बहुप्रतिक्षित थ्रिलर ब्रीद: इंटू द शॅडोज सीझन 2 चा प्रीमियर 9 नोव्हेंबर रोजी

आज बहुप्रतिक्षित ब्रीद: इंटू द शॅडोच्या नवीन सीझनची घोषणा केली. नवीन सीझनचा जागतिक प्रीमियर भारतात व 240 हून अधिक देश-प्रदेशांत 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे. रोमांचक वळणे आणि धक्क्यांनी युक्त असलेल्या या सायकोलॉजिकल थ्रिलरमध्ये अभिषेक ए. बच्चन (Abhishek Bachchan) व अमित साध (Amit Sadh) हेच प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. मात्र, या नाट्यातील थरार व रहस्य आणखी गहिरे होणार आहे. नित्या मेनन (Nitya Menon), सैयामी खेर (Saiyami Kher) व इवाना कौर (Evana Kaur) या शोमध्ये पुन्हा दिसणार आहेत आणि त्यांच्या व्यक्तिरेखा अधिक उत्क्रांत होत जाणार आहे. त्यामुळे नवीन सीझनला अधिक रोमांचक अॅक्शनची फोडणी मिळणार आहे आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची शोची ताकद आणखी वाढणार आहे. त्यातच या सर्वांची प्रशंसा प्राप्त झालेल्या अॅमेझॉन ओरिजिनल शोमध्ये नवीन कस्तुरियाची भर पडली आहे. विक्रम मल्होत्रा व अबण्डंशिया एंटरटेन्मेंटद्वारे निर्मित या आठ भागांच्या शोची सहनिर्मिती व दिग्दर्शन मयंक शर्मा (Mayank Sharma) यांनी केले होते. मागील सीझनची धुराही त्यांनीच सांभाळली होती.

रहस्यमय थरारनाट्याच्या नवीन सीझन

“ब्रीद: इंटू द शॅडोज या आमच्या प्रमुख थ्रिलर शोचा नवीन सीझन आणणे आमच्यासाठी थरारक अनुभव आहे,” असे प्राइम व्हिडिओच्या इंडिया ओरिजिनल्सच्या प्रमुख अपर्णा पुरोहित म्हणाल्या. “प्रेक्षकांनी नवीन सीझनची मागणी करणे ही शोच्या यशाला मिळालेली पावती असते. कथनकारांच्या जीव तोडून काम करणाऱ्या टीमने निर्माण केलेल्या व अफलातून कलावंतांनी जिवंत केलेल्या या रहस्यमय थरारनाट्याच्या नवीन सीझनमध्ये आशा आणि तणाव यांची प्रेक्षकांना श्वास रोखून धरायला लावणारी गुंफण आहे. अबण्डंशिया एंटरटेन्मेंसोबत आम्ही दीर्घकाळापासून जोडलेले आहोत, आम्ही एकत्रितपणे अनेक शो व फिल्म्सची निर्मिती केली आहे, पण ‘ब्रीद’ फ्रॅंचायझी आमच्यासाठी नेहमीच विशेष राहील, कारण, हा आमच्या सहयोगातून निर्माण झालेला पहिला प्रकल्प आहे. ब्रीथ: इंटू दू शॅडोज सीझन 2 हे धाडसी, रहस्यमय नाट्य आहे. थरारनाट्यासाठी आवश्यक ते सर्व घटक यात आहेत आणि ते उत्तमरित्या वापरण्यात आले आहेत.”

प्रचंड नाट्य, रहस्य आणि टोकाच्या भावना

“आमच्या जगभरातील प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या कथा देण्यासाठी अॅबण्डटिया एंटरटेन्मेंट वचनबद्ध आहे, आणि ब्रीद: इंटू द शॅडोज सीझन 2 हे काँटेण्ट निर्माते म्हणून हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे. अॅबण्डिटिया एंटरटेन्मेंट व प्राइम व्हिडिओ यांच्यात भक्कम समन्वय व काँटेण्टबाबतची संवेदनशीलता आहे आणि आम्ही एकत्रितपणे निर्माण केलेल्या कथा भारतातील तसेच त्यापलीकडील लक्षावधी प्रेक्षकांंसाठी हृदयस्पर्शी ठरल्या आहेत. 2018 मधील ‘ब्रीद’ या पहिल्या ओरिजिनलपासून प्राइम व्हिडिओसोबत सुरू झालेला प्रवास खूपच यशस्वी ठरला आहे आणि यापुढेही अनेक परिणामकारक गोष्टी एकमेकांच्या साथीने सांगण्यास आम्ही उत्सुक आहोत,” असे अबण्डंशिया एंटरटेन्मेंटचे संस्थापक व CEO विक्रम मल्होत्रा म्हणाले.  “हा नवीन सीझन सिनेमाच्या स्तरावर तयार करण्यात आला आहे आणि अनपेक्षितावरील पडदा दूर करून ब्रीदच्या विश्वाला तो अधिक खोलवर घेऊन जाणार आहे. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवणाऱ्या थरारक क्षणांनी भरलेला तसेच प्रचंड नाट्य, रहस्य आणि टोकाच्या भावनांनी युक्त असा हा सीझन प्रेक्षकांना श्वास रोखून धरायला ठेवण्यास सज्ज आहे.”

दिग्दर्शक मयंक शर्मा यांनी ब्रीथ: इंटू द शॅडोजचे सहलेखनही अर्शद सईद, विक्रम तुली, प्रिया सागी व अभिजित देशपांडे यांच्या साथीने केले आहे.

अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटमची संकल्पना, निर्मिती आणि दिग्दर्शन असणारा “मधुरव” आता रंगभूमीवर

“धुमशान घाला रे” हे मालवणी बोलीभाषेतले गीत प्रेक्षकांच्या भेटीला

सोशल मीडियावर अक्षय कुमारला (Akshay Kumar) म्हटले जातेय ढोंगी

Leave a Comment