मसाल्याच्या डब्यातील जिरे. हे कोणत्याही फोडणीत टाकल्यानंतर पदार्थाला त्याची चांगलीच चव येते. साबुदाण्याची खिचडी, फोडणीचं वरण, भाजी यांची चव वाढवण्यासाठी गरम तेलात तडतडलेले जिरे हे पुरेसे असते. पण या व्यतिरिक्तही जिऱ्याचे पाणी हे आरोग्यासाठी फायद्याचे असते हे तुम्हाला माहीत आहे का? उपाशीपोटी जिऱ्याचे पाणी (Jeera Water) प्यायल्यामुळे फायदेच फायदे होतात. तुम्हाला असलेली एखादी समस्या आणि त्यावर जिऱ्याचे पाणी कसे फायद्याचे ठरते ते आज आपण जाणून घेणार आहोत.
जिऱ्याचे आरोग्यदायी फायदे

जिरे हे आरोग्यासाठी खूपच फायद्याचे असते. एक चमचा जिरे पाण्यात आदल्या रात्री भिजत घातले आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी गरम करुन प्यायलात तरी देखील चालू शकते.
- जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर जिऱ्याचे पाणी हे उत्तम आहे. जिऱ्याचे गरम पाणी प्यायल्यामुळे शौचाला साफ होते.
- पोटदुखीचा त्रास असेल तर पोटदुखी कमी होण्यास मदत होते. जिऱ्यामुळे पोटातील गॅसेस नियंत्रणात येण्यास मदत मिळते.
- ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे अशांसाठीही जिरे हे खूपच जास्त फायद्याचे आहे. जिऱ्याच्या सेवनामुळे ॲसिडिटीचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.
- डिटॉक्स करण्यासाठी जिऱ्याचे पाणी चांगले मानले जाते. जिऱ्याच्या पाण्यामुळे शरीरातून वाईट घटक निघण्यास मदत मिळते.
- जिऱ्याचे पाणी प्यायल्यामुळे ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
- कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यासाठी जिऱ्याचे पाणी खूप फायद्याचे ठरते.
- गर्भवती मातांसाठी जिऱ्याचे पाणी चांगले मानले जाते कारण जिऱ्यामध्ये असलेले घटक स्तनग्रंथीसाठी चांगले असतात.
- जिऱ्याचे सेवन आरोग्यासाठी खूपच फायद्याचे ठरते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.
- पोटात थंडावा मिळण्यासाठी जिऱ्याचे पाणी फायद्याचे असते.
- जिऱ्याचे पाणी सूज आणि अपचन करण्यास मदत करते.
जिऱ्याचे पाणी सेवन करताना
जिऱ्याचे पाणी घेताना ते जास्त होणार नाही याची काळजी घ्या. कारण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा त्रासदायक ठरु शकतो. दिवसातून एकदा जिऱ्याचे पाणी पिणे हे योग्य असते. गर्भवती महिलांनी जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करताना काही डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. त्यामुळे त्यांनी योग्य सल्ल्यानिशी जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करावे.
आता तुमच्या आहारात जिऱ्याच्या पाण्याचा समावेश करायला मुळीच विसरु नका.