मखाणा (Makhana) खाण्याचे हे फायदे करतील आश्चर्यचकित

 चांगले काय खाऊ त्यामुळे आरोग्य चांगले राहील असा विचार हल्ली सगळेच करतात. जेवणाच्या वेळा या चांगल्या आहार घेऊन हेल्दी राहता येत असले तरी देखील मधल्या वेळचं खाणं काय असावं हे अनेकदा कळत नाही. मग काय कळत नकळत आपण अनेकदा ज्या गोष्टी खायच्या नाहीत त्याच अधिक प्रमाणात खाऊन बसतो ज्यामुळे निरोगीकडे वाटचाल करता करता आपण चुकीच्या आणि शरीराचे वजन वाढवणाऱ्या गोष्टी खातो. तुमच्या याच मधल्या वेळच्या भुकेसाठी काहीतरी कुरकुरीत, चटपटीत असं काही हवं असेल तर तुमच्यासाठी मखाणा (Makhana) हा एक बेस्ट असा पर्याय आहे. मखाणा हा Fox Nuts या नावाने देखील ओळखला जातो.  आज आपण मखाणा खाण्याचे असेच फायदे जाणून घेणार आहोत. 

मखाणा म्हणजे काय?

makhana benefits (Source -Freepik)

मखाणा कशापासून बनतो या संदर्भात अनेक व्हिडिओज तुम्ही आतापर्यंत नक्कीच पाहिले असतील तर मखाणा हे पाण्यात येणाऱ्या लिलीच्या मुळाशी असणारी बी आहे. जी काढली जाते त्यावर अनेक प्रयोग केले जातात. काळ्या रंगाच्या दिसणाऱ्या या मखाण्यापासून पांढऱ्या रंगाचा लुसलुशीत भाग काढला जातो. मखाणा हा अनेक रेसिपीजमध्ये वापरला जातो. डाएट करणाऱ्यांनाही मखाणा नियमित खाण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्हाला स्नॅक्स म्हणून मखाणा खायचा असेल तर तो तुम्ही मस्त तुपात भाजून खाऊ शकता. त्यात मीठ किंवा आवडीप्रमाणे मसाला घातला तर तो तिखट आणि चटपटीत लागतो. या शिवाय मखाणा रायत्याच्या स्वरुपातही खूपच चविष्ट लागतो. 

गर्भधारणेत अडचणी येणाऱ्या महिलांकरिता फॉलिक्युलर स्टडीचे महत्त्व

मखाणा नियमित खाण्याचे फायदे

मखाणा खाण्याचे अनेक फायदे आहेत. ते कोणते ते आज आपण जाणून घेऊया 

  1. पोटाच्या आरोग्यासाठी मखाणा हा खूपच चांगला मानला जातो. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर तुम्ही भाजलेल्या मखाण्याचे सेवन करायला हवे. मखाण्याचे सेवन केल्यामुळे पोट साफ होण्यास मदत मिळते. 
  2. मखाणामध्ये अँटी एजिंग असे घटक आहेत. जे त्वचेचा तजेला टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात. त्वचा चिरतरुण राहण्यासाठी मखाणा हा फारच उत्तम आहे. 
  3. कोणतेही स्नॅक्स घेताना त्यामध्ये सोडिअम म्हणजे मीठ किती हे पाहून त्याचे सेवन करणे अधिक उचित ठरते. कारण ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्या आहारात मीठ जास्त असून चालत नाही. वजन कमी करायचा विचार करत असाल तर मखाणा हा आहारात असायलाच हवा. 
  4. गर्भधारणेत समस्या येत असतील तरी देखील मखाणा उत्तम आहे. मखाणाच्या सेवनामुळे सीमन ( Seman) वाढण्यास मदत मिळते. शिवाय ज्या महिलांना गर्भधारणा करण्यास अडचणी येत असतील तर ते देखील कमी होण्यास मदत मिळते. 
  5. शरीरातील प्रोटीनची कमतरता भरुन काढण्यासाठी मखाणा हा परिपूर्ण असा आहे. त्यामुळे दिवसातून एक ते दोन मुठ मखाणा खाण्यास काहीच हरकत नाही. 
  6. डाएबिटीझ आणि हार्ट पेशंटसाठीसुद्धा मखाणा हा उत्तम असा पर्याय आहे. यामध्ये खूप कमी प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट असते. 
  7. मखाणा शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करते आणि आवश्यक असलेले फॅटी ॲसिड किंवा चांगले फॅट शरीरात ठेवण्यास मदत करते. 

आता या पुढे बाजारात गेलात तर मखाणा आणायला अजिबात विसरु नका. 

स्तनाच्या कर्करोगासाठी इम्युनोथेरपी उपचार पद्धती अधिक प्रभावी

Leave a Comment