दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारा ‘आली दिवाळी’ म्युझिक व्हिडिओ

दिवाळी (Diwali 2022) म्हणजे रोषणाई, अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज, फटाक्यांची आतषबाजी आणि स्वादिष्ट फराळाची मेजवानी. दिवाळी म्हणजे संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाची लयलूट. दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘सप्तसुर म्युझिक’ने ‘आली दिवाळी’ हे गाणं लाँच केलं आहे. दिवाळीच्या या शुभ मुहूर्तावर प्रेक्षकांसाठी हा नजराणा आहे. दिवाळाचा आनंद होणार द्विगुणित. 

आली दिवाळी गाण्याची निर्मिती

साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांच्या सप्तसूर म्युझिकने (Saptasur Music) आली दिवाळी गाण्याची निर्मिती केली आहे. शशांक कोंडविलकर (Shashank Kondvilkar) यांनी गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन केलं आहे. युक्ता पाटील आणि सत्यम पाटील यांनी गाणं गायलं आहे. म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन नीरव म्हात्रे यांचं आहे. अस्मिता सुर्वे, भरत जाधव, प्राजक्ता ढेरे, प्रणय केणी, दिव्या पाटील, पंकज ठाकूर, रश्मिता तारे, सौरभ गर्गे, बीना राजाध्यक्ष, परिणिती ठाकूर, दिव्यांश म्हात्रे, सिया पाटील, हर्षवी ठाकूर, रुपांश पाटील म्युझिक व्हिडिओमध्ये झळकले आहेत. दिवाळीच्या काळात घरोघरी असलेलं आनंद आणि उत्साहाचं वातावरण या म्युझिक व्हिडिओतून टिपण्यात आलं आहे. अतिशय उत्तम शब्द, श्रवणीय संगीत हे या गाण्याचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपलंसं वाटणारं हे गाणं दिवाळीच्या अनेक आठवणींना नक्कीच उजाळा देईल. त्यामुळे दिवाळीचा आनंद यंदा ‘आली दिवाळी’ या म्युझिक व्हिडिओद्वारे द्विगुणित होणार हे नक्की!

दिवाळीचा वेगळेपणा जपणारा व्हिडिओ

दिवाळी म्हटलं की घरोघरी आनंद आणि दीपोत्सव साजरा केला जातो आणि याचेच निमित्त साधून हा म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षात दिवाळीची काही खास गाणी आलेली नाहीत. त्यामुळे या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर हे आली दिवाळी नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या काही वर्षात दिवाळी पहाट अथवा दिवाळीची गाणी या गोष्टी पाहायला गेल्या तर कमी दिसून येत आहेत. दिवाळीचा आपला सण साजरा करण्यासाठी आणि प्रेक्षकांना एक वेगळी अनुभूती मिळवून देण्यासाठी हा म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित करण्यात येत आहे. यासाठी प्रेक्षक नक्कीच भरभरून प्रतिसाद देतील असा विश्वास नीरव म्हात्रे यांना आहे. तर युक्ता पाटील आणि सत्यम पाटील यांचा आवाज नक्कीच प्रेक्षकांना आवडेल आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळेल याचाही विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. 

दिवाळी हा असा सण आहे जो जगभरात साजरा करण्यात येतो. तर लहान मुलांना याचे विशेष आकर्षण असते. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हा सण अगदी मनापासून साजरा करण्यात येतो. महत्त्वाचे म्हणजे या सणाला सगळीचे एकत्र येतात आणि कुटुंबासह हा सण साजरा करतात. त्यामुळेच हे कौटुंबिक जिव्हाळ्याचे दिवाळीचे गाणे खास तुमच्या भेटीला घेऊन आले आहेत. 

आपण सर्वांना दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा! (Happy Diwali)

तमाशामधील मुलीच्या प्रेमाची व्यथा मांडणारा ‘लल्लाट’

Bigg Boss मराठी | गटबाजीच्या आड काही स्पर्धकांचा होतोय फायदा

बहुप्रतिक्षित थ्रिलर ब्रीद: इंटू द शॅडोज सीझन 2 चा प्रीमियर 9 नोव्हेंबर रोजी

Leave a Comment