जोडीदारासह सिक्रेट सेक्शुअल फँटसी कशी कराल शेअर, सोप्या टिप्स

प्रत्येकाच्या मनात सेक्सबाबत (Sex) सिक्रेट सेक्शुअल फँटसी (Secret Sexual Fantasy) असतातच. कोणीही कितीही नाकारले तरीही हे सत्य आहे. पण काही जण आपल्या जोडीदारासह याची चर्चा करायला लाजतात अथवा त्यांना जोडीदारासह याबाबत बोलता येत नाही. पण असं करणं योग्य नाही. तुम्हाला सेक्स करताना नक्की कोणत्या गोष्टीत मजा येते अथवा तुमच्या सेक्सबाबत काय फँटसी (Sex Fantasy) आहेत हे तुम्हाला आपल्या जोडीदाराला सांगता यायला हवं. यामुळे तुमचे सेक्स लाईफ अधिक चांगले होते आणि तुमचे नातेही अधिक घट्ट होते. तुम्ही एकमेकांना चांगले ओळखत असाल तर तुम्ही नक्कीच या गोष्टीचा फायदा उचलायला हवा. फँटसी चॅट तुम्ही आपल्या नात्याच्या कोणत्याही क्षणी नक्कीच आपल्या जोडीदारासह करू शकता. पण लग्न झाल्यानंतर इतर जबाबदाऱ्यांबरोबर सेक्समधील आतुरता कमी होत जाते. त्यामुळे तुम्ही या फँटसी तुमच्या जोडीदारासह नक्कीच शेअर करायला हव्यात. यासाठी काही टिप्स. 

पहिले कम्फर्ट लेव्हल बघा 

तुम्ही तुमच्या जोडीदारासह तुमच्या मनातील गोष्टी सांगताना एका व्यवस्थित लेव्हलला कम्फर्ट असणं खूपच गरजेचे आहे. तुम्हाला जर लाज वाटत असेल तर ते योग्य नाही. तुमचा जोडीदार सेक्सच्या बाबतीत बोलण्यासाठी किती आरामदायी आहे अथवा त्याला जमत नाहीये याबाबत तुम्हाला आधी जाणून घेणे आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्ही त्यांना आपल्या फँटसीबाबत सांगू शकता. तुम्ही दोघं एकमेकांसह उत्तम बोलू शकत असाल तर तुमचा वा तुमची जोडीदार याबाबत अधिक चांगले समजून घेऊ शकते. 

सीन तयार करा 

सायकोसेक्शुअल थेरपिस्ट कपल्स कौन्सिलर (Psychosexual Therapist Couples Counselor) यांच्यानुसार जोडप्यादरम्यान एक व्यवस्थित बंध निर्माण व्हायला हवा. तसंच आपल्या मनात काय आहे हे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचविण्यासाठी त्याच्यासाठी वा तिच्यासाठी एक विशिष्ट वातावरणनिर्मिती आपल्याला करता यायला हवी. त्यामुळे आपल्या जोडीदाराला आपल्या मनातील भावना कळण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही कोणतीही फँटसी बोलण्यापूर्वी त्यामागील वातावरण निर्मिती तयार करण्याची गरज आहे. 

स्पाईस द टॉक अप (Spice The Talk Up)

सौजन्य – Freepik

तुम्ही अथवा तुमचा जोडीदार जर दोघांपैकी कोणीही अशा गोष्टी बोलण्यासाठी लाजत असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी एक आरामदायी असं वातावरण तयार करा. एखाद्या कोपऱ्यात कँडल लाईट डिनर करून त्यावेळी बोलणं अथवा सुगंधी मेणबत्ती लावणं, चॉकलेट स्ट्रॉबेरी मिश्रण तयार करणं अशा पद्धतीने वातावरण निर्माण करणे आपल्या मनातील फँटसी आपल्या जोडीदाराला सांगण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. दोघेही एकमेकांना समजून घेऊ शकतात. 

मोबाईल बंद करणे 

तुम्ही आणि तुमचा वा तुमची जोडीदार इंटिमेट होण्याआधी अथवा अशा सेक्शुअल फँटसीबाबत बोलण्याआधी आपला मोबाईल बंद करा. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कॉल येऊ नयेत आणि तुमच्या प्रेमात वा सेक्समध्ये कोणताही व्यत्यय न येण्यासाठी हे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही जेव्हा कोणत्याही कामात नसाल आणि आता मस्त वेळ घालवता येईल अशी वेळ असेल तेव्हा मोबाईल बंद करून अशा गोष्टी तुम्ही जोडीदारासह शेअर करा. 

प्रश्न विचारा

आपल्या जोडीदारावर लक्ष केंद्रीत करून फँटसी चॅट सुरू करावे. आपल्याबाबत अथवा आपल्या शरीराबाबत आपल्या जोडीदाराला काय वाटते? तसंच त्याला आपल्यामधील काय गोष्ट आवडते? कशा पद्धतीने सेक्स करायला हवं? अजून कशी मजा घेता येईल अशा पद्धतीचे प्रश्न आपल्या जोडीदाराला सेक्सच्या आधी खूप प्रेमाने विचारावेत जेणेकरून त्यांना तुमच्यासह अधिकाधिक सेक्स करण्यास मजा येईल आणि तुम्हालाही समाधान मिळेल. यादरम्यान तुम्हाला काय वाटतं तेदेखील तुम्ही त्यांना मनापासून सांगून टाकावे. 

गेम प्ले करावे 

सौजन्य – Freepik

तुम्ही तुमच्या जोडीदाराला वेगवेगळ्या पद्धतीने खेळ करत सेक्स करण्याचा सल्लाही देऊ शकता. तुमची फँटसी सांगण्यासाठी आणि ओळखण्यासाठी असा एखादा खेळ खेळावे. जेणेकरून उत्सुकता अधिक ताणली जाते आणि सेक्स करताना मजा येते. तुम्ही वेगवेगळ्या चिठ्ठ्या करून त्याप्रमाणे तुमच्या फँटसी एकमेकांना सांगू शकता. यामुळे तुम्हाला सेक्स चढल्यानंतर त्या सेक्सची मजा घेता येते. 

एकमेकांसह अनेक वर्ष राहायचे असेल तर अशा पद्धतीने फँटसी सांगून तुम्हाला तुमचे सेक्शुअल नाते जास्त काळ नक्कीच टिकवता येते. तुम्हीही या सोप्या टिप्स नक्की वापरून पाहा. 

Leave a Comment