‘सनी’चे शो परस्पर केले जात आहेत रद्द,मराठी चित्रपट चालणार कसे

 मराठी चित्रपटांना सध्या चांगले दिवस आले आहेत. अनेक मराठी आणि अमराठी लोकं जाऊन थिएटरमध्ये जाऊन चित्रपटाचा आनंद घेणे पसंत करतात. असे असताना नुकताच आलेल्या ‘सनी’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत असूनही थिएटर चालकांनी चित्रपट परस्पर रद्द केल्याची तक्रार प्रेक्षकांनी थेट चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे (Hemant Dhome) याच्याकडे केली आहे. हेमंत ढोमे याने प्रेक्षकांचे आलेले मेसेज स्क्रिनशॉट काढून शेअर करत मराठी चित्रपटांवर होणारा अन्याय सगळ्या प्रेक्षकांना दाखवून दिला आहे. जर असे सुरु राहिले तर मराठी चित्रपट चालणार कसे? असा सवाल हेमंतने केला आहे.

प्रेक्षक असून असे का?

खूप दिवसापासून मराठी चित्रपट आले नाहीत. आता ‘सनी’च्या निमित्ताने मराठी चित्रपट आला आहे. झिम्माच्या यशानंतर हेमंत ढोमे आणखी एक नवी कल्पना घेऊन आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकांनी या चित्रपटाचे प्री बुकिंग केले. अनेक ठिकाणी सनीचे शो फुल्ल आहेत. अनेकांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर आपली चांगली प्रतिक्रियाही दिल्या आहेत. थिएटरमध्ये चित्रपट हाऊसफुल्ल असतानाही कल्याण येथे चित्रपटाचे शो रद्द करण्याचा प्रकार घडला आहे. ज्यांनी चित्रपटाचे बुकिंग केले त्यांना कोणतीही कल्पना किंवा कारण न देता त्यांनी थेट चित्रपटाचे शो रद्द करुन प्रेक्षकांचे पैसे परत केले आहेत. प्रेक्षकांना चित्रपट पाहायचा असूनही असे का करण्यात आले या संदर्भातील कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. या संदर्भात हेमंत ढोमे याला लोकांनी टॅग करुन ही माहिती दिली. हा सगळा प्रकार कळताच हेमंत ढोमे याने ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. 

काय म्हणाला हेमंत ढोमे?

प्रेक्षकांनी केली तक्रार

हेमंत ढोमेने ट्विट करत लिहिले की , ‘’ थिएटरला प्रेक्षक येत नाहीत म्हणून शो रद्द करणे, कितपत योग्य आहे? एक प्रेक्षक जरी आला तरी शो दाखवला गेला पाहिजे. बुकिंग घेऊन नंतर प्रेक्षकांना शो रद्द झाल्याचे सांगून त्यांना पैसे देणे, हे चुकीचेच आहे. मग आपण प्रेक्षकांना तरी दोष कसा द्यायचा? काही प्रेक्षकांनी हे आमच्या निदर्शनास आणून दिल्याने हा प्रकार आम्हाला कळला. हे असेच सुरू राहिले तर चित्रपट चालणार कसे?’’

सनीचे कथानक

परदेशात जाऊन करिअर करण्याची आणि सेटल होण्याची इच्छा खूप जणांना असते. परदेशातील लाईफस्टाईलचे आपल्यापैकी अनेकांना आकर्षण आहे. बाहेर जाण्यासाठी आई-वडील जे कष्ट घेतात. त्या कष्टाचे चीज करणे मुलांच्या हातात असते. पण त्यांना त्याची जाणीव होण्यासाठी ज्यावेळी कमवण्याची वेळ येते ती देखील परदेशात तेव्हा कितीही श्रीमंत असला तरी त्याला त्या दिवशी पैशाची खरी किंमत कळते. सनी हा असाच चांगल्या घरातील मुलगा. परदेशात शिकायला जातो. पण त्याचे वडील त्याला जबाबदारी कळावी यासाठी काही गोष्टीतून हात काढून घेतात. मग काय त्या पुढे सुरु होतो सनीचा खरा प्रवास! 

परदेशात जाऊन शिक्षण घेऊन ते लाईफस्टाईल अनुभवू इच्छिणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी आणि त्याच्या पालकांसाठी असा हा चित्रपट आहे जो थिएटरमध्येच अनुभवायला हवा. 

Leave a Comment