6 महिन्यापर्यंत नवजात बाळांना पाणी देऊ नये, जाणून घ्या

नवजात बाळांना 6 महिने तरी वेगळे पाणी पिण्याची गरज भासत नाही. त्यांच्यासाठी आईचे दूध हेच सर्व काही असतं. कारण आईच्या दुधात 80 टक्के पाणी असते जे त्यांना सर्व पोषण आणि हायड्रेशन देते. इतकंच नाही तर फॉर्म्युला दूधदेखील बाळाचे शरीर व्यवस्थित हायड्रेट ठेवते. कमीत कमी 6 महिन्यानंतरच बाळांना पाणी पाजावे असे सांगण्यात येते. पण या दरम्यान दुधाचे प्रमाण कमी करू नका. बाळांना जेवण कधी भरवावे हेदेखील आपणा सर्वांना माहीत आहेच. पण बाळांना पाणी पाजण्याचाही एक कालावधी असतो आणि त्यानुसारच तुम्ही बाळाला पाणी द्यावे. साधारण 6 महिन्यापर्यंत बाळाला पाणी का देऊ नये याबाबत अधिक व्यवस्थित माहिती तुम्हाला या लेखातून आम्ही देत आहोत. 

नवजात बाळाला पाणी पाजण्याची योग्य वेळ कोणती?

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा बाळ व्यवस्थित आहार खाऊ लागते, तेव्हाच त्याला पाणी देणेही सुरू करावे. नवजात बालकांना पाणी देण्याची ही योग्य वेळ आहे. 6 महिन्यानंतर तुम्ही बाटलीनेही बाळाला पाणी पाजू शकता. तसंच सिप्पी कपनेदेखील बाळ पाणी पिऊ शकते. कारण बाळ जास्त पित नाही. त्यामुळे तुम्ही या पद्धतीने वापर करून बाळाला पाणी द्यावे. सहा महिन्यापूर्वी बाळाला सहसा पाणी देऊ नये असे सांगण्यात येते. 

6 महिन्यापर्यंत बाळाला पाणी का देऊ नये

बाळाला पाणी देण्यासाठी 6 महिन्याची वाट पाहणं गरजेचे आहे. 6 महिन्यापर्यंत लहान बाळ हे आपल्या आईचे दूध अथवा फॉर्म्युला दूध पिते. ज्यामुळे त्याला आवश्यक पोषक तत्व मिळतात. तसंच यातून बाळाला आवश्यक प्रमाणात पाणीही मिळते. 6 महिन्याच्या आता बाळाला पाणी दिल्यास, त्याच्या विकासास बाधा येते आणि त्यामुळे पाणी न देणे योग्य आहे. तसंच दुधात पाणी मिसळल्यास, बाळाची तब्बेत खराब होऊ शकते. तसंच नुसतं पाणी दिल्यासही बाळाची तब्बेत बिघडू शकते. त्यामुळे बाळाला 6 महिने तरी पाणी देऊ नये. 

उन्हाळ्यात पाणी पाजणे किती योग्य? 

उन्हाळ्याच्या दिवसात बाळांना पाणी पाजण्याऐवजी आईने अधिक प्रमाणात बाळांना आपले दूध अथवा फॉर्म्युला दूध पाजणे योग्य ठरते. यामुळे बाळातील पाण्याची कमतरता राहणार नाही तसंच बाळ निरोगी राहील. उन्हाळ्याच्या दिवसात आईने अधिक प्रमाणात दूध दिल्यास, आईसह बाळही व्यवस्थित हायड्रेट राहील. तुमचे बाळ 24 तासात 6-8 वेळा जर लघवी करत असेल तर त्याला योग्य प्रमाणात दुधातून पाणी मिळत आहे हे समजून जा. त्यासाठी बाळाला वेगळे पाणी पाजण्याची अजिबात गरज नाही. 

ताप आल्यास बाळाला पाणी पाजावे का?

6 महिन्यापेक्षा कमी वय असणाऱ्या बाळाला ताप आल्यास अजिबात पाणी देऊ नये. आईचे दूध अथवा फॉर्म्युला मिल्क देण्यामुळे तापादरम्यान जाणवणारी पाण्याची कमतरता रोखण्यास मदत मिळलते. 6 महिन्यापेक्षा बाळ मोठे असेल तर तुम्ही पाणी देऊ शकता. तसंच बाळाच्या सुरक्षेसाठी तुम्ही डिहायड्रेशनच्या लक्षणांकडे लक्ष द्यावे

डिहायड्रेशनची लक्षणे (Dehydration Symptoms) – 

  • सुकलेला चेहरा आणि जीभ
  • डोळ्यात पाणी न येता रडणे 
  • 3 तासापेक्षा अधिक वेळ होऊनही लघवी न होणे
  • चिडचिडेपणा 
  • झोप पूर्ण न होणे
  • निस्तेज डोळे 

बाळांसाठी अन्य पेय

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे 6-12 महिन्याच्या मुलांना केवळ आईचे दूध, फॉर्म्युला मिल्क आणि पाणीच द्यावे. एक वर्षानंतर गाईचे दूध अथवा सोया ड्रिंक बाळांना देऊ शकता. युनायटेड किंगडमच्या राष्ट्रीय आरोग्या सेवेने 2 वर्षाच्या वयापर्यंत बाळांना दूध द्यावे असा सल्ला दिला आहे. कारण दुधातून बाळांना पोषक तत्व मिळतात. पोषक तत्व असूनही तुम्ही बाळांना फळांचा रस, स्मूदी आणि नैसर्गिक स्वरूपात साखर असणारे पेय देऊ शकता. 5 वर्षाच्या मुलांना रोज साधारण 150 मिलीलिटर फळांचा रस द्यावा. 

Leave a Comment