खोपोली करा अधिक Explore, सुट्टीचा घ्या आनंद

विकेंडला (Weekend) कुठे जायचं असा प्रश्न पडतो. खरं तर मुंबई आणि मुंबईच्या आसपास असे अनेक स्पॉट्स आहेत. पण प्रत्येकाला याबाबत माहीत नाही. खोपोली (Khopoli) हे असंच एक ठिकाणी तुम्ही नक्कीच एक्स्पोअर करू शकता. मुंबई आणि पुण्याच्या मिडपॉईंटला असणारे खोपोली हे फिरण्यासाठी अप्रतिम स्थळ आहे. महाराष्ट्राच्या रायगड (Raigad) जिल्ह्यातील स्थित असणाऱ्या खोपोलीमध्ये हजारो संख्येने पर्यटक येत असतात. निसर्गाच्या सान्निध्यात आणि मुंबईपासून साधारण दोन अडीच तासावरण असणाऱ्या खोपोलीमध्ये जाऊन येणे अधिक सोपे आहे. खोपोली हे अत्यंत सुंदर फिरण्याचे स्थळ असून धबधब्यांपासून नद्यांपर्यंत आणि मंदिरांपासून थीम पार्कपर्यंत अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल असंच हे ठिकाण आहे. खोपोलीमध्ये काय काय पाहता येईल हे घ्या जाणून आणि पुढच्या विकेंडसाठी करा तुमचे प्लॅनिंग (Plan For Picnic)

इमॅजिका (Imagica At Khopoli)

Instagram

आपल्या कुटुंबासह मस्त वेळ घालवयाचा असेल तर तुम्हाला खोपोलीतील इमॅजिका हा चांगला पर्याय आहे. 130 एकर परिसरामध्ये असणारे थीम पार्क, वॉटर पार्क, स्नो पार्क, बॉलीवूड पार्क, वंडर्स ऑफ द वर्ल्ड इल्युमिनेटेड पार्क या सर्व गोष्टी इथे आहेत. लहान मुलांनाच नाही तर अगदी मोठ्यांनाही याचा आनंद घेता येतो. या ठिकाणी अनेक सेलिब्रिटीही तुम्हाला येताना दिसतात. याशिवाय तुमचा संपूर्ण दिवस अगदी मजेत या ठिकाणी घालवता येतो आणि पुन्हा एकदा लहान होऊन धमाल मस्ती करता येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या कुटुंब आणि मित्रमैत्रिणींसह तुम्ही इथे आनंद लुटू शकता. 

कसे जाता येईल – सीएसएमटी स्टेशनवरून खोपोली ट्रेन, स्वतःची गाडी, खोपोली स्टेशनवरून रिक्षा

साधारण खर्च – माणशी – 2000/- च्या आसपास 

तुंगराली सरोवर (Tungarli)

Instagram

पश्चिम घाटाच्या कुशीत असणारे तुंगराली सरोवर आणि येथील नैसर्गिक वातावरण हे तुम्हाला अक्षरशः भारावून सोडते. स्वच्छ निळेशार पाणी आणि चारही बाजूने असणारी झाडी मनाला एक वेगळेच समाधान देते. नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक इथे गर्दी करतात. नेहमीच्या गोंगाटापासून दूर जाण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्की या ठिकाणी भेट द्यायला हवी. मुंबईपासून जास्त दूर नाही आणि त्याशिवाय नैसर्गिक हवामान असणारे असे हे ठिकाणी तुम्हाला नक्कीच दोन दिवसात अधिक ताजेतवाने करेल यात शंका नाही. 

कसे जाता येईल – सीएसएमटी स्टेशनवरून खोपोली ट्रेन, स्वतःची गाडी, खोपोली स्टेशनवरून रिक्षा 

साधारण खर्च – माणशी – 2000/- च्या आसपास 

श्री विरेश्वर महादेव मंदिर (Shree Vireshwar Mahadev Mandir)

Instagram

खोपोलीमधील हे एक प्राचीन मंदिर आहे. तसंच हे पर्यटनस्थळदेखील आहे. मराठा साम्राज्यातील प्रभावशाली नेता असणाऱ्या नाना फडणवीस (Nana Fadnavis) यांनी या मंदिराची निर्मिती केली होती. भगवान शंकराचे हे मंदिर 18 व्या शताब्दीमध्ये घडविण्यात आले होते. विशेषतः महाशिवरात्रीच्या वेळी या ठिकाणी भक्तांची रांग लागलेली दिसून येते. मात्र तुम्हाला फिरण्यासाठी कधीही इथे भेट देता येईल. मंदिराच्या समोर एक शांत तलाव आहे आणि त्यामुळे इथे आलेल्या पर्यटकांना अतिशय शांतता लाभते. तसंच येथील वातावरण आणि देखावाही मनाला प्रसन्नता देतो. 

कसे जाता येईल – सीएसएमटी स्टेशनवरून खोपोली ट्रेन, स्वतःची गाडी, खोपोली स्टेशनवरून रिक्षा 

साधारण खर्च – माणशी – 2000/- च्या आसपास 

श्री वरदविनायक मंदिर (Shree Varadvinayak Mandir)

खोपोलीमधील हे अतिशय प्रसिद्ध गणपती मंदिर आहे. वर्षभर येथे भक्तांचे येणेजाणे असते. महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिराप्रमाणेच हे वरद विनायक मंदिरही प्रसिद्ध आहे. पेशवा सेनापती रामजी महादेव बिवलकर यांनी 1725 मध्ये या मंदिराची निर्मिती केली. तर या मंदिरातील दिव्याबाबत सांगितले जाते की, 1892 पासून येथे प्रज्वलित केलेला दिवा आजही तसाच आहे. हा दिवा कधीही विझलेला नाही अशी आख्यायिका आहे. त्यामुळे खोपोलीमध्ये गेल्यावर तुम्ही या ठिकाणी नक्कीच भेट देऊ शकता. 

कसे जाता येईल – सीएसएमटी स्टेशनवरून खोपोली ट्रेन, स्वतःची गाडी, खोपोली स्टेशनवरून रिक्षा 

साधारण खर्च – माणशी – 1000/- च्या आसपास 

राजमाची किल्ला (Rajmachi Fort)

Instagram

मराठ्यांचा गौरव आणि वीरतेचे प्रतीक असणारा हा राजमाची किल्ला. अनेक अॅडव्हेंचर्स आणि ट्रेकर्स पावसाळ्यात इथे ट्रेक करण्यासाठी येतात. पण हा किल्ला सर करणे अत्यंत कठीण आहे. पण एकदा वर पोहचल्यावर याचे सौंदर्य तुमचा थकवा मिटवून टाकते. राजमाची किल्ल्याचा आजूबाजूचा परिसरही तितकाच नयनरम्य आहे. त्यामुळे केवळ पावसाळ्यातच नाही तर कोणत्याही हंगामात तुम्ही इथे तुमची पिकनिक काढू शकता आणि किल्ल्याबाबत तिथे फिरून अधिक जाणून घेऊ शकता. 

कसे जाता येईल – सीएसएमटी स्टेशनवरून खोपोली ट्रेन, स्वतःची गाडी, खोपोली स्टेशनवरून रिक्षा 

साधारण खर्च – माणशी – 1000/- च्या आसपास 

तुम्ही आतापर्यंत खोपोलीमध्ये काय काय पाहिले आहे? तुमचा अनुभवदेखील आमच्यासह शेअर करा आणि फेसबुक पेजवर नक्की कमेंट देऊन हा लेख कसा वाटला कळवा. 

Leave a Comment