दगडूच्या आयुष्यात खऱ्या प्राजूचा प्रवेश! सहकलाकारांनी केले अभिनंदन

‘दगडू आणि प्राजू’ ही नावं घेतली की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि केतकी माटेगावकर (Ketaki Mategaonkar). दगडू व्यक्तिरेखा अक्षरशः प्रथमेश परबने जगली असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. आतापर्यंत कधीही प्रथमेशचं नाव कोणत्याही अभिनेत्री अथवा कोणाहीसोबत जोडण्यात आलेले नाही. पण आता दिवाळीच्या दिवशी अचानक सोशल मीडियावर फोटो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा आणि आनंदाचा धक्का बसला आहे. दगडूच्या आयुष्यात खऱ्या प्राजूचा प्रवेश झाला की काय असाच प्रश्न आता सर्वांना पडला आहे. तर अनेकांनी प्रथमेश परबच्या या फोटोखाली हार्ट इमोजी देत त्याच्या या नात्यावर शिक्कामोर्तबच केल्याचे दिसून आहे. प्रथमेशसह असणारी ही मुलगी नक्कीच खास आहे असा अंदाज आता सर्व लावत आहे. क्षितीजा घोसाळकर (Kshitija Ghosalkar) असे या मुलीचे नाव असून मैत्रीपेक्षाही अधिक काहीतरी असल्याचा अंदाज लावला जात आहे. 

दिवाळीनिमित्त केली मोठी पोस्ट 

भारतीय संस्कृती आणि सण कसले भारी आहेत राव!😍😍

म्हणजे रोजच्या धकाधकीच्या जीवनात , घडाळयाच्या काट्यानुसार धावणाऱ्या आपल्या सर्वांनाच, एका क्षणात pause करून एकत्र आणतात.🤗❤️😎

आपल्या busy schedule मधून वेळ काढून त्यांचं celebration करवून घेतात☺️ एखादं लहान बाळ कसं आईकडे हट्ट करून आपले लाड पुरवून घेतं, अगदी तसेच🤗🤗

आणि त्यातून दिवाळी म्हटली की ती “साजरी” करणं कोणाला बरं नाही आवडत??🥰

पण to be very honest, आजकाल ती साजरी करण्याची व्याख्याचं पार बदलून गेली आहे.🙄

फराळ बनवणं, रांगोळी काढणं, घर सजवणं, दिव्यांची आरास करणं हे फक्त एक निमित्त असतं….. एकत्र येण्याचं🤗🤗

आईला फराळ बनवायला मदत करतांना , तिच्यासोबत किचन मध्ये 2,3 तास घालवल्यावर , ती आपल्यासाठी दररोज घेत असलेल्या कष्टांची जाणीव होते.🙏

रांगोळी काढताना जितका विचार करून आपण तिच्यात रंग भरतो आणि मन लावून ठिपके जोडतो, प्रत्येक नात्यात तितकंच मन लावून रंग भरता यायला हवेत.🤩☺️

घर सजवताना किंवा त्याची साफसफाई करताना, कधीकधी अचानक जुन्या गोष्टी सापडतात आणि आठवणींच्या अल्बम मध्ये नकळत आपल्याला घेऊन जातात, हो ना?🤗

दिव्यांची आरास जितक्या प्रेमाने आणि कौतुकाने आपण करतो तितकच प्रेम आणि कौतुक नात्यांचं देखील असावं म्हणजे आयुष्य दिव्याच्या प्रकाशासारखं उजळून निघतं.🤍❤️

थोडक्यात काय,

निमित्त जरी दिवाळी चं असलं तरीदेखील नात्यांचं साजरं होणं महत्वाचं!

#मेरे_तुम्हारे_सब_के_लिये #HappyDiwali😘❤️😎

अशा स्वरूपाचे मोठे कॅप्शन लिहीत क्षितीचाने प्रथमेशला टॅग केलं आहे आणि त्यांचा एकमेकांसह प्रेमाचा फोटोही पोस्ट केला आहे आणि त्यावरून त्यांच्यातील नेमकं ‘नातं’ काय हेदेखील दाखवून दिले आहे असं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही.

अनेक सहकलाकारांकडून पुष्टी 

प्रथमेश आणि क्षितीजा यांनी एकमेकांना टॅग केल्यानंतर अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले आणि हे नक्की कधी झालं? अशा स्वरूपाचे मेसेजही प्रथमेशच्या फोटोखाली केले आहेत. तर काहींनी दोघांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर नुकतीच टाईमपास 3 मधील प्रथमेश परबची असणारी सहकलाकार हृता दुर्गळेने हार्ट इमोजी देत या नात्याला एक प्रकारे पुष्टीच दिली आहे असे म्हणायला हवे.

Leave a Comment