काढा बनवताना लक्षात ठेवा या गोष्टी

काढा हा खोकला सर्दीवरील (Cold Cough) उत्तम उपाय ठरतो. अनेक आजारांपासून प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीही काढ्याचा उपयोग होतो. काढ्यात अनेक वनस्पती आणि मसाल्यांचाही उपयोग केला जातो. तर काही ठिकाणी केवळ धणेजिऱ्याचा काढाही बनवला जातो. पण काढा हा योग्य पद्धतीने बनवला तरच त्याचा योग्य उपयोग होतो. म्हणून काढा बनवताना (How to make perfect kadha) तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवायला हव्यात. यासाठी या लेखाचा तुम्ही नक्की उपयोग करून करा. 

कधी मिसळावे साहित्य 

Kadha Ingredients – Freepik.com

कोणतेही काम करण्यासाठी विशिष्ट नियम असतात. हे नियम यासाठी बनविण्यात येतात कारण काम योग्य तऱ्हेने पूर्ण व्हावे. हीच गोष्ट पदार्थ बनवतानाही लागू होतात. त्यामुळे कुकिंग टिप्स (Cooking Tips) माहिती असायला हव्यात. काढा बनवताना तुम्ही पाणी उकळल्याशिवाय सर्व पदार्थ मिसळता का? जर तुम्ही असं करत असाल तर ही काढा बनविण्याची योग्य पद्धत अजिबात नाही. तुम्हाला सर्वात पहिले पाणी व्यवस्थित उकळून घ्यायला हवे आणि कमीत कमी पाणी 2 वेळा उकळवा आणि मगच त्यात इतर पदार्थ मिसळून त्याचा काढा तयार करायला घ्या.  

आच ठेवा मध्यम 

कोणतेही पदार्थ शिजवताना गॅसची आच कशी आहे यावर लक्ष ठेवायला हवे. अन्यथा पदार्थ जळण्याची शक्यता असते अथवा अति शिजण्याचीही शक्यता असते. त्यामुळे फ्लेम नक्की किती कमी जास्त आहे याकडे लक्ष द्या. काढा तयार करताना तुम्ही गॅसची फ्लेम ही मंद ठेवायला हवी. दुर्लक्ष करू नका. काढा उकळताना ही आच कमी करा. जेणेकरून व्यवस्थित उकळेल आणि त्यातील पोषक तत्व नाहीसे होणार नाहीत. तुम्ही गॅस वाढविल्यास, पाणी लवकर सुकेल आणि काढा योग्य बनणार नाही. 

साखरेऐवजी वापरा गूळ

गुळाचे शरीराला अधिक फायदे मिळतात. काढा कडू असतो हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे काही ठिकाणी यामध्ये साखर मिक्स केली जाते. पण साखर ही शरीरासाठी चांगली नाही. त्यामुळे तुम्ही साखरेऐवजी तुम्ही काढ्यात गुळाचा वापर करावा. काढ्याचा कडवटपणा दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच काढा प्यायला यामुळे त्रास होत नाही. टंगळमंगळ न करता काढा पिता येऊ शकतो. गुळाच्या चवीमुळे काढ्याची चव अधिक चांगली लागते. विशेषतः लहान मुलांना काढा द्यायचा असेल तर गूळ नक्की घालावा. 

योग्य प्रमाण असावे 

How to make perfect kadha – Freepik.com

कोणत्याही खाण्यापिण्याच्या पदार्थात पदार्थांचे प्रमाण कमीजास्त झाले तर त्याचा स्वाद बिघडतो. त्यामुळे काढा बनवतानाही तुम्ही हे लक्षात ठेवायला हवे. काढ्याचा वापरणारे पदार्थ हे योग्य प्रमाणात तुम्ही घालावे. जेणेकरून काढा पिताना तोंड वाकडे होणार नाही. 

काढा बनविण्याची योग्य पद्धत 

परफेक्ट काढा बनविण्यासाठी तुम्हाला खाली दिल्या गेलेल्या स्टेप्सचा वापर करावा लागेल 

साहित्य – 

  • 1 इंच आलं
  • 5 ग्रॅम मुलेठी 
  • 2 कप पाणी 
  • 2 चमचे धणे
  • 2 चमचे जिरे 
  • 5-6 काळी मिरी
  • गुळाचा खडा 

बनविण्याची पद्धत 

  • सर्वात पहिले तुम्ही 5-6 काळी मिरी कुटून त्याची पावडर बनवा. त्यानंतर आलं घेऊन तेदेखील कुटून घ्या 
  • 2 कप पाणी गॅसवर उकळविण्यासाठी ठेवा 
  • आता त्यात आलं, काळी मिरी, मुलेठी, धणे, जिरे आणि गूळ घाला 
  • हे व्यवस्थित उकळू द्या. पाणी अर्धे होईपर्यंत उकळावे. तुमचा काढा तयार आहे 

काढ्याचा व्यवस्थित गुण तुमच्या सर्दी खोकल्यासाठी यायला हवा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने काढा तयार करा आणि गरमागरम प्या. दिवसातून किमान दोन वेळा तरी प्या. जेणेकरून तुम्हाला त्याचा लवकर चांगला परिणाम मिळेल. 

Leave a Comment