कमी दिवसात फिरता येतील अशी भारतातील काही बेस्ट ठिकाणं

 कोरोनाच्या लॉकडाऊननंतर आता बरंच काही बदललं आहे. दोन वर्षात खूप जणांचे फिरण्याचे प्लॅन असतील पण ते असेच वाया गेले. पण आता लॉकडाऊन आणि कोरोनाचे सावट थोडेसे दूर झालेले असताना खूप जण बाहेर जाण्याचे प्लॅन बनवत आहेत. पण हल्लीच्या प्लॅनमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती अशी की आता खूप जणांना जास्तीच्या सुट्ट्या मिळत नाही. आपल्यासोबतही असे प्लॅनिंग करताना ही गोष्ट नक्कीच होत असेल. बाहेर फिरायला तर जायचे आहे. पण दिवस कमी आहेत.(short tour places in india ) सुट्ट्या जास्तीच्या मिळणार नाहीत. अशावेळी कमीत कमी दिवसात भारतात फिरता येतील अशी काही ठिकाणं आम्ही शोधून काढली आहेत. ज्यामध्ये तुम्हाला फिरता येईल, ती जागा एक्सप्लोअर करता येईल आणि जास्त सुट्ट्याची गरजही भासणार नाही. या शिवाय प्रवासाच्या टिप्स शेअर करत आहोत त्या वाचायलाही विसरु नका

हंपी, कर्नाटका

हंपी, कर्नाटका

कर्नाटकातील हंपी हे प्रेक्षकांच्या आवडीचे ठिकाण आहे. तुम्ही आतापर्यंत हंपी शहराला भेट दिली नसेल तर नक्कीच द्यायला हवी. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळी शिल्प पाहायला मिळतील. जी खरंच खूप सुंदर आहेत आणि त्याहून अधिक युनेस्कोच्या हेरिटेज यादीत त्याचा समावेश ही आहे. मित्रपरिवार आणि कुटुंबासोबत जाण्यासाठी हे बेस्ट ठिकाण आहे. शिवाय हंपी हे अगदी लहानसे शहर असल्यामुळे तुम्हाला 3-4 दिवसात ही टूर करता येते. 

हंपीला जाण्यासाठी ट्रेन हा पर्याय नक्कीच उपलब्ध आहे. पण तुम्ही वेळ वाचवण्यासाठी फ्लाईटने जाऊ शकता. त्यासाठी तुम्हाला बेळगाव (Belgum) चे तिकीट काढावे लागेल. पुढे हंपीला जाण्यासाठी बसचा पर्याय उपलब्ध आहे. 

हंपीमध्ये पाहण्यासारखी ठिकाणं विचाराल तर तुम्हाला  विरुपक्षा मंदिर, विजय विठ्ठल मंदिर, लोटस महल, हनुमान मंदिर अशी काही प्रसिद्ध ठिकाणं दिसतील. (short tour places in india )जी तुम्ही तीन दिवसात फिरू शकता. यामधील कोराकल राईड हे प्रेक्षकांचे प्रमुख आकर्षण आहे. कारण यामध्ये गोल बोटीत बसवून तुम्हाल सफर घडवली जाते. असे अनेक फोटो तुम्ही पाहिले असतील.

गोवा, महाराष्ट्र

गोवा, महाराष्ट्र

ज्यांना समुद्राची आवड आहे अशांसाठी गोवा हे कायमच प्रमुख आकर्षण राहिलेले ठिकाण आहे. बाराही महिने गोव्यात पर्यटकांची गर्दी असते. देशातील कोणत्याही कोपऱ्यात राहा तुम्हाला गोव्याला जाण्यासाठी फ्लाईट या नक्कीच मिळतील. 

गोव्याला जाण्यासाठी बसेस किंवा ट्रेन आहेत. आता तुम्हाला कोणत्या बीचवर राहायचे आहे त्यानुसार तुमचे हॉटेल बुकिंग करा. म्हणजे अंजुना बीच, बाघा बीच, ओल्ड गोवा, न्यू गोवा यानुसार तुम्ही राहण्याची सोय करा. पण तुम्ही गोव्यात कुठेही राहिलात तरी देखील तुम्हाला 3-4 दिवस हे पुरेसे असतात.(short tour places in india ) कारण गोव्याचे लाईफ तसे सुशेगात आहे. या ठिकाणी बीच, बीचवरील जेवण हेच एक आकर्षण आहे. या ठिकाणी पाहण्यासारखी ठिकाणे असली तरी देखील लोकांना येथील निसर्ग अधिक आकर्षित करतो. भारतातील पर्यंटन स्थळे

जम्मू-काश्मीर, काश्मीर

काश्मिरमधील जन्नत व्हॅली

भारताचे नंदनवन म्हणून ज्या ठिकाणाची ओळख आहे. ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके काश्मिर. काश्मिरला जाण्याचे खूप जणांचे स्वप्न असते. जर तुम्हाला अगदी पटकन काश्मिरला जाऊन यायचे असेल तर अगदी 5 दिवसांची टूर ही तुम्हाला करता येते. हा परिसर वर्षभऱ सुंदरच असतो.(short tour places in india ) पण डिसेंबर नंतर गेलात तर तुम्हाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी अनुभवायला मिळते. त्यानुसार तुमचे प्लॅनिंग असायला हवे. 

काश्मिरला जाण्यासाठी तुम्हाला श्रीनगरचे फ्लाईट बूक करावे लागेल. काश्मिरमध्ये गुलमर्ग, पहेलगाम, श्रीनगर अशी काही ठिकाणे फिरण्यासारखी आहेत. येथे गेल्यानंतर हाऊसबोटचा आनंद घ्यायला विसरु नका. 

आता तुम्हाला कमी दिवसात बेस्ट असे काहीतरी पाहायचे असेल तर या ठिकाणांचा नक्की विचार करा.

Leave a Comment