घरात लावा मोरपिस,मिळवा समृद्धी आणि धनसंपत्ती

 वास्तुशास्त्रानुसार घरात काही गोष्टी ठेवणे हे शुभ मानले जाते. त्यात अगदी आवर्जून नाव घेतले जाते ते मोरपिसाचे. मोर हा पक्षीच इतका सुंदर आहे की, त्याला पाहिल्यानंतर त्याचे मोरपिस आपल्याकडे असावे असे वाटणार नाही अशा व्यक्ती विरळाच असतील. अनेक हिंदू देवता असो वा मुस्लिम देवांसाठी मोरपिस (benefits of morpankh according to vastu)हे वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जाते. पण वास्तुशास्त्रानुसार मोरपिस हे अत्यंत शुभ मानले जाते. नेमक्या कोणत्या कारणासाठी मोरपिस ठेवायला हवे ते आता आपण जाणून घेणार आहोत. चला जाणून घेऊया.

वास्तुशास्त्रानुसार मोरपिसाचे फायदे

वास्तुशास्त्रामध्ये मोरपिसाचे एक वेगळेच महत्व आहे. काही खास कारणासाठी मोरपिस लावण्याचा सल्ला दिला जातो. चला जाणून घेऊया वास्तुशास्त्रामध्ये काय आहे मोरपिसाचे महत्व
1.  जर तुम्हाला आर्थिक चणचण जाणवत असेल तर तुमच्यासाठी मोरपिस हे फायद्याचे मानले जाते. माता लक्ष्मीची कृपा होण्यासाठी तुम्ही मोरपिस ठेवायला हवे. त्यामुळे पैसा टिकण्यास मदत होते असे सांगितले जाते. 

2. आपल्या अवतीभोवती सकारात्मक आणि नकारात्मक उर्जा अशी दोन्ही असते. घराच्या प्रवेशद्वारातून ही उर्जा येत जात असते. मोरपिस घराच्या प्रवेशद्वारावर लावले तर घरात सकारात्मक उर्जा घरात राहण्यास मदत मिळते. 

3. लहान मुलं चंचलं असतात. पण त्यांचे अभ्यासात मन लागत नसेल किंवा ते एकाग्र नाही असे वाटत असेल तर अशावेळी मुलांच्या खोलीत मोराचे पिस ठेवावे. त्यामुळे मुलांची एकाग्रता वाढते असे मानले जाते.

4. शनिची बाधा झाली असेल अशावेळी घरात मोरपिस ठेवणे हे शुभ मानले जाते. घरात 3 मोरपीस आणून ते बांधून ठेवा. त्यामुळे नक्कीच ग्रहदोष दूर होण्यास मदत मिळेल.
 

5. मनोकामना पूर्ण करण्यासाठीही मोराचे पिस हे उत्तम असल्याचे सांगितले जाते. तुम्ही ज्या ठिकाणी देवाची पूजा करताय त्या ठिकाणी मोराचे पिस ठेवा. तुमच्या मनोकामना नक्की पूर्ण होतील.

मोरांकडून काढून नाही तर…

मोरपिसांची मागणी वाढल्यानंतर अनेकदा मोरांना मारुन त्यांची पिसं काढली जातात असे अनेक व्हिडिओ आणि बातम्या या येत होत्या. त्यामुळे मधल्या काळात मोरपिसं ही मोठ्या प्रमाणात दिसायची. त्यामुळे अनेकांनी मोरपिस घेणेही बंद केले होते. पण अनेकांचचे असे म्हणणे आहे की, ज्याप्रमाणे मनुष्याचे केस गळतात. अगदी त्याचप्रमाणे मोरांचेही पंख गळत असतात. असे मोरपंखही गोळा केले जातात.( तुम्ही या गोष्टीचा विचार करत असाल तर तुम्ही फार नीट विचारपूस करुन मगच मोरपिस लाण्याचा विचार करा)

आता फायदे हवे असतील तर नक्की ठेवा मोरपिस आणि मिळवा फायदे

Leave a Comment