Bigg Boss 16 : शिवविरोधात बोलणे विकासला भोवणार

 बिग बॉस मराठीचा विजेता शिव ठाकरे (Shiv Thakare)  दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनत चालला आहे. तो ज्या पद्धतीने खेळतोय त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. पण घरात वाईल्ड कार्ड म्हणून आलेला विकास मानकटला (Vikas Manaktala) शिवच्या चाहत्यांच्या डोक्यात जायला आता सुुरुवात झाली आहे. याचे कारणही विकासच आहे. कारण घरात टिकण्यासाठी मुद्दे शोधणाऱ्या विकासने शिवसोबत झालेला एक जुना किस्सा घरातल्या इतर सदस्यांसमोर चांगलाच उगाळून सांगितला. त्याचा फायदा त्याला होईल असे वाटत असताना त्याला थेट बिग बॉसकडूनच चांगली समजूत देण्यात आली. त्याचा हा खोटेपणा वेळीच समोर आल्यामुळे आता त्याला त्याचे हे बोलणे या वीकेंडला चांगलेच भोवेल असे दिसू लागले आहे. नेमके तो काय म्हणाला चला घेऊया जाणून.

 शिव त्या स्पर्धकाला चावला

घरात वीकेंडला अचानक अंकितचे एविक्शन झाल्यानंतर वातावरण थोडे तंग होते. यादरम्यान विकास मानकटला (Vikas Manaktala)ला अचानक शिवचा एक किस्सा घरात सांगायची खूपच इच्छा झाली. घरातील गॉसिप क्वीन अर्थात अर्चना गौतम (Archana Gautam) ला त्याने शिवचा बिग बॉस मराठीतील एक किस्सा सांगायला सुरुवात केली. ‘शिवने टास्क दरम्यान एका स्पर्धकाला चावले होते. त्यावेळी त्या स्पर्धकाला शिवला बाहेर जाऊ द्यायचे की नाही असे विचारण्यात आले होते. पण त्या स्पर्धकाने त्याला माफ केले म्हणून शिव खेळात टिकला.  इतकेच नाही तर तो खेळ जिंकला.’ त्यावर अर्चनाने देखील त्याला प्रश्न विचारले पण शिववर शरसंधान साधण्या हेतूने त्याने तिला सगळे काही जास्त सांगितले. विकास इतक्यात थांबला नाही त्याने तिच गोष्ट जाऊन प्रियांका, टिना यांना देखील सांगितली.

 पण झाले असे की, अर्चनाच्या मनात कोणतीही गोष्ट राहात नाही. त्यामुळे तिने थेट शिवशी संवाद साधायचा ठरवला. त्यावेळी शिवने ती गोष्ट काय झाली ते नीट समजावून सांगण्यास सुरुवातही केली. पण बिग बॉसने हस्तक्षेप करत शिवला यासंदर्भात कोणतेही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही असे सांगितले. त्यानंतर सगळ्यांना एकत्र बोलावून विकासला चांगल्या शब्दात झापले. 

विकासचा गेम पालटला

तसं पाहायला गेलं तर घरात सध्या तरी शिवच विजेता दिसतो. सगळ्याच गोष्टींचा विचार केला तर शिव हा कायम सरसच दिसतो. त्याला चॅलेंज देण्यासाठी घरात प्रियांका असली तरी घरात त्यांचा गट फोडू शकेल असे कोणीही नाही. विकासने चुकीच्या पद्धतीने का असेना त्यांचा गट आणि शिवबद्दलची मत बदलण्याचा प्रयत्न केला. पण त्याने ज्या गोष्टींचा आधार घेतला तो आधार चुकीचा होता. त्यामुळेच त्याला योग्यवेळी थांबवण्यात आले. खेळात पुढे यायचे असेल तर स्वत:चा खेळ दाखवावा लागतो. या गोष्टी जरी फायद्याच्या असल्या तरी त्यामुळे ज्यांच्या मनात चुकीच्या गोष्टी नाही त्या देखील राहतात.म्हणूनच त्याला योग्यवेळी थांबवण्यात आले. 

विकासच्या बॅगमध्ये असते तरी काय ?

विकास मानकतला (Vikas Manaktala)ला घरात आल्यापासून त्याच्यासोबत कायम एक छोटी बॅग असते. या बॅगमध्ये तो काय घेऊन फिरतो हे कधीच कोणाला कळलेले नाही. प्रेक्षकांनाही आता प्रश्न पडू लागला आहे की, त्यांच्या बॅगमध्ये नेमकं असतं तरी काय?  आता विकासला एकदा तरी सलमानने हा प्रश्न विचारावा. 

दरम्यान शिवविरोधात केलेले हे विधान विकासला प्रसिद्धी तर दूर पण घरातून नक्की बाहेर काढायला मदत करणार आहे.

Leave a Comment