Ganesh Murti Vaastu Tips: गणेश स्थापनेपूर्वी जाणून घ्या हे नियम

भगवान गणेश (Ganesh) प्रत्येकाच्या घरी पूजण्यात येतात. पण गणेशाची प्रतिमा स्थापन करण्याचे अनेक नियम सांगण्यात येतात. गणेशाच्या प्रतिमेचे स्वरूप कसे असावे वा त्याचा रंग कसा असावा. गणपतीची सोंड उजवीकडे नसावी अथवा गणपती कोणत्या दिशेला स्थापित करावा यासारखे अनेक नियम पाळावे असे सांगण्यात येते. जेणेकरून गणेशाच्या स्थापनेनंतर घरात सुखसमृद्धी आणि धनधान्य कायम टिकून राहो आणि घरात चांगले वातावरण राहो अशी इच्छा असते. गणेशाचे प्रत्येक रूप हे सुखसमृद्धी दर्शविते. कार्य सिद्धीस नेण्यास आपण नेहमीच गणेशाची आराधना करतो आणि घरात गणेश स्थापित करतो. पण गणेशाची मूर्ती स्थापन करण्यापूर्वी तुम्हाला काही नियम आणि काही गोष्टी जाणून घेणे वास्तुशास्त्रानुसार (Vaastu Tips – How to keep Ganesh Idol) आवश्यक आहे. 

सुखशांतीसाठी गणेशाची स्थापना

Vaastu Tips – How to keep Ganesh Idol

ज्या व्यक्तींना घरात सुखशांती हवी असते त्यांनी वास्तुशास्त्रानुसार घरात सफेद रंगाच्या गणेशाच्या मूर्तीची (Ganesh Idol) स्थापना करावी. गणपतीची पांढरी मूर्ती अथवा पांढऱ्या गणेशाचा फोटो तरी किमान घरी असू द्यावा. यामुळे घरात सुख शांती आणि समाधान कायम राहाते असे वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे.  

बाधा दूर करण्यासाठी 

काही व्यक्तींच्या कामात कितीही प्रयत्न केले तरीही बाधा येतच असते. अशा व्यक्तींनी गणेशावर भक्ती असल्यास, केशरी रंगाच्या गणपतीची स्थापना घरात करावी. तसंच रोज या मूर्तीची मनोभावे पूजा केल्यास, तुमच्या कामातील या बाधा दूर होण्यास मदत मिळते. 

अशी असावी गणपतीची प्रतिमा

घरात गणपतीची प्रतिमा ही नेहमी बैठकीतल्या गणपतीची असू द्यावी. उभ्या गणपतीची प्रतिमा कधीही घरात लावता कामा नये. बसलेल्या बाप्पाच्या प्रतिमेमुळे घरात सुख समृद्धी कायम राहाते आणि कायम यशप्राप्ती होते असं वास्तुशास्त्रात सांगण्यात येते. तर दुकानामध्ये तुम्हाला बाप्पाची प्रतिमा हवी असल्यास, तुम्ही उभ्या गणपतीच्या प्रतिमेचा वापर करावा. या स्थळावर सकारात्मक ऊर्जेसाठी याचा उपयोग होतो आणि कामात वृद्धी मिळते. 

या गोष्टींची घ्या काळजी 

Vaastu Tips – How to keep Ganesh Idol
  • गणपतीची मूर्ती घरात स्थापित करताना नेहमी गणपतीसह त्याचे प्रिय वाहन मूषक अर्थात उंदीर पायाजवळ असावे आणि हातात लाडू असणारी मूर्ती निवडावी. लाडू आणि उंदराशिवाय घेण्यात आलेली मूर्ती ही अप्रभावी मानण्यात येते
  • पूजेच्या ठिकाणी एकच गणपती असू द्यावा. एकापेक्षा अधिक प्रतिमा असल्यास, रिद्धी आणि सिद्धीचा कोप होतो असं म्हटलं जातं
  • स्वस्तिक हे बाप्पाचे अतिशय आवडते चिन्ह आहे. त्यामुळे वास्तुदोष असल्यास, नेहमी गणपतीसह एक स्वस्तिक काढावे. यामुळे वास्तुदोष निघून जाण्यास मदत मिळते 
  • तुमचे घर हे दक्षिणमुखी असेल तर तुम्ही दाराच्या उंबरठ्यावर आत आणि बाहेर दोन्ही बाजूला गणेशजीची प्रतिमा लावावी. यामुळे तुमची भरभराट होते. तसंच हा फोटो जास्त मोठा वा जास्त लहान असू नये 
  • गणपतीचा फोटो जर घराच्या बाहेर लावायचा असेल तर त्याची दिशा ही उत्तर अथवा पूर्व असावी हे तुम्ही लक्षात ठेवा

मनात येईल तसा आणि वाट्टेल तिथे गणपतीचा फोटो अथवा मूर्ती ठेऊ नये. त्याचा वास्तुनुसार चांगला-वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे या नियमांचा उपयोग करून तुम्ही बाप्पाची स्थापना करा. 

Leave a Comment