Tunisha Sharma Case : आईने उलगडल्या अनेक गोष्टी, अफवांवर व्यक्त केली नाराजी

Tunisha Sharma Case मध्ये अजूनही तुनिषाचा बॉयफ्रेंड शिजान खान याची चौकशी केली जात आहे. 24 डिसेंबर रोजी गळफास लावून अभिनेत्री तुनिषाने आपला जीव घेतला. अवघ्या 20 वर्षांच्या तुनिषाने रिलेशनशीपमधील ब्रेकअपमुळे हे सगळे केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. पण त्यानंतर शिजान खान (sheezan khan) संदर्भात ही अनेक खुलासे समोर आले. या सगळ्याची चौकशी सुरु असताना काही अफवांनी देखील चांगलाच जोर धरला आहे. तुनिषा संदर्भातील काही अफवा या खोट्या असल्याचे तिच्या आईने सांगितले आहे. शिवाय तिच्या आईने अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत की, त्यामुळे दोषीला शिक्षा लवकरात लवकर मिळायला हवी अशी एक प्रतिक्रिया सर्वस्तरातून उमटत आहे.

कोट्यवधीची संपत्ती मागे सोडून गेली का तुनिषा?

तुनिषा आपल्या आईसाठी कोट्यवधी रुपयांची संपत्ती सोडून गेल्याचे अनेक ठिकाणी छापून आले होते. तुनिषा ही यशस्वी अभिनेत्री होती. अगदी लहान वयापासून ती लीड रोलमध्ये काम करत आहे. त्यामुळे तिच्याकडे अमाप संपत्ती असल्याचे अनेकांना वाटत होते. पण तुनिषाची आई विनिताने हे ज्यावेळी वाचले  त्यावेळी तिने लगेचच या गोष्टीचा खुलासा केला आहे. तुनिषाकडे कोणतीही कोट्यवधी रुपयांची संपत्ती नाही. आम्ही ज्या घरात राहतो ते घर भाड्याचे आहे. तुनिषाची स्वप्न नक्कीच मोठी होती. तिला सगळ्या गोष्टी या महागड्या आवडायच्या.पण तिने जे काही घेतले अगदी तिच्या लॅपटॉपपासून सगळ्या गोष्टी या आम्ही EMI वर घेतलेल्या आहेत. त्यामुळे तिच्याकडे अशी कोणतीही संपत्ती नाही. 

वनितांना मोठा धक्का

तुनिषाची आई वनिता ही तुनिषा लहान असल्यापासून तिला सेटवर घेऊन जात होती. तुनिषा 18 वर्षांची झाल्यानंतर तिने तुनिषाला एकटे सेटवर पाठवायला सुरुवात केली. तुनिषाचे शिजान खान सोबत असलेले संबंध तिला माहीत होते. तिने यावर कधीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही. पण ब्रेकअपनंतर तिने शिजानला देखील समजावल्याचे कळत आहे. तुनिषा ही 4 जानेवारी रोजी 21 वर्षांची होणार होती. तिच्यासाठी खास सरप्राईज पार्टीचे आयोजनही तिची आई करत होती. पण त्या आधीच तिने आपले जीवन संपवले. ज्यामुळे तिच्या आईला मोठा धक्का बसला. वनिता यांनी मुंबईत आता आपलं काहीही काम नाही. त्या पुन्हा चंदिगढला जाऊन राहतील असे देखील सांगितले आहे.

शिजानच्या आईशी संबंध चांगल

तुनिषा आत्यमहत्येसंदर्भात रोज नवे काही खुलासे होत असताना एक गोष्ट आता समोर आली आहे ती अशी की, तुनिषाचे शिजानच्या आईशी खूप चांगले संबंध होते. तिच्यासोबत केलेले चॅट हे देखील आता समोर आलेले आहेत. शिजानच्या आईकडून हे नाते तोडले गेले असावे असा एक संशय बळावत असताना आता या गोष्टीवरुनही पडदा उठला आहेत. तुनिषाच्या काळजीमध्ये तिने हे चॅट केलेले दिसत आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी शिजानच्या मिस्ट्री गर्लफ्रेंडविषयी काही गोष्टी समोर आल्या होत्या. त्याचाही शोध सुरुच आहे 

 दरम्यान, तुनिषा शर्मा केसमध्ये तुम्हाला कोण दोषी वाटतं? 

Leave a Comment