ड्रॅगन फ्रूट्स (Dragon Fruits) खाणे आहे फायद्याचे, जाणून घ्या अधिक

 फळ ही आरोग्यासाठी फायद्याची असतात. शरीरातील व्हिटॅमिन्सची कमतरता पूर्ण करण्यासाठी फळ हा योग्य असे स्टेपल फूड आहे. हल्ली बाजारात परदेशातीलही फळे मिळतात ज्यामध्ये मोठ्याप्रमाणात व्हिटॅमिन्स असतात. असेच एक परदेशी फळ म्हणजे ‘ड्रॅगन फ्रूट’( Dragon Fruit) दिसायला गडद गुलाबी रंगाचे असे हे फळ असून त्याला अननसाप्रमाणे त्याला बाहेरुन काटे असतात. (पण हे काटे नसून त्याला आलेल्या रेषा असतात) असे हे ड्रॅगन फळ हल्ली बाजारात अगदी सहज मिळते. या फळाची किंमत इतर फळांच्या तुलनेत महाग असते. पांढरा आणि राणी रंगाच्या गरामध्ये ही फळ मिळतात. त्यानुसार याच्या आकारामध्ये फरक दिसतो. ज्याचा गर राणी रंगाचा असतो ते फळ थोडे छोटे असते. तर पांढऱ्या गराचे फळ हे बऱ्यापैकी तळहाताएवढे असते. या फळाचे अनेक फायदे आहेत. चला जाणून घेऊया याविषयी अधिक

ड्रॅगन फ्रुटचे मूळ

ड्रॅगन फ्रूट हे पिटाया (Pitaya) नावाने ओळखले जाते. कॅक्टस जातीतील हे फळ असून या फळासाठी फारच कमी पाणी लागते. पेरु, मेक्सिको, साऊथ इस्ट एशिया, आशिया खंडातील काही भाग, अमेरिका, कॅरेबियन देशांमध्ये याची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. या फळाला आजही मेक्सिकोमध्ये पिटाया म्हटले जाते. तर अमेरिकेत याला ड्रॅगन फ्रुट म्हणतात याचे कारण असे की, या फळाचा बाहेरील भाग हा मखमली असतो. तसेच त्यावर असलेले स्पाईक म्हणजेच काटे हे एखाद्या ड्रॅगन प्रमाणे असतात म्हणून याला ड्रॅगन फ्रूट म्हणतात.

ड्रॅगन फ्रुट खाण्याचे फायदे

गुलाबी गराचे ड्रॅगन फ्रुट्स

किवीप्रमाणे गर असलेले पण चवीला ना गोड ना आबंट असलेले असे हे फळ तुम्ही रोज खाल्ले तरी काहीही हरकत नाही. ड्रॅगन फ्रुट खाण्याने नेमके कोणते फायदे होतात ते आता जाून घेऊया 

  1. ड्रॅगन फ्रुटमध्ये नैसर्गिकदृष्ट्या फार कमी फॅट असतात आणि मोठ्या प्रमाणात फायबर असते. त्यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. 
  2. ड्रॅगन फ्रुटमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात जे केस, त्वचा आणि आरोग्यासाठी चांगले असतात. 
  3. ड्रॅगन फ्रुटच्या नियमित खाण्यामुळे तुम्हाला आवश्यक असलेले व्हिटॅमिन C मिळते. जे त्वचेसाठी फारच चागले असते. 
  4. ड्रॅगन फ्रुटमध्ये असलेले घटक तुमच्या त्वचेसाठी चांगली असतातच पण ती तुमच्या डोळ्यांसाठीही चांगली असतात. डोळ्यांची दृष्टी चांगली राहण्यासाठी ड्रॅगन फ्रुट नक्कीच मदत करते. 
  5. मधुमेहींसाठीही ड्रॅगन फ्रुट फारच चांगले आहे. यामध्ये साखऱ फारच कमी असते. त्यामुळे मघुमेही या फळाचे सेवन अगदी आरामात करु शकतात. 

असे करा ड्रॅगन फ्रुटचे सेवन

ड्रॅगन फ्रुट खाणे तसे सोपे आहे. या फळाची सालं अगदी सहज निघतात. शिवाय तुम्ही याचे दोन काम करुन एक चमचा घेऊन त्याचा गर काढून खाऊ शकता. या शिवाय खूप जणांना त्याची स्मुदी अधिक चविष्ट लागते. त्यामुळे तुम्हाला ते कोणत्याही स्वरुपात खाता येईल. इतकेच नाही जर तुम्हाला सॅलेड बनवायचे असेल तर तुम्ही त्यात देखील या फळांचे क्युब घालू शकता. 

आता नियमित ड्रॅगन फ्रुटचे सेवन करा आणि मिळवा उत्तम त्वचा आणि आरोग्यही 

Leave a Comment