सेक्सची स्वप्नं पडणं म्हणजे नक्की अर्थ काय, जाणून घ्या

ज्या व्यक्तींना सेक्सशी संबंधित स्वप्नं (Sex dreams) दिसतात ते अत्यंत नॉर्मल आहे. कारण हे असे अनेक जणांबरोबर घडते. तुम्हाला एकट्यालाच सेक्सची स्वप्नं येतात आणि ते चुकीचे आहे असं जर तुम्हाला वाटत असेल ते चूक आहे. आपल्याला प्रत्येकाला माहीत आहे की, स्वप्नांचे काही ना काहीतरी अर्थ असतात. तसंच सेक्सच्या स्वप्नांचेही काही अर्थ आहेत. त्यामुळे तुम्हीही या स्वप्नांचा अर्थ समजून घ्या. स्वप्नात एक्स बॉयफ्रेंड वा गर्लफ्रेंडबरोबर सेक्स, कधी एखाद्या आवडत्या सेलिब्रिटीसह, कधी अनोळखी व्यक्तीसह अथवा कधी आपल्या जोडीदारासह सेक्स पाहिले जाते. ही सर्व स्वप्नं आपल्या कौटुंबिक जीवन, करिअर आणि आयुष्याशी जोडलेली असतात. जाणून घेऊया याचा अर्थ. 

एक्ससह सेक्स (Sex With Ex)

सौजन्य – Freepik.com

बऱ्याच जणांना एक्ससह सेक्स केल्याचे स्वप्नं पडते. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की, तुमचं मन अजूनही त्यांच्यामध्ये गुंतले आहे. पण तुमचे नाते ज्या तऱ्हेने संपुष्टात आले असेल त्याचा त्रास अजूनही संपला नसेल किंवा तुमच्या मनात त्यांच्याविषयी एखादी गोष्ट राहून गेली असेल. त्यामुळे असं होऊ शकतं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या एक्ससह बोलून तुमच्या मनातील त्रास कमी करून घेऊ शकता. तेदेखील तुम्हाला गरजेचे वाटल्यास. पण एक्ससह सेक्स केल्याचे स्वप्नात आल्यास, काहीही चुकीचे नाही. 

सेलिब्रिटीसह सेक्स (Sex With Celebrity)

आपल्या आवडत्या सेलिब्रिटीसह सेक्स असे स्वप्नं नक्कीच अनेकांना दिसते. तुमच्या मनात त्यांच्याविषयी असणारे आकर्षण आणि प्रेम यामुळे असं स्वप्नं दिसतं. कधी कधी सेलिब्रिटीसह सेक्सचे स्वप्नं हे अत्यंत खरे वाटते आणि त्यामुळे मानसिक समाधानही मिळते. त्यासाठी केवळ त्यांच्याविषयी आकर्षण हे एकच कारण नसते तर तुम्हाला त्यांच्याप्रमाणेच नाव कमावण्याची आणि मोठं होण्याचीही सुप्त इच्छा मनात असते. त्यामुळे अशा पद्धतीचे स्वप्न तुम्हाला दिसू शकते. 

अनोळखी व्यक्तीसह सेक्स (Sex With Unknown Person)

सौजन्य – Freepik.com

यामध्ये घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. तसंच तुम्ही तुमच्या जोडीदारासह प्रतारणा करत आहात असाही याचा अर्थ होत नाही. तुम्ही तुमच्या जोडीदारासह समाधानी नसाल आणि सतत भांडणं होत असतील तर तुम्हाला अशा स्वप्नांचा सामना करावा लागतो. एखाद्या ओळखीच्या माणसाबाबत कदाचित तुम्हाला असं जाणवणार नाही. पण अशावेळी अनोळखी माणसासह तुम्ही स्वप्नात सेक्स करू शकता. मानसिक असमाधानतेचे हे प्रतीक आहे. त्यामुळे तुम्ही घाबरून वा भांबावून जायची गरज नाही. 

जोडीदाराला दुसऱ्यासह सेक्स करताना पाहणे (Partner Sex with Unknown Person)

महिलांना अशी स्वप्नं अधिक प्रमाणात दिसतात. एका शोधानुसार असं मानण्यात आले आहे की, 5 महिलांमध्ये किमान 1 महिला असे स्वप्नं पाहतेच. सहा महिन्यातून अथवा वर्षातून एकदा असं स्वप्नं महिलांना पडतेच. याचा अर्थ तुमचे नाते तुमच्या जोडीदारासह अजिबात चांगले नाही. तसंच तुमचा जोडीदार तुम्हाला सोडून जाईल असं तुम्हाला वाटत असल्यामुळेच अशी स्वप्नं पडतात. ही मनातील एक भीती असते जी स्वप्नांच्या रूपात तुम्हाला दिसते. त्यामुळे घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही.  

बॉससह सेक्स (Sex With Boss)

सौजन्य – Freepik.com

असे स्वप्नं अनेकांना त्रासदायक ठरते. आपल्याला आपल्या बॉसबद्दल काही भावना आहेत म्हणून असे स्वप्नं पडते असे अजिबात नाही. आयुष्यात काहीतरी चांगलं करणार अथवा एखादी जबाबदारी तुमच्या खांद्यावर येणार असते तेव्हा असे स्वप्नं दिसते असे म्हटले जाते. बॉस स्वप्नांत दिसणे अर्थात तुम्ही एखाद्या वेगळ्या उंचीवर जाणार असल्याचेही संकेत असतात असे समुद्रशास्त्रानुसार सांगण्यात येते. 

प्रायव्हेट पार्ट्सचे स्वप्नं (Private Parts Dreams)

स्वप्नांत तुम्हाला पुरूषांचे गुप्तांग दिसत असेल तर तुमच्यासह लवकरच काहीतरी आक्रमक घडणार आहे. महिलांची छाती दिसल्यास, हे कमी पोषण होत असल्याची निशाणी आहे. तुम्हाला पोषक आहाराची गरज असल्याचा हा संकेत आहे. महिलांची योनी दिसल्यास, पुरूष असमाधानी आहे असा हा संकेत आहे.  

तुम्हालाही सेक्सचे स्वप्नं येत असल्यास, यात काहीही चुकीचे नाही. याचे सरळ आणि साधे अर्थ तुम्ही जाणून घ्या. तुम्हाला हा लेख कसा वाटला नक्की सांगा. 

Leave a Comment