त्यामुळे टक्कल असे आपण सहसा करत नाही. पण तिरुपती बालाजीला जे कोणी भक्त जातात मग ती स्त्री असो वा पुरुष आपले संपूर्ण टक्कल करुनच परतते. त्यामुळे अनेकदा टक्कल कशासाठी केले असे विचारावे लागते. आपल्या आजुबाजूला असलेले अनेक जण बालाजीला जातात आणि संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब डोक्यावरचे सगळे केस काढून येतात. पण तुम्हाला यामागची खरी कहाणी माहीत आहे का? काही खास कारणासाठी तिरुपती बालाजीला केस दिले जातात. चला जाणून घेऊया हे कारण

तिरुपती बालाजीची कथा

देवी निलाद्रि- सौजन्य _ Instagram

तिरुमाला तिरुपती श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिर हे आंध्रप्रदेशातील खूप मोठे मंदिर (Tirupati Balaji)आहे. येथे वर्षभर भक्तांची वर्दळ असते. आपले दु:ख ,कष्ट हरावे यासाठी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले जाते. तिरुपती बालाजी विष्णूचे एक रुप आहे. कलियुगात लोकांना संकटांपासून वाचवण्यासाठी व्यंकटेश्वर तिरुपती बालाजी पृथ्वीवर प्रकटले. त्यांच्यासाठी केस कापण्याची ही पद्धत आहे. त्यांच्यासाठी केस हा प्रसाद मानला जातो. पण त्यामागे एक कथा सांगितली जाते. 

तिरुमाला टेकडीवर व्यंकटेश्वर स्वामी हे आराम करण्यासाठी पहुडले होते. त्या ठिकाणी आलेल्या मेंढपालाने त्यांच्या डोक्यावर असा काय प्रहार केला की, त्यामुळे त्यांच्या डोक्याचा खोक पडली. तेथील केस निघून गेले. व्यंकटेश्वर स्वामींचे केस हे त्यांच्या सौंदर्याची ओळख होती.ते खूप सुंदर होतो.  गंधर्व राजकुमरी निलादेवीला ज्यावेळी त्यांच्या डोक्यावर डाग दिसला त्यावेळी तिला अतीव दु: ख झाले.  त्यांच्या सौंदर्याला ती खोक बाधा आणते असे त्यांच्या निदर्शनास आले. राजकुमारीने लागलीच आपल्या केसांचा काही भाग काढून तो व्यंकटेश्वर स्वामींना लावला. ज्यावेळी व्यंकटेश्वरांनी आपले प्रतिबिंब पाण्यात पाहिले त्यावेळी त्यांना ती खोक दिसली नाही. त्यांना त्याचा आनंद झाला. पण त्यांनी ज्यावेळी निलादेवींना पाहिले त्यावेळी त्यांच्या डोक्याला त्यांना ती खोक दिसली आणि त्यातून रक्त येताना दिसले. त्यांनी शक्तीने केस पुन्हा घेण्याची विनंती केली. त्यावेळी त्यांनी केस परत घेण्यास नकार दिला. त्यांनी सांगितले की, वेळ आल्यानंतर हे केस मी परत घेईन. पण आता नाही.

त्यावर बालाजींनी त्यांना का असा प्रश्न केल्यावर त्यांनी उत्तर दिले की, केस हा मनुष्याच्या सौंदर्याचा भाग आहे. अभिमान आणि अहंकार या दोन्ही गोष्टी त्याला जोडलेल्या असतात. त्यामुळे तिरुपती बालाजी मंदिरात जे कोणी येतील ते या ठिकाणी आपल्या अभिमान आणि अहंकाराचा त्याग करतील. त्यांनी त्याग केलेले केस हे मी स्विकारेन असे देवीने सांगितले. म्हणूनच आजही येथे केस त्याग केले जातात. देवी हे केस स्विकारते असा समज आहे. तिरुमाला पर्वतापैकी एक निलाद्रि पर्वत आहे जो निलादेवीच्या नावे प्रसिद्ध आहे.

शास्त्रीय कारण

खरंतरं केस हा प्रत्येक मनुष्याच्या दागिना आहे. केसामुळे सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही बदल होत असतात. केसांचा काळा रंग या दोघांमध्ये संतुलन राखायचे काम करतो. तुम्हाला यश मिळाल्यानंतर तुम्हाला जर फार गर्व झाला असेल किंवा हताश होऊन निराशा आली असेल तर केस काढून टाकल्यामुळे शरीराची उर्जा एकसारखी करण्यास मदत मिळते असे मानले जाते. त्यामुळेच आजही अनेक देवालयांमध्ये केस काढण्याची पद्धत आहे. 

आता तिरुपतीला जाणार असाल तर तुम्ही देखील सकारात्मकता मिळवण्यासाठी केस काढायला विसरु नका.

Leave a Comment