Bigg Boss मराठी : विकासचा नाद करायचा नाय…!!!

 Bigg Bossच्या घरात आल्यानंतर सगळ्यात महत्वाचे असतात ते म्हणजे टास्क. तुमच्या चांगुलपणासोबतच तुमच्या खेळाडूवृत्तीची कसोटीही या घरात होत असते. अनेकदा घरात राहून केवळ प्रसिद्धी मिळवणाऱ्याला अधिक फायदा होत असला तरी कोण कसा खेळतो? यावर ट्रॉफीच्या जवळ जाणे निश्चित असते. टास्कचा विचार करता घरात आणि घराबाहेर फक्त एकाचेच नाव आहे ते नाव म्हणजे विकास सावंत. घरात जे काही टास्क होतात. त्या टास्कमध्ये आपली ताकद पणाला लावून हा पठ्ठ्या चांगलाच खेळताना दिसत आहे. त्यामुळे या सीझनचा विजेता म्हणून आधीच त्याने आपले नाव प्रेक्षकांच्या ह्रदयावर कोरले आहे. कोणी म्हणाले कटपुतली, कोणी म्हणाले स्पेशल… पण एक नक्की की विकासचा नाद अजिबात करायचा नाय!

विकासची टास्कमध्ये तुफान कामगिरी

घरात कॅप्टन्सीसाठी जे काही टास्क होतात. त्यामध्ये जिथे खेळायचे असते तिथे विकास कुठेही कमी नसतो. नुकताच घरात लगोरी आणि सी-सॉचा जो खेळ झाला त्यामध्ये विकासने जे काही केले त्यामुळे त्याची प्रसिद्धी चांगलीच वाढली आहे. सगळ्या खेळासाठी उत्तम बुद्धिमत्ता गरजेचे असते असे नाही. आपण जसे आहोत त्याचा उपयोग करुन जर थोडा प्रयत्न केला तर नक्कीच त्यातून यश मिळू शकते यात काहीही शंका नाही. सी-सॉच्या खेळात किरण माने आणि विकास सावंत हे सी- सॉवर बसले होते. त्यावेळी त्यांच्या तोंडावर अगदी डिटर्जंटच्या पाण्यापासून ते मसाल्याच्या पाण्यापर्यंत सगळ्याचा मारा करण्यात आला. हा पाण्याचा मारा इतका जोरदार होता की, विकासचा चेहरा या सगळ्या खेळानंतर सुजला त्याला मारही लागला. पण तरीही न डगमगता तो सी-सॉवर बसून राहिला. यावेळी त्याच्या कानात भुणभुण करताना स्नेहलता वसईकर आणि अपूर्वा नेमळेकर दिसल्या. त्याला सी-सॉवरुन उठवण्यासाठी वाट्टेल ते बोलत होत्या. पण तरीही किरण माने यांनी त्याला दिलेला धीर लक्षात घेत तो उठला नाही. तो ज्यावेळी उठला त्यावेळी त्याने घरातील आणि बाहेरच्या प्रेक्षकांची मने जिंकली होती. 

 कॅप्टन्सीसाठी ज्यावेळी लगोरीचा टास्क खेळण्यात आला त्यावेळी फ्रंट फूटवर राहून आपली ताकद पणाला लावून लढणारा विकास भावला. कॅप्टन्सीसाठी तो यशश्रीच्या बाजूने खेळत होता. समृद्धीची रचलेली लगोरी पाडण्यासाठी त्याने आपली ताकद पणाला लावली त्याने अपूर्वाशी अक्षरक्ष: दोन हात करत चांगला लढा दिला. त्याने अपूर्वालाही ढकलून शकलेने तिची लगोरी पाडण्याचा प्रयत्न केला. त्यात तो यशस्वीही झाला.एकट्याने त्याने ती लगोरी तोडण्याचा चांगलाच प्रयत्न केला होता. यात यशश्री जरी जिंकली नाही तरी देखील विकासने केलेली मेहनत ही नक्कीच वाखाणण्यासारखी होती. 

महेश मांजरेकरांनीही केली तारीफ

वीकेंडच्या चावडीत विकासचे कौतुक होताना पाहून खूप जणांना आनंद झाला. कारण घरात असलेल्या विरोधी टीमने आतापर्यंत विकासला डोकं नसल्याचा उल्लेख अनेकदा केला आहे. यामध्ये अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) आणि आता स्नेहलता वसईकर (Snehalata Vasaikar) हिचा समावेश आहे. पण महेश मांजेरकरांनीही विकास आणि किरण माने यांचे कौतुक केल्यानंतर आता नक्कीच त्याला या नंतर खेळण्याची एक वेगळी दिशा मिळण्यास मदत करणार आहे. 

कोण आहे विकास सावंत?

 विकास सावंत डान्सर असून त्याने अनेक रिॲलिटी शोज केलेले आहेत. तो उंचीने कमी असला तरी त्याचा विचार न करता त्याने आपली स्वप्ने पुरण्यासाठी अफाट मेहनत घेतलेली आहे. एका वेबसाईटने दिलेली माहितीनुसार त्याने लहानपणी घराला हातभार लावण्यासाठी डिलीव्हरी बॉयचे कामदेखील केले आहे. त्यानंतर त्याने आपला फोकस अभिनय आणि डान्सकडे वळवला. हिंदी मालिका आणि चित्रपट यामध्ये त्याने काम केले आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘चंंद्रमुखी’, ‘अग्निपथ’, ‘नशा’, ‘दबंग २’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

येत्या काळात असे अनेक टास्क येतील आणि विकास उत्तमच खेळेल अशी अपेक्षा आहे. 

Leave a Comment