तमाशामधील मुलीच्या प्रेमाची व्यथा मांडणारा ‘लल्लाट’

मागील काही दिवसात रोहित राव नरसिंगे लिखित आणि दिग्दर्शित यांचा स्टोरी ऑफ लागीर चित्रपट मराठी टेलिव्हिजन वर प्रदर्शित झाला. या चित्रपटास महाराष्ट्रातील प्रेक्षक वर्गाने भरभरून प्रेम दिले.या नंतर लगेच रोहित राव नरसिंगे यांनी त्यांचा दुसरा चित्रपट ‘ लल्लाट ‘ (Lallat) या चित्रपटाची घोषणा केली आहे त्यामुळे प्रेक्षक वर्गाला सध्या लल्लाट हा कुतूहलाचा विषय ठरला आहे.महाराष्ट्रामधील सर्व प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढलेली दिसत आहे. हा चित्रपट मॅक फिल्मस प्रोडक्शन आणि एम आर जोकर एन्टरटेन्मेंट या चित्रपट निर्मिती संस्थे अंतर्गत होणार आहे अशी माहिती सध्या सोशल मीडिया वर मिळत आहे.या चित्रपटाचे निर्माते महादेव अशोक चाकणकर असून लल्लाट हा चित्रपट हा त्यांचा पहिला निर्मिती करत असलेला चित्रपट आहे.

लल्लाट अर्थात नशीब 

सध्या मराठी चित्रपटाला सुगीचे दिवस आले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. रोहित राव नरसिंगे यांच्या संकल्पनेमधील स्टोरी ऑफ लागीर या चित्रपटास प्रेक्षक वर्ग आणि रसिक वर्गाने भरभरून प्रेम दिले. त्यामुळे आगामी चित्रपट लल्लाट यात नेमकं काय बघायला मिळणार ? याबाबत सगळ्यांचा कुतुहुल आहे. नुकतीच लल्लाट या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. तर यामध्ये प्रमुख भूमिकेत नक्की कोण झळकणार आणि 

“लल्लाट” असे  या चित्रपटाचे अतिशय अनोखं शीर्षक आहे. “लल्लाट” या शीर्षकाचा संबंध येथे नशिबाशी आणि त्यात एका तमाशा मध्ये लावणी नृत्य करणाऱ्या मुलीच्या नशिबाशी केला आहे अस समजतं. आपलं एका श्रीमंत मुलाशी असलेलं प्रेम बाजूला ठेवून त्याचं आयुष्यात कसं प्रेम भरता येईल याचा प्रयत्न करणाऱ्या मुलीची आणि समाजाच्या विरुद्ध जाऊन एका तमासगीर मुलीला इज्जत देण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलाचं काम यात दिसून देणार आहे. आपल्या प्रेमाची आहुती देणाऱ्या तमासगीर मुलीचे रोमहर्षक प्रेम ‘लल्लाट’ मध्ये पाहायला मिळणार आहे.

प्रेमकथा येणार भेटीला 

मॅक फिल्मस प्रोडक्शन, ए एस डी डिझाइन आणि एम आर जोकर एन्टरटेन्मेंट निर्मिती संस्थे अंतर्गत बनत असलेला ‘ लल्लाट ‘ या चित्रपटाच लेखन आणि दिग्दर्शन रोहित राव नरसिंगे करणार आहेत. महादेव अशोक चाकणकर, अनिल मदनसुरी आणि रोहित राव नरसिंगे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. एप्रिल 2023 हा चित्रपट रसिक दरबारी म्हणजेच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ही एक तमासगीर मुलीची आणि तिच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या तरूणाची प्रेमकथा आहे. त्यामुळे आता हा चित्रपट प्रेक्षकांना कसा आवडणार आणि प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात पाहावे लागणार आहे. कारण गेल्या वर्षभरात तमाशावर अनेक चित्रपट आले आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांनी खूपच चांगला प्रतिसाद दिला होता. तर या चित्रपटात नक्की कोणती जोडी पाहायला मिळणार? नवे चेहरे असणार की प्रसिद्ध चेहऱ्यांचा वापर करून हा चित्रपट बनवला जात आहे याबाबत आता चर्चेला सुरूवात झाली आहे. 

Bigg Boss 16 |  मराठमोळा शिव ठाकरे बनला कॅप्टन

बहुप्रतिक्षित थ्रिलर ब्रीद: इंटू द शॅडोज सीझन 2 चा प्रीमियर 9 नोव्हेंबर रोजी

“धुमशान घाला रे” हे मालवणी बोलीभाषेतले गीत प्रेक्षकांच्या भेटीला

Leave a Comment