दीड वर्षातच मोडला संसार, मानसी नाईक घेणार घटस्फोट

सोशल मीडियावर नेहमीच आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी मानसी नाईक (Manasi Naik) गेल्या काही दिवसांपासून खूपच उदास आणि आयुष्यासंदर्भातील काही पोस्ट शेअर करत आहे. अनेक गाण्यातून नृत्य सादर करत मानसीने अनेकांचे मन जिंकले आहे. मानसी चित्रपटामध्ये दिसत नसली तरीही सोशल मीडियावर ती बरीच अॅक्टिव्ह असते. पण सध्या मानसी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. मानसीने मोठ्या धुमधडाक्यात नॅशनल बॉक्सर प्रदीप खरेरा (Pradeep Kharera) याच्यासह 2021 मध्ये लग्नगाठ बांधली. मात्र आता मानसीच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आलं असून तिने खरेरा हे आडनावही हटवलेले दिसून येत आहे. केवळ दीड वर्षातच या दोघांच्या नात्यात दुरावा (Manasi Naik Pradeep Kharera Divorce) आला असून दोघेही लवकरच वेगळे होणार असल्याचे म्हटलं जात आहे. तर मानसीच्या वेगवेगळ्या पोस्टवरूनही हेच सिद्ध होत आहे. मानसीने अजून याबाबत काहीही सांगितले नसले तरीही तिने प्रदीपसह सर्व फोटो डिलीट केल्यामुळे या चर्चांना अधिक उधाण आले आहे. 

मानसीने केल्या काही Cryptic Posts 

मानसीने गेल्या काही दिवसांपासून आपल्या सोशल मीडियावर खूपच वेगळ्या आणि उदासवाण्या पोस्ट करत आहे. त्याशिवाय कोणीही कितीही आपले पंख छाटले तरीही आपण तितक्याच वेगाने पुन्हा उडणार अशा स्वरूपाच्या मानसीच्या पोस्ट वाचूनच तिच्या संसाराला नक्कीच कोणाची तरी नजर लागली आहे याचा अंदाज आता तिचे चाहते काढू लागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे मानसी आणि तिच्या नवऱ्याने दोघांनीही एकमेकांबरोबरील सर्व लग्नाचे फोटो सोशल मीडियावरून डिलीट केले आहेत. इतकंच नाही तर सर्व रोमँटिक फोटो, फोटोशूट आणि रिल्सदेखील काढून टाकण्यात आले आहेत. या दोघांनीही तीन दिवस लग्नाचा सोहळा गाजवला होता. तर मानसीने अनेक रिल्स आणि फोटो आपल्या लग्नाचे पोस्ट केले होते. मात्र आता तिच्या अकाऊंटवर प्रदीप आणि तिचा एकही फोटो नाही. त्यामुळे या दोघांच्या नात्यात खूपच कटुता आल्याचा अंदाज सध्या लावला जात आहे. मानसीने वेगळे होण्याचा आणि घटस्फोट घेण्याचा निर्णय तर घेतला नाही ना? याची चिंता तिच्या चाहत्यांना सतावत आहे. मात्र या सगळ्यात दोघांकडून कोणतीही अधिकृत घोषणा आतापर्यंत करण्यात आलेली नाही. 

मॅडम एकदम कडक 

सध्या मानसी नाईक ‘एकदम कडक’ साठी प्रमोशन करत आहे. अनेक इन्फ्लुएन्सर्ससहदेखील मानसी सध्या या गाण्याचे प्रमोशन करताना दिसून येत आहे. मात्र लग्नानंतर काही महिने मानसी भारतीय पेहरावात अर्थात साडीमध्ये फिरत होती तशी दिसत नसून पुन्हा एकदा वेगळ्या वेषात आणि अवतारात मानसी दिसून येत आहे. 2 डिसेंबर रोजी मानसीचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अनेक वर्षांनी पुन्हा एकदा मानसी चित्रपटातून समोर येत आहे. मात्र त्यापूर्वी अनेक गाण्यांच्या कार्यक्रमातून मानसी दिसली होती. मात्र मानसीने नक्की काय पाऊल उचललं आहे आणि प्रदीपपासून नक्की वेगळी झाली आहे का? याबाबत तिच्या चाहत्यांना नक्कीच चिंता आहे. तर या जोडीने असं पाऊल उचलू नये असंही अनेकांना वाटत आहे. 

Leave a Comment