Bigg Boss च्या घरातून ‘जेंटलमन’ ची एक्झिट, अक्षय झाला भावूक

बीग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) इतिहासात प्रथमच सर्वसामान्य माणसातील एका चेहऱ्याला एंट्री देण्यात आली होती. तो चेहरा म्हणजे त्रिशुल मराठे. कुठलही सेलिब्रिटी वलय नसलेला त्रिशुल घरात आला ते सामान्य माणसाचं प्रतिनिधीत्व करायला. तो आला, घरात वावरला, इतरांमध्ये लिलया मिसळला आणि अल्पावधीतच सर्वांचा लाडका झाला. मात्र घरातल्या सगळ्याच स्पर्धकांची मनं जिंकणाऱ्या त्रिशूलला प्रेक्षकांचा म्हणावा तसा पाठिंबा मिळाला नाही आणि परिणमत: कमी व्होट्स मिळाल्यामुळे काल त्याला बिग बॉसच्या घरातून एक्झिट घ्यावी लागली.

त्रिशुल बन गया ‘जेंटलमन’

एअरटेल स्पर्धेचा विजेता ठरलेल्या त्रिशूल मराठेला, बीग बॉसच्या घरात थेट एंट्री मिळाली. सेलिब्रिटी फेस नसलेला त्रिशूल घरात आला तो सर्व सामान्य माणसांचा प्रतिनिधी म्हणून. मॉडेलिंग क्षेत्रात आपलं करिअर आजमावणाऱ्या त्रिशुलसाठी बीग बॉसच्या घरात येणं, सेलिब्रिटीजसोबत राहणं, त्यांच्यासोबत खेळणं हे सगळंच एका स्वप्नासारखं होतं. मात्र इंडस्ट्री बाहेरचा असूनही त्याने अल्पावधीतच सर्वांना आपलसं करुन घेतलं आणि तो सगळ्या स्पर्धकांचा लाडका बनला. शांत-संयमी, कुणालाही न दुखावणारा, कुणाचाही अपमान न करणारा आणि ‘एखाद्यामध्ये १ वाईट गुण असेल तर त्याच्यातले ९९ चांगले गुण शोधा…’ असं म्हणणारा त्रिशुल घरातला ‘जेंटलमन’ बनला. 

अगदी कालही तो घराबाहेर जाण्याआधी झालेल्या ‘विष-अमृत’ टास्कमध्ये सर्व स्पर्धकांनी अमृत देत त्रिशुलवरचं आपलं प्रेम जाहीरपणे व्यक्त केलं. मात्र घरातल्या लोकांचा लाडका बनलेला त्रिशुल, प्रेक्षकांची मनं जिंकायला मात्र कुठेतरी कमी पडला हे खरं.

https://dazzlemarathi.com/jitendra-joshi-praises-to-vikas-sawant-in-bigg-boss-marathi-season4-in-marathi/

कुठे कमी पडला त्रिशुल?

त्रिशुलचा शांत स्वभाव, कमी आणि मोजकं बोलणं, स्वत:चं मत परखडपणे न मानणं… हेच बहुधा त्याच्या घराबाहेर जाण्याला कारणीभूत ठरलं. ‘योगेश सोबत झालेलं एकमेव भांडण वगळता, त्रिशूल बाकी कधीच कुठे दिसला नाही.. त्याचं घरातील कामांममध्ये, खेळामध्ये कॉन्ट्रिब्युशन खूपच कमी होतं, त्याने आपलं मत कधीही ठामपणे मांडलं नाही आणि तो अपूर्वाच्या इन्फ्युअन्सखाली कुठेतरी हरवून गेला’….. अशाप्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. बाहेरून खेळ बघणाऱ्या प्रेक्षकांना एक माणूस म्हणून त्रिशुलचा स्वभाव कदाचित आवडतही असेल, मात्र एक स्पर्धक म्हणून तो त्यांच्या अपेक्षांना खरा उतरला नाही एवढं मात्र नक्की. प्रेक्षकांची सर्वात कमी व्होट्स मिळाल्यामुळे त्याला बीग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागलं.

‘मी त्याला नॉमिनेशनमध्ये टाकले’

दरम्यान त्रिशूलच्या जाण्याने घरातील सर्वच स्पर्धक भावूक झालेले दिसले. इतकंच नाही तर होस्ट महेश मांजरेकरही (Mahesh Manjrekar) त्रिशूलला निरोप देताना रडले. प्रसाद जवादे ने ‘तोहफा कबूल करो..’ असं म्हणत त्रिशूलला पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप दिला. मात्र यावेळी इमोशनली सर्वात जास्त विक वाटला तो अक्षय केळकर (Akshay Kelkar). त्रिशुलच्या जाण्याला कुठेतरी आपणही कारणीभूत आहोत, असं मत अक्षयने यावेळी व्यक्त केलं. ‘’मी गेल्या २-३ आठवड्यांत त्रिशुलला सारखं सारखं नॉमिनेशनमध्ये टाकलं, माझ्यामुळेच तो गेला…‘’ असं म्हणत अक्षयने आपल्या मनातील गिल्ट महेश मांजरेकरांसमोर व्यक्त केलं. मात्र.. ‘हा गेमचाच एक भाग आहे. आज त्रिशुल आहे त्याजागी उद्या कुणी दुसरं असेल..एकवेळ अशी येईल जेव्हा तुला तुझ्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला देखील नॉमिनेट करावं लागेल कारण शेवटी कुणीतरी एकचजण हा शो जिंकणार आहे आणि त्यामुळे त्याच्या जाण्याचं गिल्ट तू घेऊ नकोस…’ अशा शब्दांत माजरेकरांनी अक्षयला समजावले.

Leave a Comment