दीपिका पदुकोण मुस्लिम एका व्यक्तीचा अजब दावा, व्हिडिओ वायरल

 आता एक अजबच व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. दीपिका पदुकोण (Deepika Padukone) ही हिंदू नसून ती ‘मुस्लिम’ असल्याचा अजब दावा पटना येथील एका व्यक्तिने केला आहे. दीपिकाचा सध्या ‘पठाण’ (Pathaan)हा चित्रपट नव्या वर्षात भेटीला येणार आहे. या चित्रपटातील एका गाण्यावरुन खरंतर अनेक वादंग सुरु आहेत. त्या निमित्तानेच अनेक ठिकाणी या गाण्याबद्दल आणि त्यातील दीपिकाच्या केशरी रंगाच्या मोनोकिनीबद्दल खूप चर्चा होताना दिसत आहे. दीपिका ही प्रकाश पदुकोण यांची मुलगी आहे हे आपण सगळेच जाणतो. पण आता या अजब दाव्यामुळे हसावे की काय करावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दीपिका पदुकोण मुस्लिम?

 शाहरुख खान (Sharukh Khan)- दीपिका पदुकोण(Deepika Padukone) स्टारर ब्लॉकब्लस्टर चित्रपट पठाण येत्या जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवरुन आणि दीपिकाच्या गाण्यावरुन आधीच वाद निर्माण झाले आहेत. या चित्रपटातील एका गाण्यात दीपिकाने(Deepika Padukone) भगव्या रंगाची मोनोकिनी घातली आहे. ज्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे आधीच त्यावर वाद संपूर्ण देशात सुरु आहे. अनेकांनी भगव्या रंगाचा वापर का यावर नाराजीही व्यक्त केली आहे. या संदर्भात अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर येत आहे. पण चित्रपट निर्माते विनोद कापरी यांनी शेअर केलेल्या एका व्हिडओने सगळ्यांचे लक्ष केंद्रित केलेले आहे. हा एका लोकल चॅनेलचा व्हिडिओ असून त्यामध्ये एक मध्यवयीन माणूस दीपिका पदुकोण ही मुस्लिम असल्याचे सांगत आहे. इतकेच नाही मी पाटना विद्यापीठातून पदवीधर झालेलो असून तुम्ही याचा अभ्यास करा. दीपिकाची लाईफ हिस्ट्री काढा असा दावा करत आहे. दीपिका ही मुस्लिम आहे. त्याच्या या बोलण्यावर ज्यावेळी त्याला पत्रकार प्रकाश पदुकोण कोण आहे? असे विचारतो त्यावेळी तो चाचरतो. प्रकाश पदुकोण कोण आहे ते माहीत नाही पण दीपिका मुस्लिम असल्याचे तो छातीठोकपणे सांगत आहे. त्याचे बोलणे ऐकून हसल्यावाचून राहता येत नाही. 

दीपिकाचे हॉट कमबॅक

दीपिकाचा(Deepika Padukone) हॉट असा अंदाज फार काळ स्क्रिनवर पाहिला नव्हता. तिने गेल्या काही वर्षापासून चांगल्या कथा आणि रोल्स असलेले असे चित्रपट केले आहेत. पण तिचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही चाललेले दिसले नाहीत. ‘पठाण’ (Pathaan)या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याची चर्चा सुरु झाली आहे. शाहरुख खानही (Sharukh Khan)खूप दिवसांनी मुख्य भूमिकेत दिसणार आहे त्यामुळे शाहरुखच्या चाहत्यांची उत्सुकताही शीगेला पोहोचली आहे. अशातच या चित्रपटातील काही सीन्समुळे चित्रपट वादातित झाला आहे. दीपिकाचा हॉट अंदाज पाहता काही गोष्टी प्रेक्षकांना नक्कीच खटकल्या असतील यात काहीही शंका नाही. पण दीपिकाच्या चाहत्यांना मात्र तिला एका वेगळ्या हॉट अंदाजात पाहता येणार आहे. 

दरम्यान आता या सगळ्या वादाचा फायदा चित्रपटाला नक्कीच होईल यात काही शंका नाही


Leave a Comment