Bigg Boss मराठी | गटबाजीच्या आड काही स्पर्धकांचा होतोय फायदा

 Bigg Boss मराठी  च्या घरातील प्रत्येक दिवस आता रोमांचकारी होऊ लागला आहे. घरात दुसऱ्या कॅप्टनच्या रुपाने डॉ. रोहित शिंदे निवडला गेला आहे. घरात होणारे टास्क पाहता आता ते सगळे एकतर्फी होत असल्याचे दिसू लागले आहेत. Bigg Boss च्या इतिहासात असे कायम दिसून आले आहे की, एखादा व्यक्ती आकर्षक असला की, त्याचा एक गट बनतो. त्यात काहींना जागा मिळत नाही हे देखील तितकेच खरे आहे. या सीझनमध्येही गट हे पडले आहेत. पण ज्या एका गटाकडे अधिक लोकं आहेत. त्या गटातील काही स्पर्धकांना मात्र या गटबाजीचा फायदा होताना दिसत आहे. नेमका कोणत्या स्पर्धकांना याचा फायदा होतोय घेऊया जाणून 

“धुमशान घाला रे” हे मालवणी बोलीभाषेतले गीत प्रेक्षकांच्या भेटीला

विमानतळ टास्कमध्ये दिसली एकी

घरात दोन गट आता दिसून आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने समृद्धी, रोहित, अपूर्वा, अक्षय, योगेश, मेघा,त्रिशूल,यशश्री, रुचिरा असा एक गट दिसून येतो. दुसऱ्या गटाचा विचार करता यामध्ये प्रसाद, अमृता धोंगडे, तेजस्विनी, विकास, अमृता देशमुख, निखिल राजेशिर्के असा एक गट दिसून येतो. यात किरण माने यांचा गट नेमका कोणता कळत नसला तरी देखील त्यांचा कल प्रसाद जवादेच्या गटाकडे दिसून येतो.पहिल्या गटाच्या तुलनेत दुसरा गट हा तितका खात्रीशीर दिसत नाही. कारण या गटातील लोकांना खेळ हा फारसा कळून आलेला दिसत नाही. त्यातल्या त्यात प्रसाद जवादे आपल्या पद्धतीने खेळून आपल्या टिमला जिंकवण्याचा प्रयत्न करतो पण त्याला कोणीही समजून घेताना दिसत नाही. त्यामुळे घरात त्याची अवस्था कानफाटक्या अशी झाली आहे. त्याच्या गोष्टी चांगल्या असूनही त्या कोणाला कळत नाही असे दिसून येत नाही. त्यामुळे घरात त्याला काही काळ तरी एकटे निर्णय घ्यावा लागणार आहे असे दिसत आहे. 

Bigg Boss Marathi 4: घरात पैशांचा पाऊस आणि समृद्धी जाधव पहिली कॅप्टन, कोण आहे समृद्धी

या स्पर्धकांना होतोय फायदा

दिव्याखाली अंधार या उक्तीप्रमाणे गट क्रमांक १ म्हणजेच रोहित, अपूर्वा, मेघा आणि अक्षय यांच्या गटाचा विचार करता काही या गटातील काही लोकं ही केवळ या गटात आहेत म्हणून ते सेफ आहेत असे दिसत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने रुचिरा, हिचा समावेश आहे. आतापर्यंत झालेल्या कोणत्याही टास्कमध्ये तिने तो टास्क खेळण्याची जिद्द दाखवलेली नाही. कोणत्याही ॲक्टिव्हिटी टास्कमध्येही ती दिसत नाही. या खालोखाल त्रिशूल, किरण माने,निखिल राजेशिर्के  हे देखील घरात फारसे दिसत नाहीत. पण या संख्याबळाच्या जोरामुळे या स्पर्धकांना त्याचा फायदा होतो. घरात चिअर करण्यासाठी नाही तर आपली बाजू मांडण्यासाठी स्पर्धकांची गरज आहे. त्यामुळे सध्या या स्पर्धकांना प्रेक्षकांच्या वोटाचा आधार काही काळासाठी मिळाला तर  त्यांनी त्यांच्यात बदल घडवणे गरजेचे आहे. 

कॅप्टन्सीचा टास्कमध्ये मुलीच ठरल्या भारी

रोहित आणि अक्षय यांना कॅप्टन्सीची दावेदारी मिळाल्यानंतर कार पार्किंगचा खेळ त्यांच्यात रंगला होता. दोन स्पर्धकांना आपल्यासाठी स्पर्धक निवडायचे होते. मिळालेली गाडी ही पार्किंग स्पेसमध्ये पार्क करायची होती. ही स्पर्धा अतितटीची झाली. यामध्ये मुलांनी त्यांची चांगलीच ताकद दाखवली. मुळातच गाडी जड होती. पण दोन्ही बाजूच्या मुलींनी आपली शक्ती आणि युक्तीपणाला लावून गाडी पार्क करण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये रोहित शिंदेचा विजय झाला. 

पण या घरातील गटबाजी करुन सेफ होऊ पाहणाऱ्या स्पर्धकांना आता कंबर कसण्याची फारच गरज असल्याचे दिसून येत आहे. 

Leave a Comment