अंगावर काटा आणणाऱ्या ‘श्रद्धा मर्डर’ केसवर बनणार चित्रपट

 एखादी सीरिज बघून आपल्याच जवळच्या माणसाचे निर्दयीपणे तुकडे करणारी केस नुकतीच समोर आली आहे. लिव्ह- इन- रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या जोडप्यात अचानक वाद होतो आणि पार्टनर प्रेयसीचा खून करतो. इतक्यावरच न थांबता प्रेयसीचे 35 तुकडे करतो हे ऐकूनच अंगावर काटा येईल पण ही घटना नुकतीच उघडकीस आली आहे. वसईत राहणारी श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) आणि तिचा सोशल मीडियावर झालेला प्रियकर आफताब आमीन पुनावाला (Aftab Poonawala) यांच्यात प्रेमाचे संबंध होते खरे पण अचानक एक दिवस आफताबने रागात येऊन श्रद्धाचा निर्दयी खून केला. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल असे कथानक आफताब याने घडवून आणले. यात श्रद्धाचा हकनाक बळी गेला. पण या घडनेतून शिकवण घेण्यासारखी आहे. त्यामुळेच या मोठ्या हत्याकांडावर आता चित्रपट होणार आहे. नुकतीच या सत्य घटनेवर आधारीत चित्रपटाची घोषणा करण्याच आली आहे.

कोण बनवणार चित्रपट

सध्या सोशल मीडियावर मिळत असलेल्या माहितीनुसार चित्रपट निर्माता- दिग्दर्शक  मनीष एक सिंह हा चित्रपट करणार आहे. Who killed shraddha walkar नावाने हा चित्रपट येणार असून याच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजत आहे. परंतु अशाप्रकारे चित्रपट बनवण्यासाठी लागणारी योग्य ती कागदपत्रे अद्याप पूर्ण करायची आहेत असे देखील समजत आहे. शिवाय चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘लव्ह जिहाद’वर आधारित असा हा चित्रपट असणार आहे. यामध्ये श्रद्धाच्या मुख्य केसची प्रेरणा घेतलेली असली तरी आतापर्यंत असे अनेक किस्से घडले आहेत. ज्यामध्ये कुटुंबाची चूक नसताना मुलींचा हकनाक बळी गेलेला आहे.  श्रद्धाच्या केसमध्ये मुख्य गुन्हेगार कोण आहे हे जरी माहीत असले तरी देखील पोलिसांना याचा अधिक तपास करायचा आहे. त्यामुळेच या चित्रपटात नेमकं काय दाखवलं जाईल हे सांगणे आताच कठीण आहे. पण इतके नक्की ही हा चित्रपट नक्कीच येणार आहे.

काय आहे श्रद्धा वालकर प्रकरण?

वसईत राहणारी श्रद्धा आपल्या लिव्ह- इन पार्टनरसोबत वसईहून दिल्लीला राहायला गेली होती. पण ती दिल्लीत राहायला जात नाही तोच 15 दिवसात ती गायब होते. तिचा कोणालाही थांगपत्ता लागत नाही. श्रद्धा कुठे गेली? याची चौकशी ज्यावेळी तिचा प्रियकर आफताबकडे करण्यात आली त्यावेळी त्याने ती भांडण करुन निघून गेली असे सांगितले. 26 ऑक्टोबर रोजी पहिल्यांदा पोलिसांनी त्याच्याकडे श्रद्धासंदर्भात तोंडी चौकशी केली होती. त्यानंतर तो आपल्या वसईच्या घरी आला. तो तिथे काही काळ राहिला. त्यादरम्यान त्याची पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली पण यावेळी ती लिखित स्वरुपात करण्यात आली. आफताबची चौकशी होताना पाहून कुटुंबाला आधीच काहीतरी अघटीत घडल्याची शंका आली होती. म्हणूनच त्यांनी राहत्या घरातून दुसरीकडे जाणे पसंत केेले. आफताब यामध्ये असल्याची शंका ज्यावेळी पोलिसांना त्यावेळी त्यांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने 18 मे रोजी श्रद्धाचा खून केल्याची कबुली दिली. इतकेच नाही तर तिच्या शरीराचे 35 तुकडे करुन वेगवेगळ्या ठिकाणी टाकले. तिच्या शरीराचे काही भाग मिळाले आहेत. काहींचा शोध अद्याप सुरु आहे. विशेष म्हणजे आफताबने तिला मारल्यानंतर तिचे तुकडे करण्यासाठी जे धारदार शस्त्र वापरले ते देखील पोलिसांच्या हाती लागले आहे. शिवाय तुकडे करण्यावेळी त्याने पाण्याचा जो वापर केला त्यावरुनही आलेल्या बिलाचा आकडा हा डोळे विस्फारायला लावणारा होता. त्यामुळे त्याची अधिक चौकशी केल्यानंतर त्याने शरीराचे तुकडे करण्यासाठी आणि रक्ताचे डाग राहू नये यासाठी पाण्याचा वापर केल्याचे सांगितले. शिवाय त्याने अनेक धक्कादायक असे खुलासे देखील केले. 

आता या सगळ्या घटनेवर लवकरच चित्रपट येणार असल्यामुळे तो कशापद्धतीने दाखवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

Leave a Comment