गुळ खाण्याचे फायदे करतील आश्चर्यचकीत

उसापासून तयार साखर आणि गुळ तयार केली जाते. पण गुळ हा अधिक चांगला असे सांगितले जाते.  त्यामुळेच अनेक जण गुळाचा नुसता खडा अगदी आवर्जून खातात.  साखरेपेक्षा गुळ हा अधिक चांगला म्हणून अनेकदा गुळ खाण्याचा सल्ला दिला जातो. गुळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. ते तुम्हाला माहीत आहे का? गुळाचे नेमके फायदे कोणते ते आज आपण जाणून घेणार आहोत. ते जाणून घेतल्यानंतर गुळाचा आहारात समावेश करायला विसरु नका. चला जाणून घेऊया गुळाचे फायदे 

गुळ कसा तयार होतो? (Jaggery Making Process)

गुळ तयार करण्याची प्रक्रिया ही बरीच मोठी आहे. पारंपरिक पद्धतीने गुळ अनेक ठिकाणी बनवला जातो. ज्यामध्ये उसाचा शुद्ध रस वापरला जातो. उसाचा रस मोठ्याप्रमाणात काढला जातो. तो रस चांगला उकळला जातो. रस उकळताना त्याला येणारा फेस काढून टाकला जातो. जसा उसाचा रस जाड होऊ लागतो. तसा त्याचा रंग बदलतो आणि पिवळसर- काळा होऊ लागतो. तो जाड झालेला गुळ लगेच साच्यात घातला जातो. त्याला आकार दिला जातो. तो सुकवला जातो. आपल्याकडे बाजारातून गुळाचा जो खडा येतो तो अशाच पद्धतीने बनवला जातो. पण हल्ली मोठ्याप्रमाणात गुळ बनवला जाताना त्यात काही केमिकल्स घातले जाते. ज्यामुळे गुळाची चवही बदलते. पण जो गुळ शुद्ध असतो त्याची चव नक्कीच छान लागते.

गुळाचे फायदे

उसापासून साखर आणि गुळ तयार केली जाते. साखर आणि गुळ या दोघांचा समावेश आपण आहारात करत असतो. पण तरीही गुळ हा अधिक चांगला मानला जातो. गुळाच्या सेवनामुळे नेमका कोणता फायदा होतो ते जाणून घेऊया 

  • गॅसेस, ॲसिडिटीचा त्रास असेल तर तो त्रास कमी करण्यासाठी गुळ हा फारच लाभदायी असतो. 
  • जर तुम्हाला आंबट ढेकर येत असतील तर अशावेळी थोडासा गुळ खावा.त्यामुळे नक्कीच आराम मिळण्यास मदत मिळते. 
  • गुळामध्ये मोठ्याप्रमाणात लोह असते. जर तुमचे हिमोग्लोबिन कमी झाले असेल तर गुळाच्या सेवनामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत मिळते. 
  • गुळामध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फरस असते जे तुमच्या हाडांना बळकटी आणण्यास मदत मिळते. 
  • सर्दी झाली असेल तर अशावेळी गुळ हा फार फायद्याचा ठरतो. गुळ आणि कांदा खाल्ला तर त्यामुळे सर्दी बरी होण्यास मदत मिळते.
  • गुळ हा डोळ्यांची दृष्टी वाढण्यासही चांगला असतो. त्यामुळे चांगले डोळे हवे असतील तर गुळाचा थोडासा खडा खायला हवा. 
  • वजन कमी करण्यासाठीही गुळ फायद्याचा मानला जातो. साखरेऐवजी गुळ खाल्ला तर त्यामुळे गोड खाण्याची इच्छा पूर्ण होते.त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 
  • सुंदर त्वचा हवी असेल तर तुम्ही गुळ खायला हवा. गुळाच्या सेवमामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते. 
  • गुळामुळे इन्स्टंट एनर्जी मिळण्यास मदत मिळते. जर तुम्हाला लो वाटत असेल तर अशावेळी तुम्ही गुळाचा एक खडा खायला हवा. 
  • रक्तदाबाचा त्रास असेल तर तुमच्यासाठी गुळ वरदान आहे. अशांनी गुळ खायला हवा. 

आता दररोज नक्की दिवसातून एक तरी गुळाचा खडा खा. तुम्हाला नक्कीच फायदे मिळण्यास मदत मिळेल. 

Leave a Comment