प्रवासात नक्की कॅरी करा या महत्वाच्या गोष्टी

 थंडीचा महिना जवळ आला की, अनेकांचे बाहेर जाण्याचे प्लॅन्स बनतात. चांगली ठिकाणे शोधून देश आणि परदेश या पैकी एकावर सगळ्यांच्या सहमतीने शिक्कामोर्तब केले जाते. बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन तर तयार झाला. पण त्यासोबत महत्वाची असते ती म्हणजे पॅकिंग. जितके दिवस बाहेर जाऊ तितक्या दिवसांसाठी योग्य बॅग भरणे गरजेचे असते. अशावेळी तुमच्यासोबत प्रवासात नेमक्या कोणत्या गोष्टी असायला हव्यात ते माहीत असायला हवे. चला जाणून घेऊया प्रवासादरम्यान कोणत्या गोष्टी तुम्ही कॅरी करायला हव्या.

स्किनकेअर किट

कॅरी करा स्किनकेअर किट ( सौजन्य: Freepik)

तुम्ही अगदी कोणत्याही चांगल्या वातावरणात फिरायला जाणार असलातर तरी देखील त्वचेची काळजी ही सगळ्यात महत्वाची असते. त्यामुळे तुमच्याकडे स्किनकेअरचं एक पाऊच असायला हवे.स्किनकेअर पाऊचचा विचार करता गोंधळून न जाता तुम्ही फेसवॉश,टोनर, मॉश्चरायझर आणि सनस्क्रिन असायलाच हवे. कारण या बेसिक गोष्टी तुमची त्वचा चांगली ठेवण्यास मदत करतात. या शिवाय जर तुम्ही त्वचा ॲक्नेप्रोन असेल तर एखादे स्पॉट करेक्टर तुमच्यासोबत कॅरी करणे मस्ट आहे. या शिवाय तुम्ही थोडेसे मेकअपदेखील घेऊ शकता.

काही बेसिक औषधे

स्किनकेअरसोबतच तुमचे आरोग्यही तितकेच महत्वाचे आहे. प्रवासात अनेकदा तब्येत बिघडणे स्वाभाविक असते. अशावेळी तुमच्याकडे काबी बेसिक औषधे असायला हवीत. औषधांची ही यादी तुम्हाला डॉक्टर लिहून देतात. त्यामुळे तुम्ही कुठेही बाहेर म्हणजेच परदेशात जाणार असालत तरी देखील तुम्हाला या औषधांवर आक्षेप घेतला जात नाही. जर तुम्ही आधीच कोणत्या औषधांवर असाल तर तुम्ही ती देखील तुमच्यासोबत बाळगणे खूप महत्वाचे आहे. ही औषधे तुम्ही तुमच्या जवळील हँडबॅगमध्येच ठेवावीत जेणेकरुन ती सापडणे अधिक सोपे जाते. 

गॅजेट्ससाठी बॅग

चार्जर बॅग करा कॅरी (सौजन्य: Freepik)

प्रवास आपण करतो तो चांगल्या आठवणींसाठी. या प्रवासात तुम्हाला फोटोज आणि व्हिडिओज करायचे असतात. अशावेळी आपण उत्तम असे गॅजेट्स कॅरी करतो. यामध्ये मोबाईल फोन, चार्जर आणि कॅमेरा याचा समावेश असतो. गॅजेट्स हे महागडे असतात. त्यामुळे ते योग्य पद्धतीने ठेवणे आणि सापडणे गरजेचे असते. त्यामुळे जर तुम्हाला गॅजेट्स कॅरी करायचे असतील तर त्यासाठी योग्य असे पाऊच निवडा. त्या पाऊचमध्ये वायरची भेंडोळी होणार नाहीत याची काळजी घ्या. बाजारात असे पाऊच मिळतात की, त्यामध्ये वायर्स नीट ठेवण्यासाठी योग्य जागा केलेली असते. 

कपड्यांची योग्य निवड 

अनेकदा प्रवासात नको असलेल्या गोष्टी घेतल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे कपडे. कारण बाहेर जाणार म्हटल्यावर आपल्या डोक्यात आपण कुठे काय घालणार याकडे आपण अधिक लक्ष देतो आणि त्यामुळे होते असे की, आपण कपडे भारंभार भरतो. पण प्रवास हा कायम लाईट असावा. जितक्या कमी गोष्टी तुम्ही घेऊन जाल तितकाच तुमचा गोंधळ कमी होईल. 

आता प्रवास करताना काय कॅरी करायचे असा विचार करत असाल तर या गोष्टी नक्की विचारात घ्या.  

अधिक वाचा

होणाऱ्या नवरीने सुंदर दिसण्यासाठी फॉलो करावे असे ‘रुटीन'(Bride To Be Skin Routine)

ब्लाऊज झाला असेल ढगळ, तर वापरा सोप्या टिप्स

Leave a Comment