मानसोपच्चार तज्ज्ञांचा सल्ला योग्यवेळी घेणे कधीही चांगले

 आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतेच असे नाही. आयुष्यात कधी कधी असे कठीण प्रसंग घडतात की, त्या कठीण प्रसंगातून आपण बाहेर आलो असे कितीही वाटले तरी मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी ती सल कायम असते. काही दु:खातून योग्य वेळीच बाहेर पडणे गरजेचे असते. असे झाले नाही की,त्या गोष्टी तुम्हाला इतर चुकीचे विचार मनात आणण्यासाठी कारणीभूत ठरतात.  एखादी वाईट गोष्ट दुसऱ्या गोष्टीशी जोडली जाते ज्यामुळे डिप्रेशन (Depression) मध्ये एखादी व्यक्ती कधी जाते हे कळत नाही. अशावेळी मानसोपच्चार तज्ज्ञांची मदत ही नेहमीच फायद्याची ठरते.

का असते मानसोपच्चार तज्ज्ञांची गरज

प्रत्येक व्यक्ती या वेगळ्या असतात. सगळ्याच आपल्या आयुष्यात झालेली वाईट गोष्ट विसरुन जात नाही. काहींना कितीही रडू आले तरी ते आपले रडू आतच दाबून ठेवतात. एखाद्या गोष्टीला योग्यवेळी योग्य भावनेने मार्ग करुन दिला नाही तर ती गोष्ट मनात अशी घर करुन राहते की, ती बाहेर पडता पडत नाही. अशावेळी ही गोष्ट ओळखीच्या आणि कितीही प्रिय व्यक्तीलाही सांगता येत नाही. दुसऱ्यांना त्रास देणे यामध्ये नसते. अशावेळी मानसोपच्चार तज्ज्ञ ही अशी व्यक्ती आहे जी तुम्हाला तुमचे मागचे पुढचे काहीही जाणून न घेता तुमच्या मनातून ती समस्या काढून टाकायचे काम करते.

विषय मांडा आणि मोकळे व्हा

मानसिक आरोग्य

तुम्हाला खुपणारी गोष्ट ही अगदी साधीही असू शकते. पण ती गोष्ट तुम्ही एकदा बोलून दाखवली तर त्यातून बाहेर येणे खूप सोपे जाते. विषय मांडताना कधीतरी खूप राग येईल. शिव्या द्याव्याशा वाटतील. कधीतरी मनमोकळेपणाने रडावेसे वाटेल. त्या त्यावेळी त्या भावनांना मोकळे होऊ द्या. तो विषय मनात राहिल्यामुळे जर तुमच्या इतर कामांवर परिणाम होऊ लागला असेल तर अशावेळी ही मदत योग्यवेळी घेणेच चांगले असते.

योग्य मानसोपच्चार तज्ज्ञांची निवड

 जर तुमच्या आयुष्यात असा काही प्रसंग घडला असेल आणि ती गोष्ट तुम्हाला सतावत असेल तर तुम्ही रडत किंवा त्याचा विचार करुन आपला वेळ घालवू नका. तुमच्या आसपासला असलेल्या चांगल्या मानसोपच्चार तज्ज्ञांचा शोध घ्या. योग्य डॉक्टर मिळाल्यानंतर वेळ आणि विचार करण्यापेक्षा त्वरीत भेट द्या. त्यामुळे तुम्हाला योग्यवेळी बरे होण्यास मदत मिळेल. 

आता एखादे दु:ख सतावत असेल तर त्यात राहून आपल्यातच ते दु:ख करत राहण्यापेक्षा योग्यवेळी योग्य सल्ला घ्या. 

Leave a Comment