Tulsi Vivah 2022: तुळशी विवाहाच्या दिवशी करा हे उपाय, वैवाहिक जीवन राहील प्रेमाने भरलेले

प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशीला तुळशी विवाह साजरा करण्यात येतो. या वर्षी 5 नोव्हेंबर रोजी तुळशीचे लग्न होणार आहे. पण यावर्षी तुळशी विवाह खास असणार आहे, कारण आदल्या दिवशी कार्तिक महिन्याची देवशयनी एकादशीही साजरी होणार आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार, तुळशी विवाहानंतर लग्नाच्या मुहूर्तांना (Marriage Muhurat) सुरूवात होते. तर यादिवशी विष्णू आणि लक्ष्मीचा आशिर्वाद घेऊन पुढील शुभकार्यांना सुरूवात करण्यात येते. मात्र यावर्षी शुक्र ग्रहाचा अस्त असल्यामुळे तुळशी विवाहाच्या (Tulsi Vivah) दिवशी लग्नाचा कोणताही मुहूर्त नाही. पण यावर्षी कोणताही मुहूर्त नसला तरीही वैवाहिक जीवन सुखी राहावे यासाठी यादिवशी करण्यात येणारे उपाय नक्कीच लाभदायी ठरतात (Astro Tips Of Married Life). हे उपाय तुम्ही केल्यास, तुमचे वैवाहिक जीवन नक्कीच प्रेमाने भरलेले राहील.  असे म्हटले जाते की, तुळशी दिनाच्या शुभ मुहूर्तावर पती पत्नीने एकत्रित नदीमध्ये एकत्र स्नान करावे. स्नान केल्यावर तुळशीची पाने तोडून शुद्ध पाण्यात मिसळावी आणि त्यानंतर हे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडावे. यामुळे पती पत्नीमधील प्रेम अबाधित राहाते. 

करा असे उपाय राहाल सुखी 

Instagram
  • पती आणि पत्नीदरम्यान कोणत्याही गोष्टींमुळे सतत भांडणं होत असतील आणि गोष्टी अगदी शेवटच्या टोकापर्यंत जात असतील तर तुम्ही तुळशीच्या रोपट्याला लाल ओढणी पांघरावी आणि दुसऱ्या दिवशी एखाद्या सौभाग्यवतीला दान करावी. असे केल्याने भांडणं संपतात आणि नात्यात अधिक गोडवा निर्माण होण्यास मदत मिळेल
  • तुळशीला नियमित पाणी घालावे आणि संध्याकाळच्या वेळी तुळशीच्या समोर दिवा लावावा
  • तुळस ही घरात सुखशांती समाधान आणते असं म्हणतात. घरावर संकट येणार असेल तर सर्वात पहिले तुळस सुकायला लागते. तुम्ही कितीही काळजी घेतली तरीही तुळस सुकते. त्यामुळे तुम्ही तुळशीला सुखी ठेवले तर तुम्ही स्वतः समाधानी आणि सुखी राहू शकता
  • तुळशी विवाह संपन्न होत असताना पती – पत्नीने एकत्रित सहभागी व्हावे. त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि एकमेकांविषयी प्रेम वाढते
  • शक्य असल्यास, तुळशीचा विवाह हा एकत्रित घरातच करावा. असे केल्यामुळे वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत मिळते असे ज्योतिषशास्त्रात सांगण्यात येते 

विशेष टीप – सदर माहिती ही ज्योतिषशास्त्रानुसार देण्यात आली आहे. कोणत्याही अंधश्रद्धा पसरविण्याचा आमचा हेतू नाही. पूर्वपरंपरेनुसार तुळशी विवाहाला आपल्याकडे पवित्र मानण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या समजानुसार, याबाबत समजूती बाळगाव्यात. 

Leave a Comment