Bigg Boss मराठी: रुचिरा जाधवची (Ruchira Jadhav) एक्झिट

Bigg Boss मराठीच्या घरात आणखी एका स्पर्धकाची एक्झिट झाली आहे. हा सदस्य रुचिरा जाधव आहे. रुचिरा जाधवचे जाणे हे तिच्या फॅन्सला धक्का देणारे असले तरी देखील बिग बॉसच्या चाहत्यांना रुचिराच या आठवड्यात जाणार याची खात्री होती. अगदी त्याचप्रमाणे आठवड्याचे एविक्शन झालेले आहे. पण ती या घरातून बाहेर पडतानाही चांगलाच ड्रामा झाला आहे. या घरात एकत्र हात धरुन आलेले रोहित- रुचिरा यांच्या नात्यामध्ये फुट पडल्याची दिसून आली आहे. शिवाय यंदाच्या चावडीत नेमकं काय काय झालं जाणून घेऊया

रुचिराचा खेळ दिसलाच नाही

रुचिरा आणि रोहितची कपल एंट्री झाली होती. ज्यावेळी घरात कपल येतात त्यावेळी कायमच अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कारण त्यांची मन एक असली तरी गेम वेगवेगळा खेळावा लागतो. रुचिरा ही आल्यादिवसापासून अंडर शॅडो वाटली. बरेचदा काही टास्कमध्ये रोहित तिला खूप जास्तीचे प्रोटेक्शन देत होता असे दिसत होते. घरात आतापर्यंत अनेक टास्क झालेत या सगळ्या टास्कमध्ये रुचिरापेक्षा अनेकांनी खूप चांगले कामगिरी केली. त्यामुळे रुचिरा कधीच कोणत्या खेळात दिसली नाही. रोहित तिला सावरुन घेत असल्यामुळे कायम रोहित हा खेळ खेळताना दिसला तर रुचिरा कायम बॅकफूटवरच दिसली. तिचे विचारही असतील तर ते घरात कुठेही दिसले नाही. तिने सांगितल्याप्रमाणे तिचा स्वभाव आहे तशीच ती या घरात दिसली. पण हा खेळ असा आहे की, या खेळात तुम्हाला तुमचा स्पार्क दाखवल्याशिवाय टिकता येत नाही. त्यामुळेच रुचिरा या खेळातून बाहेर पडली.

रोहितकडे केले दुर्लक्ष

 रुचिराच्या नावाची घोषणा व्हायच्या आधी रोहित आणि रुचिरामध्ये अनेकदा वाद झालेले होते. या वादांमध्ये अनेकदा रोहित हा खूपच अग्रेसिव्ह दिसला. त्याने काही भांडणात रुचिराची साथ दिली असली तरी देखील तो फार कमी कारणावरुन रुचिराशी वाद घालताना किंवा कुरकूर करताना दिसला आहे. त्यामुळे खूप जणांनी रुचिराच्या जाण्यामागे रोहित अधिक कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. रुचिरानेही घरातून बाहेर पडताा रोहितला थांबण्यास सांगितले. त्या थांबण्यात प्रेम किंवा त्रास असे दिसले नव्हते तर राग दिसला होता. रुचिराने बाहेर येऊन तिची बाजू आणि हे नाते सावरुन धरण्याचा प्रयत्न केला पण तिच्या चाहत्यांनी मात्र तिच्या पोस्ट खाली रोहितबद्दल वाईट कमेंट केलेल्या दिसल्या आहेत.

 फॅन्ससाठी केली खास पोस्ट

रुचिराने तिच्या घरातील एक्झिटची बातमी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुनही दिली आहे. तिने या पोस्टमध्ये ‘कर्म करत राहा फळाची अपेक्षा करु नका’  असे लिहून तिने फॅन्सचे आभार मानले आहेत. या शिवाय तिने या घरात काही जणांचे खरे चेहरे कळले. पण तिने मात्र खेळासाठी स्वत:ला बदलले नाहीत असे लिहिले आहे. दरम्यान रुचिराचा प्रवास संपला असला तरी रोहित अजूनही या खेळात आहे. तो आता या पुढे नेमका कसा खेळेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

Leave a Comment