…आणि सई ताम्हणकरनेही लावली ‘टिकली’

सई ताम्हणकर (Saie Tamhankar) आपल्या फॅशन सेन्ससाठी खूपच प्रसिद्ध आहे. साडी असो अथवा आधुनिक कपडे असो सई अत्यंत स्टायलिश पद्धतीने कपडे कॅरी करते. मराठी चित्रपटसृष्टीतील बोल्ड अभिनेत्री म्हणूनही सईची ओळख आहे. याशिवाय मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये सई ताम्हणकर काम करत असून तिचे अनेक चाहते आहेत. त्याशिवाय सोशल मीडियावरही सई नेहमी अॅक्टिव्ह दिसून येते. सईचे फोटो नेहमीच हॉट असतात असं म्हटलं जातं. इतकंच नाही तर सई जे घालते ती तिला छान दिसते असंही तिच्या बाबतीत म्हटलं जातं. अनेक तरूणी सईची स्टाईलही फॉलो करतात. तर सईने काही दिवसांपूर्वी ‘वुमन फिटनेस’ (Woman Fitness) या मॅगझिनसाठी बिकिनी शूट केले होते. तर तिच्या पेजवर तिने काही फोटो पोस्ट केले आहेत ज्यात तिने मॉर्डन कपड्यांवर टिकली लावली आहे. सध्या टिकली हा विषय खूपच गाजत आहे आणि त्यामुळेच या फोटोकडेही लक्ष वेधले गेले आहे. 

साधा पण लक्ष वेधणारा लुक

सईचा हा लुक लक्ष वेधून घेत आहे. मॉर्डन तरीही पारंपरिक टच असणारा असा हा लुक खूपच उठावदार आहे. सईने लव्हेंडर रंगाचा लेहंगा घातला असून त्यावर अतिशय साधा मेकअप केला आहे आणि कपाळावर टिकली लावली आङे साधेपणातच सौंदर्य आहे असाच एक मेसेज जणू काही सई देत आहे असं या फोटोवरून वाटत आहे. सई ताम्हणकर (Actress Saie Tamhankar) या फोटोमध्ये अत्यंत सुंदर दिसत असून तिने अत्यंत मिनिमल मेकअप आणि दागिन्यांचा वापर केला आहे. कॉटन कँडी (Cotton Candy) लेहंग्यामध्ये सई खूपच सुंदर दिसत आहे. त्याशिवाय कपाळवार लावलेल्या टिकलीने सईच्या सौंदर्यात भर पडली आहे असंच म्हणावं लागेल. 

टिकलीचा वाद गाजत आहे

भिडे गुरूजींनी एका पत्रकाराला आधी टिकली लावून ये मग प्रश्नांची उत्तरे देईन असे सांगितल्यामुळे नवा वाद निर्माण झाला होता. त्यावरून अनेकांनी आपले मते मांडली आहेत. तर मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही यावर आपली मते मांडली होती. यावरून टिकली आणि कुंकू का लावावे याचे वैज्ञानिक कारणही अनेक ठिकाणी सांगण्यात आले. मात्र टिकली लावणे हा आपल्या प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे अशा विचारांची माणसेही अनेक आहेत. त्यातही अभिनेत्री बऱ्याचदा टिकल्यांशिवाय दिसतात. तर आता या वादानंतर अनेकांनी टिकली लावलेले फोटोही पोस्ट करायला सुरूवात केली आहे. सईचा हा सुंदर फोटोही त्यामुळे लक्ष वेधून घेत आहे. तर काही अभिनेत्रींनी मुद्दाम टिकली लावलेले आणि काही जणींनी टिकली न लावलेले असे फोटोही पोस्ट केले आहेत. 

Leave a Comment