Bigg Boss 16: अब्दू आला परत, साजिद-निमरितपासून झाला दूर

 Bigg Boss 16 चा गेला आठवडा हा एकदम धमाकेदार होता. यावेळी कोणी जाणार नाही असे वाटत असताना अंकितची अचानक झालेली एक्झिट ही सगळ्यांनाच धक्का देणारी होती. पण त्याच्या एविक्शननंतर घरात अब्दू (Abdu Rozik) आल्यामुळे सगळ्यांनाच चांगला आनंद झाला आहे. काही खासगी कारणांसाठी अब्दूला घराबाहेर पाठवण्यात आले होते. तो कधी परत येणार ही प्रतिक्षा असताना आता तो घरात आला. पण तो घरात आल्यानंतर काहीसा बदलेला दिसला आहे. साजिद- निमरितपासून तो थोडा दूरच असल्याचे दिसून आले आहे. पण ‘का रे दुरावा’ असा सवाल केल्यानंतर अब्दूने दिलेले उत्तर हे देखील काही खरे नव्हते असे दिसून आले आहे.

अब्दूने मारली शिवला मिठी

अब्दू ज्यावेळी घरात आला त्यावेळी त्याने एक मोठी मिठी शिवला (Shiv Thakare) मारली होती. शिवसोबत तो स्टॅनलाही तितक्याच घट्ट मिठी मारुन भेटला. पण निमरित- साजिदला भेटताना त्याचे थोडे अंतर दिसून आले. साजिदला जरी त्याने मिठी मारली असली तरी देखील साजिदला आणि निमरितला त्याने तशी मिठी मारली नाही.त्यावर साजिद- निमरित यांच्यामध्ये चर्चा ही झाली. साजिदच्या म्हणण्यानुसार तो बाहेरुन आल्यानंतर त्याला त्याच्या टीमने आपल्यापासून दूर राहण्यास सांगितले असावे असा सल्ला दिला असेल. म्हणून अब्दू आपल्या जवळ राहात नाही असे साजिद अब्दूसमोरच सांगत होता. पण त्यावेळी अब्दूला तितके हिंदी कळत होते. त्यावर तो मला काही झाले नाही किंवा असे काही झाले नाही असे सांगत होता. पण नक्कीच त्याला काही बाळकडू पाजूनच घरात आणले असावे असे दिसत आहे.

ही चुकी भोवली का?

अब्दू- शिव-स्टॅनचे चांगले नाते या घरात दिसून आले आहे. अब्दूचा साजिद हा ट्रान्स्लेटर जरी असला तरी काही बाबतीत साजिद अब्दूलची खिल्ली उडवताना दिसला आहे. इतकेच नाही तर निमरितवर अब्दूचे असलेले क्रशही त्याने फार चुकीच्या पद्धतीने दाखवलेले अनेकदा दिसले आहे. निमरितच्या वाढदिवसाच्या दिवशी अब्दूने तिच्यासाठी काही खास करण्याचे ठरवले होते. पण त्यावेळी त्याची जी मस्करी साजिदने केली त्यानंतर घराबाहेर अब्दूच्या चाहत्यांमध्ये रोष दिसून आला होता. साजिदने ही गोष्ट एका परदेशी पाहुण्यासोबत केली हे अनेकांना पटले नव्हते. हीच चूक कदाचित साजिदला भोवण्याची शक्यता आहे. ज्यापद्धतीने शिवसोबत त्याचे नाते दिसून आले आहे. त्यानुसार अब्दूच्या चाहत्यांचे प्रेम शिव- स्टॅनला मिळणार आहे असे दिसत आहे.  

अब्दू या कारणासाठी गेला बाहेर

 Bigg Boss 16 चा हा सीझन चार आठड्यासाठी म्हणजे 1 महिन्यासाठी वाढला आहे. त्यामुळे अनेकांच्या बाहेरच्या कमिटमेंट्सवर नक्कीच परिणाम होणार आहे. अब्दूची ख्याती ही आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे. त्याचे कोट्यवधी चाहते आहेत.अब्दूला घेऊन एका मोठ्या कंपनीला एक व्हिडिओ गेम तयार करायचा आहे. त्यासाठी त्याला घराबाहेर काही काळासाठी येणे गरजेचे होते. त्यामुळे नियमांना थोडी बगल देत त्याला काही काळ जाण्यासाठी परवानगी देण्यात आली. 

पण आता या नव्या ट्विस्टमुळे पुढील काळात नेमका कोणता फरक दिसून येईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

Leave a Comment